ETV Bharat / state

स्पेशल : घोडी विकायची, खरेदीसाठी कोणी पुढे येईना; व्यावसायिकांच्या व्यथा - hingoli corona update news

कोरोनाची साखळी थांबवण्यासाठी धार्मिक स्थळे, लग्नसमारंभ व सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी घातली आहे. याचा सर्वाधिक फटका अनेक व्यावसायिकांना बसला आहे. यामध्ये फुल उत्पादक शेतकरी, फुलारी, कपडा व्यवसायिक, फोटोग्राफर आदीसह घोडा व्यवसायिक देखील आहेत.

etv bharat special report on horse businessmen at hingoli
घोडी विकायचायं पण खरेदीसाठी कोणी पुढे येईना
author img

By

Published : Sep 19, 2020, 5:06 PM IST

Updated : Sep 19, 2020, 10:38 PM IST

हिंगोली - कोरोना संकटाने धडक दिल्यानंतर याची संपूर्ण देशभरात लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात आली. लॉकडाऊनमुळे अनेकांचे प्रचंड हाल झाले आहेत. इतर घटका बरोबरच लग्न मंडपात अन् वरातीत नवरदेवाला घेऊन मिरवणाऱ्या घोडी व्यवसायिकाला देखील फटका बसला आहे. जवळपास दोन ते अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले असून, सद्यास्थित ना घोडी विकता येईना, अन कोणी खरेदीसाठी देखील कोणी पुढे येईना. त्यामुळे चाऱ्या पाण्याचा देखील खर्च परवडेनासा होऊन बसला असल्याची खंत हिंगोली तालुक्यातील एकांबा येथील घोडी व्यावसायिक फकिरा खंदारे यांनी व्यक्त केली.

घोडी विकायचायं पण खरेदीसाठी कोणी पुढे येईना; व्यावसायिकांच्या व्यथा
कोरोनामुळे संपूर्ण जीवनच विस्कळीत होऊन बसले आहे. याचा प्रत्येकाला फटका बसला असून अनेकांचे रोजगार गेले आहेत. तर बऱ्याच जणांना अर्ध्यावर रात्र काढण्याची वेळ आली आहे. अशाच परिस्थितीत कोरोनाची साखळी थांबवण्यासाठी धार्मिक स्थळे, लग्नसमारंभ व सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी घातली आहे. याचा सर्वाधिक फटका अनेक व्यावसायिकांना बसला आहे. यामध्ये फुल उत्पादक शेतकरी, फुलारी, कपडा व्यवसायिक, फोटोग्राफर आदीसह घोडा व्यवसायिक देखील. लग्न म्हटलं की, वरात ही निघणारच, त्यामध्ये नवरदेव हा घोडीवर बसून, त्याच्या समोर बँड अथवा डीजेच्या तालावर थिरकणारी तरुणाई सर्वांचेच लक्ष वेधून घेते. मात्र, कोरोना आला अन् सर्व काही ठप्पच होऊन बसले. अशा विदारक परिस्थितीत घोडा व्यवसायिक एवढा अडचणीत सापडला आहे. जवळपास घोड्याला दिवसाला दहा ते पंधरा किलो हरभरे, व इतर चारा असा जवळपास 300 ते 400 रुपयांचे खाद्य लागतेय, महिन्या काठी 15 ते 20 हजार रुपये हे घोडीच्या चारा पाण्यावर खर्च करावे लागत असल्याचे खंदारे यांनी सांगितले. लग्नसराईच्या काळात दोन ते अडीच लाख रुपयांचे सिजन होते.

यातून घोडीसाठी चारा पाण्याचा खर्च वगळता 70 ते 80 हजार रुपये निव्वळ नफा मिळतो. मात्र, या कोरोनामुळे सर्व स्वप्नावर पाणी फिरले आहे. आज घडीला तर एवढी भयंकर अडचण निर्माण झाली आहे. लग्नसराई नाही अन्, वरून हाताला देखील काही काम नाही, स्वतःचे तर कुटुंब चालविणे कठीण झालेच आहे. मात्र, घोडीचा खर्च देखील करणे जिकरीचे होऊन बसले आहे. घोडी विकण्याचा अनेकदा मनात विचार आलाही मात्र कोणी खरेदी साठी पुढे येईना? परंतु ईलाज नाही आता. आले तसे दिवस ढकलत असल्याचे खंदारे सांगत आहेत.

Last Updated : Sep 19, 2020, 10:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.