हिंगोली : औंढा नागनाथ तालुक्यातील दुधाळा तांडा शिवारात शेतकऱ्याने शेतात लावलेली ( Cultivation of Cannabis in Dudhala Shivara ) गांजाची तीन लाख रुपयाची झाडे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केले आहेत. ( Cannabis plants worth three lakh rupees seized in hingoli )
दुघाळा तांडा शिवारात शोध मोहिम सुरू : विष्णू शंकर जाधव अस शेतकऱ्याच नाव आहे. जाधव यांनी आपल्या शेतामध्ये गांजाची झाडे लावण्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती त्यानुसार त्यावरून पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, सहाय्यक पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे निरीक्षक उदय खंडेराय, उपनिरीक्षक सुनील गोपीनवार, जमादार सुनील अंभोरे, राजू ठाकूर, प्रशांत वाघमारे, किशोर सावंत, संभाजी लकुळे, नितीन गोरे, शेख जावेद, ज्ञानेश्वर सावळे, आकाश टापरे यांच्या पथकाने काल दुपारपासूनच दुघाळा तांडा शिवारात शोध मोहिम सुरू केली होती.
शोध मोहिमेत आढळली गांजाची झाडे : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शेतकरी जाधव यांच्या शेतामध्ये शोध मोहीम सुरू केली असता शेतात मधोमध लावलेली गांजाची 61 झाडे आढळून आली. त्याची किंमत तीन लाख रूपये आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि उदय खंडेराव यांच्या फिर्यादीवरून ओंढा नागनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.