ETV Bharat / state

ऐकावं ते नवलंच! हिंगोलीत शेतकऱ्याने चक्क अफूची फुलवली बाग; पोलिसांच्या धाडीत रोपे जप्त

हिंगोलीत आतापर्यंत गांजाची शेती केल्याचे समोर आले होते. मात्र, आता चक्क अफूची बाग फुलवल्याची घटना उघडकीस आली आहे. बाळापूर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात ही बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

हिंगोली अफूची शेती
हिंगोलीत शेतकऱ्याने केली अफूची शेती
author img

By

Published : Feb 8, 2020, 3:21 AM IST

हिंगोली - जिल्ह्यात आतापर्यंत गांजाची शेती केल्याचे समोर आले होते. मात्र, आता चक्क अफूची बाग फुलवल्याची घटना उघडकीस आली आहे. बाळापूर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात ही बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. जवळपास दीड लाख रुपये किंमतीच्या अफूची ही शेती असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

हेही वाचा... नागपुरात मध्यान्ह भोजनातून ३२ विद्यार्थ्यांना विषबाधा; रुग्णालयात उपचार सुरू

कळमनुरी तालुक्यातील भोसी शिवारात रामदास गणाजी खोकले (रा. कुंभारवाडी) या शेतकऱ्याने शेतात अफूची लागवड केली असल्याची गोपनीय माहिती बाळापूर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार बाळापूर पोलिसांनी भोसी शिवारात धाव घेतली. त्यावेळी त्यांना शेतात मोठ्या प्रमाणात अफूची लागवड केल्याचे दिसून आले. महत्वाचे म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात ही लागवड केल्याचे पोलीस आणि परिसरात कोणाच्याही लक्षात आले नाही. या शेतकऱ्याने अफूच्या बागेत आंतरपीक म्हणून कोथिंबीरचेही पीक घेतले हेते.

हेही वाचा.... रांजणगावमध्ये कार्यक्रमात मराठी अभिनेत्रीसोबत अश्लील वर्तन, मुंबईत गुन्हा दाखल

पोलिसांनी अफूची दीड हजार झाडे ताब्यात घेतला आहे. तसेच शेतात पोलिसांची धाड पडल्याची माहीत मिळताच बाग फुलवणारा शेतकरी फरार झाला आहे.

Intro:*

हिंगोली- आता पर्यंत हिंगोली जिल्ह्यात गांजाची शेती केल्याचे समोर आलंय मात्र आता तर चक्क अफूची बाग फुलवली जात असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झालेय. त्यामुळे जिल्ह्यात आता एकच खळबळ उडालीय. जवळपास दीड लाख रुपये किंमतीचा अफू असल्याचा अंदाज पोलिसानी लावला आहे.

Body:
कळमनुरी तालुक्यातील भोसी शिवारात रामदास गणाजी खोकले रा. कुंभार वाडी या शेतकऱ्याच्या शेतात अफूची शेती बाग फुलवली जात असल्याची गोपनीय माहिती बाळापूर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार बाळापूर पोलिसानी भोसी शिवारात धाव घेतली असता, शेतात मोठ्या प्रमाणात अफूची लावगड केल्याचे दिसून आले. चक्क याठिकाणी अफूची बागत फुलवली जात असल्याने पोलिसही मात्र चांगलीच चक्रावून गेले विशेष म्हणजे या अफूच्या बागेत आंतरपीक म्हणून कोथिंबीरचेही पीक घेतले जातेय. Conclusion:पोलिसांनी अफूची दीड हजार झाडे ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणली आहेत. धाड पडल्याची माहीत मिळताच बाग फुलविणारा शेतकरी मात्र फरार झाला आहे. तर बाळापूर पोलीस ठाण्याचे पोनि विकास थोरात हे कारवाई करीत आहेत. आता नाव ऐकले जाणाऱ्या अफूची बागच हिंगोलीत फुलवली जात असल्याने अफूची झाडे पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. अजून तरी कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.

बाईट-पोनि विकास थोरात
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.