ETV Bharat / state

'कसली कर्जमाफी अन् कसलं काय, बँकेत कर्जमाफीचं नाव जरी काढलं तर...

कर्जमाफी म्हणजे फक्त भूलथापा, बँकेचे अधिकारी शेतकऱ्यांना बँकेत उभंही राहू देत नाही. हे आणि असे अनेक आरोप शेतकऱ्यांनी आंदोलना दरम्यान केले आहेत.

शेतकरी संघटनेचे आंदोलन
author img

By

Published : Sep 3, 2019, 5:47 PM IST

Updated : Sep 3, 2019, 11:35 PM IST

हिंगोली - 'कसली कर्जमाफी अन कसलं काय, बँकेत कर्जमाफीचा शब्द जरी काढला तर बँकवाले म्हणतात, जा मग तिकडं सरकारला जाऊन विचारा कर्जमाफीचं काय झालं, आमचे डोके खाऊ नका,' असा आरोप जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या शेतकरी संघटनेच्या धरणे आंदोलनात सहभागी शेतकऱ्यांनी केला आहे. दरम्यान, हे सरकार कर्जमाफी केली म्हणून शेतकऱ्यांना केवळ भूलथापा देत आहे. कर्जमाफी तर झालीच नाही वरुन बँक अधिकारी दुसरे कर्जही देण्यासाठी नकार देत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी यावेळी दिली.

शेतकरी संघटनेचे आंदोलन

हे सरकार कर्जमाफी झाली असं घोकून-घोकून सांगत आहे. कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांच्या नावांच्या याद्या ही संबंधित गावांमध्ये वाटप करण्यात आल्या आहेत. मात्र, मुळात कर्जमाफी झालेली नसल्याने अनेक शेतकऱ्यांना बँकेत उभे देखील राहू दिले जात नाही. कर्जमाफीचा विषय जरी काढला तरी बँक अधिकारी शेतकऱ्यांना धुडकावून लावतात, वरुन आम्ही तुम्हाला पाहून कर्जमाफी दिली, सरकारला पाहून नाही, असा जाब विचारतात, असा संतप्त खुलासा शेतकऱ्यांनी आंदोलनादरम्यान केला.

शेतकऱ्यांना शेतमाल विकण्यासाठी खुल्या बाजारापेठा उपलब्ध नाहीत. यामुळे शेकऱ्यांसमोर मोठ्या अडचणी उभ्या राहत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना खुल्या बाजारापेठांमध्ये शेतमाल विकण्याची सोय व्हावी. यासोबतच वीजबिल मुक्ती, सार्वत्रिक शिवार मोजणी करुन ग्रामीण पांदणरस्ते - पाऊलवाटा, नवबंधारे आणि गावाच्या सीमारेषा पुनर्स्थापना करण्याची मागणी यावेळी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

दरम्यान, या धरणे आंदोलनामध्ये जिल्हाभरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहेत. आगामी विधानसभेच्या तोंडावर शेतकरी संघटना आक्रमक झाल्याने, या शेतकऱ्यांना खरोखरच कितपत न्याय मिळेल याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Intro:कसली कर्जमाफी अन कसल काय, बँकेत कर्जमाफीचा शब्द जरी काढला तर बँक वाले म्हणतात की, जा मग तिकडं सरकारला जाऊन विचारा कर्जमाफीचे काय झाले, आमचे डोके खाऊ नका. असा आरोप जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या शेतकरी संघटनेच्या धरणे आंदोलनात सहभागी शेतकऱ्याने केलाय. चक्क हे सरकार कर्ज माफी केली म्हणू म्हनू केवळ शेतकऱ्यांना भूलथापा देण्याचा प्रयत्न करतय. मुळात कर्जमाफी तर झालीच नाही बँक अधिकारी दुसरे कर्जही देण्यासाठी पहिल्या कर्जाचे धरून बसले आहेत.

Body:हे सरकार कर्जमाफी झाली असं घोकून घोकून सांगतोय एवढेच नव्हे तर कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांच्या नावांच्या याद्या ही संबंधित गावांमध्ये वाटप करण्याचा प्रयत्न करते मात्र मुळात खरोखरच कर्जमाफी झाली नसल्याने अनेक शेतकऱ्यांना बँकेत उभे देखील राहू दिले जात नाही कर्जमाफीचा जराही विषय काढला तर बँक वाले शेतकऱ्यावर धावून जातात आणि तुमची कर्जमाफी जर झाली असेल तर जाऊन त्या सरकारला विचारा आम्ही तुमच्याकडे बघून कर्ज दिले सरकारकडे नाही असा सवाल करत असल्याचे धरणे आंदोलनातील सहभागी शेतकऱ्यांनी सांगितले. अजूनही शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झालेली नाही एवढेच नव्हे तर शेतकऱ्यांना तंत्रज्ञान स्वातंत्र्य मिळाले नसल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलेला आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांना खुल्या बाजारपेठेचे स्वातंत्र्य नसल्यामुळे माल विक्रीसाठी देखील मोठ्या अडचणी येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना खुल्या बाजारपेठेचे स्वातंत्र्य मिळाले पाहिजे, या मागणीसह संपूर्ण वीजबिल मुक्ती तसेच सार्वत्रिक शिवार मोजणी करून ग्रामीण पांदणरस्ते पाऊलवाटा, नवबंधुरे व गावाच्या सीमारेषा पुनर्स्थापना करण्याची मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने केलीय.

Conclusion:या धरणे आंदोलनामध्ये जिल्हाभरातील मोठ्या प्रमाणात शेतकरी सहभागी झालेले आहेत आता विधानसभेच्या तोंडावर शेतकरी संघटना आक्रमक झाल्याने, या शेतकऱ्यांना खरोखरच कितपत न्याय मिळेल याकडेही सर्वांचेच लक्ष लागले आहे विशेष म्हणजे पात्री येथे महाजनादेश यात्रेमध्ये शेतकरी संघटनेच्यावतीने मुख्यमंत्र्याच्या भाषणा दरम्यान पहिले शेतकरी कर्जमाफीचे बोला असे म्हणत गोंधळ घातला होता.त्या शेतकऱ्याला ताबडतोब ताब्यात घेण्यात आले होते. आता हिंगोलीत ही शेतकरी संघटना पेटून उठलेय. त्यामुळे आता खरोखरच सरकार कर्जमाफीचा काय निर्णय घेणार याकडे सर्वांचेच डोळे लागलेत.
Last Updated : Sep 3, 2019, 11:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.