ETV Bharat / state

प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुखावर गुन्हा दाखल

शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली कावड यात्रेचे आयोजन केले जाते. कळमनुरीवरून कावड यात्रा आल्यानंतर बांगर यांनी शिवभक्तांना व कावड यात्रेकरूंना मार्गदर्शन करताना हल्लेखोरांमध्ये हिंमत असेल तर समोरासमोर लढा, असे खुले आव्हान दिले होते.

author img

By

Published : Aug 19, 2019, 9:14 AM IST

हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर

हिंगोली - येथे दरवर्षीच शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली कावड यात्रेचे आयोजन केले जाते. कळमनुरीवरून कावड यात्रा आल्यानंतर बांगर यांनी शिवभक्तांना व कावड यात्रेकरूंना मार्गदर्शन करताना हल्लेखोरांमध्ये हिंमत असेल तर समोरासमोर लढा, असे खुले आव्हान दिले होते. त्यामुळे बांगर यांच्यावर हिंगोली शहर पोलीस ठाण्यात प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी दुसऱ्या श्रावण सोमवारनिमित्त आयोजित केलेल्या भव्यदिव्य कावड यात्रेवर 12 ऑगस्टला दगडफेक केली होती. त्यामुळे वातावरण गंभीर बनले होते. जेव्हा कळमनुरीहून हिंगोलीत कावड यात्रा आली तेव्हा शिवसैनिक व शिवभक्तांच्या आग्रहाखातर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी भाषण केले होते. या भाषणात हिंमत असेल तर समोरासमोर येऊन लढा, असे खुले आव्हान त्यांनी दिले होते. तसेच या भाषणादरम्यान बांगर यांनी छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात हिंदूंवर झालेला अन्याय वंदनीय शिवसेनाप्रमुखांच्या विचारानुसार सहन केला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला होता.

या घटनेला सहा दिवस उलटल्यानंतर हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी 18 ऑगस्टला शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांच्यावर हिंदू देवदेवतांचे व धर्माचे दाखले देऊन हिंगोलीच्या नांदेड नाका भागात प्रक्षोभक भाषण केल्याचा गुन्हा स्वतः फिर्याद देऊन दाखल केला आहे.

Intro:

हिंगोली- येथे दरवर्षीच शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली कावड यात्रेचे आयोजन केले जाते. कळमनुरी वरून कावड यात्राआल्यानंतर बांगरने शिवभक्तांना व कावडयात्रेकरूंना मार्गदर्शन करताना हल्लेखोरांमध्ये हिंमत असेल तर समोरासमोर लढा असे खुले आव्हान केले होते. त्यामुळे बांगरवर हिंगोली शहर पोलीस ठाण्यात प्रक्षोभक भाषण केल्याचा गुन्हा दाखल केलाय.

Body:शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी दुसऱ्या श्रावण सोमवार निमित्त आयोजित केलेल्या भव्यदिव्य कावड यात्रेवर मुस्लिमांनी 12 ऑगस्ट रोजी दगडफेक करून जातीय तेढ निर्माण केला होता. त्यामुळे वातावरण गंभीर बनले होते. जेव्हा कळमनुरीहुन हिंगोलीत कावड यात्रा आली तेव्हा शिवसैनिक व शिवभक्तांच्या आग्रहाखातर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी भाषण केलेल्या भाषणात हिंमत असेल तर समोरासमोर येऊन लढा असे खुले आव्हाहन केले होते. तसेच या भाषणादरम्यान बांगर यांनी छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात हिंदूंवर झालेला अन्याय वंदनीय शिवसेनाप्रमुखांच्या विचारानुसार सहन केला जाणार नाही असा इशारा दिला होता. या
घटनेला सहा दिवस उलटल्यानंतर हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी 18 ऑगस्ट रोजी शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांच्यावर हिंदू देवदेवतांचे व धर्माचे दाखले देऊन हिंगोलीच्या नांदेड नाका भागात प्रक्षोभक भाषण केल्याचा गुन्हा स्वतः फिर्याद देऊन दाखल केला आहे.
विशेष म्हणजे हा गुन्हा दाखल करण्यासाठी वरिष्ठांचे मार्गदर्शन ही घेतले असल्याचे लिखित म्हटलेय.
पोलीस अधीक्षक योगेश कुमार व नांदेडचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल या दोघांनी हिंगोली शहरात धर्मांध मुस्लिमांनी कायदा व सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडवून देखील पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांची पाठराखण करत पक्षपाती भूमिका बजावल्याचे बोलले जात आहे. Conclusion:वास्तविक पाहता इदगा मैदानामध्ये मुस्लिम बांधवाची नमाजअदा सुरू असताना पोलीस प्रशासनाने दहा मिनिटं जर रस्त्यावरची वाहतूक थांबली असती तर हा वादच झाला नसता. या मध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल झाले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.