ETV Bharat / state

धक्कादायक: पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना विचारली जातेय जात! स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक - पीक कर्ज अर्ज हिंगोली

नाफेडमध्ये देखील या पुर्वी शेतीमाल खरेदीच्या वेळी जात विचारली गेली होती. तसेच आताही कर्ज घेण्यासाठी देखील जात विचारली जात आहे. हा प्रकार निंदनीय असून जात पात न पाहता सर्वांची भूक भागवणाऱ्या शेतकऱ्याला त्याची जात विचारणे थांबवा. अन्यथा तीव्र आंदोलन करु, अशा इशारा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.

hingoli farmer
पीक कर्जासाठी अर्ज भरायला शेतकऱ्यांची गर्दी
author img

By

Published : Jun 5, 2020, 3:24 PM IST

हिंगोली - कोरोनामुळे राज्यातील शेतकरी अगोदरच संकटात सापडला आहे. खरिप हंगामाच्या पार्श्वभूमीवर पेरणीच्या तोंडावर बँकेतून कर्ज मिळावे, यासाठी शेतकरी अर्ज भरत आहेत. दिवस-रात्र अर्ज भरण्यासाठी बँकेसमोर उभे आहेत. त्यातच एक धक्कादायक बाब समोर आली आहे. ती म्हणजे पीक कर्जासाठीच्या अर्ज नमुन्यात शेतकऱ्यांना त्यांची जात विचारली जात आहे. या मुद्द्यावर शेतकरी संघटना चांगलीच आक्रमक झाली असून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे याबाबत तक्रार दिली आहे. तसेच हा प्रकार थांबवण्याची मागणी केली आहे.

कर्जाच्या नमुना अर्जात जातीचा रकाना असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक...

हेही वाचा... मुलगी पहायला आले अन् लग्न लावून नेले, जिंतूरात पार पडला हा 'लॉकडाऊन झटपट विवाह'

जगाची भुक भागवणाऱ्या शेतकऱ्याला त्याची जात विचारणे थांबवा : स्वाभिमानी शेतकरी संघटना

सध्या खरिप हंगामाच्या तोंडावर विविध बँकांमार्फत कर्ज वाटपासाठी शेतकऱ्यांचे ऑनलाईन अर्ज मागवून घेतले जात आहेत. त्या अनुषंगाने दिवसरात्र परिश्रम घेऊन शेतकरी ऑनलाईन अर्ज दाखल करत आहेत. मात्र, ऑनलाईन अर्ज दाखल करताना त्यातील अर्ज नमुन्यात जातीचा रकाना असल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला ऑनलाईन सेंटरवर प्रथम जात विचारून त्यांचा अर्ज भरून घेतला जात आहे. इतकेच नाही तर संकेतस्थळावर जातीचा रकाना न भरल्यास अर्ज प्रक्रिया पुर्ण होत नाही.

नाफेडमध्ये देखील या पुर्वी शेतीमाल खरेदीच्या वेळी जात विचारली गेली होती. तसेच आताही आता कर्ज घेण्यासाठी देखील जात विचारली जात आहे. हा प्रकार निंदनीय असून जात पात न पाहता सर्वांची भुक भागवणाऱ्या शेतकऱ्याला त्याची जात विचारणे थांबवा. अन्यथा तीव्र आंदोलन करु, अशा इशारा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज करुन दिला आहे.

माहिती संकलन करणे हाच उद्देश त्यापेक्षा अधिक काही नाही...

अग्रणी बँक व्यवस्थापक शशिकांत सावंत यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता, त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. कर्ज अर्जातील जात नमुना हा माहिती संकलनासाठी आहे. त्याचा दुसरा कोणताही हेतू नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. जात विचारणे म्हणजेच कर्ज हे प्रत्येक घटकातील व्यक्तींना मिळते आहे की नाही, याची माहिती घेणे. इतकाचा हा मुद्दा मर्यादीत असल्याचे सावंत यांनी म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.