ETV Bharat / state

हिंगोलीत शेतकऱ्याची कर्जबाजारीपणातून आत्महत्या - हिंगोलीत कर्जबाजारीपणातून शेतकऱ्याची आत्महत्या

निसर्गाने शेतीतील पिकांचे नुकसान केले आहे. तसेच दुसरीकडे हाताला काम मिळत नसल्याने हिंगोलीत एका अल्पभूधारक शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे.

मृत मधुकर गायकवाड
author img

By

Published : Nov 9, 2019, 1:45 PM IST

हिंगोली - सेनगाव तालुक्यातील बन बरडा येथे अल्पभूधारक शेतकऱ्याने कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मधुकर रामभाऊ गायकवाड (35) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

मधुकर गायकवाड यांच्याकडे २ एकर शेती आहे. मात्र, निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतीमध्ये काहीच उत्पन्न होत नसल्याने ते कामच्या शोधात बाहेरगावी नेहमीच भटकंती करीत होते. यंदाही निसर्गाने शेतातील पिकाचे अतोनात नुकसान केले. बाहेरगावी गेल्यानंतरही काहीच काम न मिळाल्याने ते निराश झाले. गायकवाड हे मुंबई या ठिकाणी कामानिमित्त गेले होते. तेथे काम न मिळाल्याने ते परत आले. त्यावेळी पत्नी देखील माहेरी गेली होती. याच नैराश्यातून गायकवाड यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने एकच खळबळ उडाली असून माहिती मिळताच सेनगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करणे सुरू आहे.

Intro:

हिंगोली- सेनगाव तालुक्यातील बन बरडा येथे अल्पभूधारक शेतकऱ्याने कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज पहाटे उघडकीस आली.

Body:मधुकर रामभाऊ गायकवाड(35) असं मयत शेतकऱ्याचे नाव आहे गायकवाड यांच्या नावावर दोन एकर शेती आहे मात्र निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतीमध्ये काहीच उत्पन्न होत नसल्याने ते कामच्या शोधात बाहेरगावी नेहमीत भटकंती करीत असत यंदाही निसर्गाने शेतातील पिकाचे अतोनात नुकसान केले. बाहेरगावी गेल्यानंतरही काहीच काम न मिळाल्याने ते निराश झाले. गायकवाड हे मुंबई या ठिकाणी कामानिमित्त गेले होते तेथे काम न मिळाल्याने ते परत आले. तर पत्नी माहेरी गेली होती. यात नैराश्यातून गायकवाड यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली या घटनेने एकच खळबळ उडाली घटनेची माहिती मिळतात सेनगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करणे सुरू आहे.Conclusion:यावरूनच सिद्ध होते की अजूनही शेतकरी हा निसर्गासमोर पूर्णपणे हतबल झाला आहे त्यामुळे दिवसेंदिवस शेतकरी आत्महत्येचा आकडा काही केल्या कमी होत नसल्याचे भयंकर चित्र आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.