हिंगोली - हिंगोलीत आज (31 जानेवारी) पहाटे एक वाजेच्या दरम्यान भूकंपाचे धक्के बसले आहेत. 3.2 रिश्टर स्केलचा हा भूकंप होता. यासंदर्भातली माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीकडून देण्यात आली आहे. 27 जानेवारीला पुण्यातील पुरंदर परिसरात देखील भूकंपाचे धक्के बसले होते.
हिंगोलीत 3.2 रिश्टर स्केलचा भूकंप -
आज पहाटे 12 वाजून 41 मिनिटांनी हिंगोली जिल्ह्यातील काही भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपाची नोंद 3.2 रिश्टर स्केल एवढी करण्यात आली आहे.
हेही वाचा - 'एल्गार' ही बेकायदेशीर नाही, संविधानविरोधी काम करणारी नाही - अरुंधती राय
मंगळवारी पुण्याच्या पुरंदर परिसरात भूकंपाचे धक्के
पुणे जिल्ह्याच्या काही भागात मंगळवारी(27 जानेवारी) सायंकाळी भूकंपाचे सौम्य धक्के बसले. पुरंदर परिसरात 2.6 रिश्टर स्केल क्षमतेचा भूकंप झाल्याची माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीकडून देण्यात आली. या भूकंपाच्या झटक्यात जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झालेले नाही. मंगळवारी सायंकाळी 7 वाजून 28 मिनिटांनी हा भूकंप झाला. मात्र, काही काळ नागरिकांमध्ये भीती पसरली होती. २.६ रिश्टर स्केलचा भूकंप सौम्य गटात मोडतो.
भूकंप कसा मोजला जातो -
भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी सिस्मोमीटरचा वापर केला जातो. हे यंत्र जमिनीच्या पृष्ठभागावर ठेवले जाते. यंत्रामध्ये जमिनीच्या कंपनाची व केंद्राची नोंद होते. आलेखाच्या माध्यमातून भूकंप माहिती होतो. याबरोबर तीव्रता समण्यासाठी रिश्टर स्केलचा वापर केला जातो. त्यामुळे भूकंपाच्या नुकसानीचा अंदाज रिश्टर स्केलवरून समजण्यास मदत मिळते.
हेही वाचा - शेती पंपाला पूरेशी वीज मिळावी यासाठी सौर ऊर्जेला प्राधान्य- उपमुख्यमंत्री