ETV Bharat / state

कोरोनाबाबत अफवा पसरवणे पडले महागात, पोलीस पाटलीनबाईच्या पतीवर गुन्हा दाखल - corona effect

एक तरुण पुण्यावरून त्य्याच्या गावात परतला होता. या तरुणाने खबरदारी म्हणून, नियमाप्रमाणे कवठा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात व जिल्हासामान्य रुग्णलाय जाऊन स्वतःची कोरोनाबाबतची आरोग्य तपासणी केली. मात्र, गावात पोलीस पाटील असलेल्या महिलेच्या पतीने त्या तरुणांना कोरोना झाल्याची खोटी अफवा गावामध्ये मोठ्या प्रमाणात पसरवली.

तरुणाला कोरोनाची लागण झाल्याची खोटी अफवा पसरविणे पाटलींनबाईच्या पतीच्या अंगलट

author img

By

Published : Apr 7, 2020, 8:58 AM IST

Updated : Apr 7, 2020, 11:09 AM IST

हिंगोली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन खूप सतर्क झालेले आहे. पुणे येथून आलेल्या तरुणाने खबरदारी घेत स्वतःहून डॉक्टरकडे जाऊन पूर्णपणे तपासणी करून घेतली. असे असतानाही गावातील पोलीस पाटलाच्या पतिने सदरील व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याची खोटी अफवा पसरवली. तसेच त्याच्या घरी असलेल्या दुकानावर न जाण्यासह त्याला कोणी न बोलण्याचेही सांगत फिरत सुटला होता. त्यामुळे तरुणांच्या फिर्यादी वरून सेनगाव पोलीस ठाण्यात विविध कलमांनुसार पटलीनबाईच्या पती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, ग्रामस्थांची अशी वागणूक पाहून अनेकांना पश्चाताप होत आहे.

तरुणाला कोरोनाची लागण झाल्याची खोटी अफवा पसरविणे पाटलीनबाईच्या पतीच्या अंगलट

सेनगाव तालुक्यातील कवठा येथे हा प्रकार घडला आहे. येथील अनेक कुटुंब कामानिमित्त पुणे येथे स्थलांतरित झाले आहेत. सध्या देशात कोरोनाची साथ सुरू असल्याने सर्वच कामे बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे पुणे येथे स्थलांतरित झालेली अनेक कुटुंब गावाकडे परतत आहेत. असाच एक तरुण पुण्यावरून गावामध्ये आला. या तरुणाने खबरदारी म्हणून, नियमाप्रमाणे कवठा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात व जिल्हासामान्य रुग्णलाय जाऊन स्वतःची कोरोनाबाबतची आरोग्य तपासणी केली. मात्र, गावात पोलीस पाटील असलेल्या महिलेच्या पतीने त्या तरुणांना कोरोना झाल्याची खोटी अफवा गावामध्ये मोठ्या प्रमाणात पसरवली.

पुण्याहून आलेला हा तरुण कोरोनाग्रस्त असून, ''त्याला गावांमध्ये कोणीही बोलू नका, एवढेच काय तर, त्याच्या घरी असलेल्या किराणा दुकानावर कोणीही जाऊ नका'' अशी खोटी अफवा पसरवत त्या तरुणाची गावात मोठ्या प्रमाणात बदनामी केली. या आफवेमुळे त्याच्याकडे बघण्याचा ग्रामस्थांचा बघण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला. त्यामुळे संतापलेल्या तरुणाने सेनगाव येथील पोलीस ठाणे गाठून, खोटी अफवा पसरवणाऱ्या पोलीस पाटील यांच्या पती विरिद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकाराने मात्र परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अजूनही वाहने बंद असल्याने बाहेर गावावरून लोक पायी आपले गाव गाठत आहेत. मात्र, गावात आल्यानंतर त्यांना अशी सावत्रपणाची वागणूक मिळत असल्याने, अनेकांना पायपीट करून अन् अनेक खस्ता खाऊन गाव जवळ केल्याचा पश्चाताप होत आहे.

Last Updated : Apr 7, 2020, 11:09 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.