ETV Bharat / state

हिंगोली जिल्ह्यात पुन्हा एका तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या - hingoli corona update

सुनील प्रल्हाद कदम (वय 28, रा. रोडगा, ता. वसमत) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. सुनिल यांच्या वडिलांच्या नावावर सात एकर जमीन आहे. त्यांनी हैदराबाद बँकेकडून दीड लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे. याच चिंतेतून तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली.

sunil kadam
सुनील प्रल्हाद कदम
author img

By

Published : May 30, 2020, 6:02 PM IST

हिंगोली - एका कर्जबाजारी तरुण शेतकऱ्यांने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना वसमत तालुक्यातील रोडगा येथे काल (29 मे) घडली. याप्रकरणी वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात रात्री उशिरा अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सुनील प्रल्हाद कदम (वय 28, रा. रोडगा, ता. वसमत) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. सुनिल यांच्या वडिलांच्या नावावर सात एकर जमीन आहे. त्यांनी हैदराबाद बँकेकडून दीड लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे. मात्र, सततच्या नापिकी अन अत्यल्प पर्जन्यमानामुळे शेतामध्ये काहीही उत्पन्न झालेले नाही. त्यामुळे वडिलांच्या नावावर असलेले कर्ज कसे फेडायचे या चिंतेत शेतकरी सुनील असायचा.

वारंवार ते डोक्यावर असलेल्या कर्जाची चिंता आपल्या कुटुंबीयांकडे व्यक्त करत होते. कुटुंब त्यांना धीर देण्याचा खूप प्रयत्न करत होते. कोरोनामुळे हाताला काही काम नसल्याने, संसार चालवायचा कसा हादेखील प्रश्न त्यांच्या समोर उभा ठाकला होता. याच विवंचनेतून 29 मे रोजी दुपारी अडीच वाजता स्वतःच्या घरात सुनीलने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती ग्रामीण पोलीस ठाण्याला कळताच, घटनास्थळी पोलीस दाखल झाले.

घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात हलविला. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी सुनीलची पत्नी गौकर्णा कदम यांच्या तक्रारीवरून वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. एकंदरीतच हिंगोली जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.