ETV Bharat / state

ठेकेदाराचा मजुरांवर गोळीबार, दोन मजूर गंभीर; कनेरगाव नाका येथील घटना

author img

By

Published : Oct 11, 2019, 2:56 AM IST

पैशाच्या वादातून राग अनावर झालेल्या ठेकेदाराने दोन मजुरांवर गोळीबार केल्याची घटना हिंगोलीत घडली. यामध्ये मजूर गंभीर जखमी झाले आहेत.

गोळीबारात जखमी झालेला मजूर

हिंगोली - पैशाच्या वादातून राग अनावर झालेल्या ठेकेदाराने दोन मजुरांवर गोळीबार केल्याची घटना कनेरगाव नाका येथे घडली. यामध्ये मजूर गंभीर जखमी झाले आहेत. अनेक दिवसांपासून राज्य महामार्गाचे काम सुरू आहे. या रस्त्यावर परराज्यातील मजूर व ठेकेदार काम करतात. ठेकेदाराचा आणि पैशांची उचल घेतलेल्या मजुरांचा पैशावरून वाद झाला.

पैशाच्या वादातून राग अनावर झालेल्या ठेकेदाराने दोन मजुरांवर गोळीबार केल्याची घटना

संजय कुमार आणि हरीराम निषाद (रा.प्यारेपुर, उत्तर प्रदेश) अशी जखमी मजुरांची नावे आहेत. हे दोघे अनेक दिवसांपासून रस्त्याचे काम करण्यासाठी आलेले आहेत. या दोघांनी ठेकेदाराकडून पैशाची उचल घेतली होती. काही तरी खासगी कामाचे कारण सांगून हे दोन मजूर गावी जाण्यासाठी सुट्टी मागत होते. मात्र, ठेकेदार त्यांना सुट्टी देत नव्हता. त्यामुळे जोरदार वाद झाला.

हेही वाचा - बडनेरा मतदारसंघात भारत गणेशपुरे विरुद्ध बिग बॉस शिव ठाकरे!

या दरम्यान ठेकेदाराला राग अनावर झाल्याने त्याने थेट दोन्ही मजुरांवर गोळ्या झाडल्या. यामध्ये एकाच्या डोक्याला तर दुसऱ्याच्या पायाला गोळी लागली. जखमी मजुरांना उपचारासाठी हिंगोली येथे हलवण्यात आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच गोरेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपी संतोष सिंग आसाराम सिंग, रवी कुमार गौतम या दोघांना ताब्यात घेतले.

Intro:

हिंगोली- जिल्ह्यात
राज्य महामार्गाचे काम अनेक दिवसांपासून सुरू आहे. या रस्त्यावर परराज्यातील मजूर व ठेकेदार कामावर आहेत. कामावर आसलेल्या ठेकेदारांचा अन पैशाचा उचल असलेल्या मजुराचा पैशावरून वाद झाला. हा वाद एवढा विकोपाला गेला की, चक्क राग अनावर झालेल्या ठेकेदाराने थेट दोन मजुरांवर गोळीबार केला. या मध्ये दोन्ही मजूर गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना १० ऑक्टोबर रोजी रात्री ९. ३०च्या सुमारास घडली.

Body:संजय कुमार आणि हरिराम निषाद दोघे ही राहणार प्यारेपुर उत्तर प्रदेश असे जखमी ची नावे आहेत. हे दोघे ही अनेक दिवसांपासून या रस्त्यावर काम करण्यासाठी आलेले आहेत. या दोघांनी ठेकेदाराकडून पैशाचा उचल घेतला आहे.मात्र काही तरी कामानिमित्त गावी जायचे कारणं हे दोन मजूर सांगत होते. मात्र ठेकेदार त्यांना सुट्टी देत नव्हता. त्यामुळे दोघां मध्ये बराच वेळ वाद झाला. ठेकेदाराला राग अनावर झाला अन त्याने थेट दोन्ही मजुरांवर गोळ्या झाडल्या. यामध्ये एकाच्या डोक्यात तर दुसऱ्याच्या एका पायात गोळी लागली आहे. जखमी मजुरांना उपचारासाठी हिंगोली येथे हलविण्यात आलेय. घटनेची माहिती मिळताच गोरेगाव पोलीस ठाण्याचे पो नि . विश्वनाथ झुंजारे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली अन आरोपी संतोष सिंग आसाराम सिंग, रवी कुमार गौतम या दोघास पिस्टलसह ताब्यात घेतले. राहणार दोघे निलवड भोपाळ यांच्यासह एक पिस्टल ताब्यात घेतले. Conclusion:दोन्ही ही आरोपी भोपाळ मधील आहेत. या घटनेने मात्र पर राज्यातून कामानिमित्त आलेले मजूर भयभीत झाले आहेत. या प्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.