ETV Bharat / state

हिंगोली जिल्हा परिषदेत रिकाम्या खुर्च्या घेतात पंख्याची हवा; वीज बचतीची घोषणा वाऱ्यावर - हिंगोली जिल्हा परिषद

हिंगोली जिल्कहा परिषदेतील कक्षात कुणीही नसताना एसी, पंखे, लाईट सर्वच्या सर्व उपकरणे सुरू असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे हा विभाग वीज बचतीसाठी किती सजग आहे? हेच आजच्या परिस्थिती वरून दिसून येते.

हिंगोली जिल्हा परिषेदतील वीजेचे उपकरणे सुरू असलेले कक्ष
author img

By

Published : Jul 20, 2019, 4:37 PM IST

Updated : Jul 20, 2019, 8:50 PM IST

हिंगोली - जिल्हा परिषद नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत राहत असते. आता पुन्हा या जिल्हा परिषदेतील रिकाम्या खुर्च्या पंख्याची हवा खात असल्याचे समोर आले आहे. एकीकडे सरकार वीज बचत करण्यासंदर्भात आव्हान करत असते. दुसरीकडे मात्र, या कार्यालयात कुणीही नसताना वीजेवरील उपकरणे सुरू राहतात. त्यामुळे सरकारच्या वीज बचतीच्या धोरणाला जिल्हा परिषद अपवाद आहे की काय? असा प्रश्न उपस्थित होतो.

हिंगोली जिल्हा परिषदेत रिकाम्या खुर्च्या घेतात पंख्याची हवा

राज्यात नेहमीच वीजेचा तुटवडा पाहायला मिळतो. ग्रामीण भागात वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असतो. अपुऱ्या वीजेमुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत तक्रार केली असता अधिकारी नियमावर बोट ठेवतात. वीजेची बचत होण्यासाठी प्रशासन आणि सरकार नागरिकांना वीजेचा कमी वापर करण्याचे आवाहन करतात. मात्र, हिंगोली जिल्हा परिषदेच्या विविध प्रशासकीय विभागात आणि पदाधिकाऱ्यांच्या कक्षात वीजेवर चालणारे उपकरणे सर्रास सुरू असतात.

कक्षात कुणीही नसताना एसी, पंखे, लाईट सर्वच्या सर्व उपकरणे सुरू असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे हा विभाग वीज बचतीसाठी किती सजग आहे? हेच आजच्या परिस्थिती वरून दिसून येते. हा प्रकार केवळ एका दिवसाचा नाहीतर नेहमीच जिल्हा परिषदेत वीजेचा दुरुपयोग केला जात असल्याचे समोर आले आहे.

Intro:

हिंगोली- येथील जिल्हा परिषद नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत राहते. आता पुन्हा रिकाम्या खुर्च्या पंख्याची हवा खात असल्याने अन विजेवरील उपकरणे माणसाविना सुरू असल्याने पुन्हा एकदा ही जिल्हापरिषद चर्चेत आलीय. दुसरीकडे मात्र सरकार घोकून घोकून वीज बचत करण्यासंदर्भात आव्हान करतय. या ठिकाणी मात्र हे सर्व अपवाद आहे की काय?हाच प्रश्न उपस्थित होतोय.

Body:महाराष्ट्रात विजेचा नेहमीच तुटवडा पाहायला मिळतो. अपुऱ्या विजेमुळे तर नागरिक एवढे हैराण होत आहेत की, अभियंत्यांना वीज सुरू करा म्हटलं तर ते नियमावर बोट ठेवतात. विजेची बचत व्हावी म्हणून, प्रशासन व सरकार नागरिकांना सुचित करून विजेची बचत करण्याचं वारंवार आवाहन करतय,मात्र हिंगोली जिल्हा परिषद या सर्व गोष्टींना अपवाद आहे की काय असा प्रश्न आजच्या परिस्थिती वरून उपस्थित झालाय. हिंगोली जिल्हा परिषदेच्या विविध प्रशासकीय विभागात व पदाधिकाऱ्यांच्या कक्षात
चालणारी विजेवरची उपकरणे माणसा विना सुरू असल्याचा खळबळजनक प्रकार पुढे आलाय. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अनिल पतंगे यांच्या कक्षात तर कोणीही नसताना,
कक्षातील एसी, पंखे, लाईट सर्वच्या सर्व उपकरणे सुरू असल्याचे पहावयास मिळाले. त्या मुळे हा विभाग वीज बचतीसाठी किती सजग आहे. हेच आजच्या परिस्थिती वरून दिसून येतंय. जिल्हा परिषद प्रशासन विजेची बचत काळाची गरज ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांची महत्वकांशी घोषणा
किती गांभीर्याने घेत आहे हेदेखील स्पष्ट झाले आहे. विजेवरीप उपकरणे माणसा विना सुरू ठेवणे हा प्रकार एक दोन नव्हे तर नेहमीचाच आहे. अन एकाच कक्षात नव्हते तर बऱ्याच कक्षात माणसा विना रिकाम्या खुर्च्या हवा घेतात. आता याप्रकरणात प्रशासन काय कारवाई करते या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.Conclusion:आज ही ग्रामीण भागात वारंवार विधुत पुरवठा खंडित होत असल्याने, सिंगल फ्युज च्या विद्युत पुरवठ्याची मागणी करीत आहेत. तर काही काही शेतकऱ्यांना विधुत पुरवठा जोडणी नसताना ही बिल आलेत. अन जिल्हा परिषदेच्या कार्यालयात मात्र माणसाविना विजेवरील उपकरने सुरू ठेवली जातात.किती मोठा विरोधाभास आहे.
Last Updated : Jul 20, 2019, 8:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.