ETV Bharat / state

लालपरीत आढळले मृत स्त्री जातीचे अर्भक; निर्दयी मातेविरुद्ध गुन्हा दाखल - hingoli

बसमधून सर्व प्रवासी उतरल्यानंतर कुणाचे समान राहिले का, हे पाहण्यासाठी डोंगरे बसमध्ये पाहणी करत होते. त्या दरम्यान बसमधील सीटच्या वर सामान ठेवण्याच्या जागी त्यांना एक तोंड बांधलेली कापडी पिशवी दिसून आली. डोंगरे यांनी पिशवी उघडून पाहिले असता त्यात एक मासाचा गोळा आढळून आला. ते एक स्त्री जातीचे मृत अर्भक होते.

लालपरीत आढळले मृत स्त्री जातीचे अर्भक
author img

By

Published : Aug 24, 2019, 11:45 PM IST

हिंगोली- कळमनुरी अगारात कळमनुरी- सोलापूर बसमध्ये एका कापडाच्या पिशवीत स्त्री जातीचे मृत अर्भक आढळून आले आहे. हे अर्भक कापडाच्या पिशवीत गुंडाळून ठेवण्यात आले होते. आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हे अर्भक आढळून आले. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

नाड्याने गळा आवळून या अर्भकांची हत्या केल्याचे शव विच्छेदन अहवालात समोर आले आहे. त्याचबरोबर अर्भकाच्या गळ्याभोवती नाडा अडकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. या प्रकरणी कळमनुरी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोलापूर- कळमनुरी (एम.एच.२० बी.एल. ०८३८) या क्रमांकाची बस सोलापूरहून कळमनुरी कडे जात होती. ही बस कळमनुरी बसस्थानकात ५.३० वाजता पोहोचली. बसमधून सर्व प्रवासी उतरल्यानंतर कुणाचे समान राहिले का, हे पाहण्यासाठी डोंगरे बसमध्ये पाहणी करत होते. त्या दरम्यान बसमधील सीटच्या वर सामान ठेवण्याच्या जागी त्यांना एक तोंड बांधलेली कापडी पिशवी दिसून आली. डोंगरे यांनी पिशवी उघडून पाहिले असता त्यात एक मासाचा गोळा आढळून आला. ते एक अर्भक होते.

त्यानी ही बाब चालक माहोरे यांना सांगितली. चालकाला देखील ते अर्भक मृतावस्थेत असल्याचे दिसून आले. त्यांनी सदरील बाब अगरामध्ये सांगितली. ही माहिती मिळताच कळमनुरी पोलिसांनी घटनास्थळ गाठले. पोलीस ठाण्याचे पो.नि रणजित भोईटे यांनी घटनेचा पंचनामा केला.

अर्भक ग्रामीण रुग्णालयात शव विच्छेदनासाठी पाठविले असता, सदरील अर्भकाचा नाड्याने गळा दाबून खून केल्याचे अहवालात समोर आले. यावळी या अर्भकला पाहण्यासाठी लोकांची एकच गर्दी जमली होती. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कळमनुरी पोलीस ठाण्यात अज्ञात मातेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Intro:कळमनुरी अगारात कळमनुरी- सोलापूर बस मध्ये एका कापडाच्या पिशवीत गुंडाळून ठेवलेले स्त्री जातीचे वृत्त अर्भक आढळून आल्याचे धक्कादायक घटना आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास उघडकीस आली या घटनेने परिसरात एकच खळबळ. सर नाड्याने गळा आवळून या अर्भकांची हत्या केल्याचे शवविच्छेदनाच्या अहवालात समोर आले. या प्रकरणी कळमनुरी पोलीस ठाण्यात अज्ञात गुन्हा दाखल झाला आहे.

Body:सोलापूर- कळमनुरी मार्गे एम. एच. 20 बी. एल. 0838 या क्रमांकाची बस सोलापूरहुन कळमनुरी मार्गे जात होती. ही बस कळमनुरी बसस्थानकात 5. 30 वाजता पोहोचली. बस मधून सर्व प्रवाशी उतरल्यानंतर कुणाचे काही समान बस मध्ये राहिले का हे पाहण्यासाठी बस मध्ये पाहणी करत होते तर बस मधील सीट च्या वर सामान ठेवण्याच्या जागी एक तोंड बांधलेली कापडी पिशवी दिसून आली. त्यामुळे ती पिशवी डोंगरे यांनी खाली घेतली अन पिशवीचे तोंड उघडून पाहिले तर त्या मध्ये एक मांसाचा गोळा असल्याचे आढळून आले. त्यानी ही बाब चालक माहोरे यांना सांगितली. चालक धावून बस मध्ये गेला तर अर्भक मृतावस्थेत असल्याचे दिसून आले. सदरील बाब अगरामध्ये सांगितली. ही माहिती कळमनुरी पोलिसांना कळवताच घटनास्थळी कळमनुरी पोलीस ठाण्याचे पोनि रणजित भोईटे यांनी धाव घेतली.घटनेचा पंचनामा केला. अर्भक बघण्यासाठी एकच गर्दी जमली होती. अर्भक ग्रामीण रुग्णालयात शेवविच्छेदनासाठी हलविले असता, सदरील अर्भरकाचा नाड्याने गळा दाबून खून केल्याचे शेवविच्छेदन अहवालात समोर आले.

Conclusion:या घटनेने परिसरात एकच खळबळ उडालीय. तर अर्भकाच्या गळ्याभोवती नाडा अडकलेल्या अवस्थेत आढळून आला. या प्रकरणी कळमनुरी पोलीस ठाण्यात अज्ञात माते विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेवरून स्त्री भुर्ण हत्या होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. जरी मुलगी वाचवा देश वाचवा, अशा वेगवेगळ्या घोषणा दिल्या जात असल्या तरी या घटनेवरून जनजागृती वर पाणी फिरल्यागत झाले आहे.

मृत अर्भक फोटो ftp केले आहे.,
बातमीत वापरणे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.