ETV Bharat / state

जिल्हाधिकाऱ्यांचा दणका; वेळेत जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणे जिल्हा परिषद सदस्याला भोवले - update collector news

राजेंद्र देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढविली होती. आंबा जिल्हा परिषद गट हा मागास प्रवर्गासाठी राखीव होता. त्यानुसार देशमुख यांनी निवडणूक लढविली होती, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी म्हणून शिल्पा श्रीनिवास भोसले होत्या, त्यांचा पराभव करून देशमुख हे विजयी झाले होते.

collector
जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी
author img

By

Published : Aug 29, 2020, 5:15 PM IST

हिंगोली - वेळेत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे असतानाही, ते सादर केले नाही. त्यामुळे आंबा जिल्हा परिषद सर्कलमधून निवडून आलेले जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र देशमुख यांचे सदस्यत्व रद्द केल्याचे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी काढले आहेत. माहिती अधिकारी कार्यकर्ते नदाफ म. बशीर खान यांनी सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली होती. या निर्णयामुळे सदस्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

सन 2017 मध्ये जिल्हा परिषद, पंचायत समितीची सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया पार पडली. त्या निवडणुकीत अपात्र ठरवलेले आंबा येथील रहिवासी असलेले राजेंद्र देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढविली होती. आंबा जिल्हा परिषद गट हा मागास प्रवर्गासाठी राखीव होता. त्यानुसार देशमुख यांनी निवडणूक लढविली होती, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी म्हणून शिल्पा श्रीनिवास भोसले होत्या, त्यांचा पराभव करून देशमुख हे विजयी झाले होते. मात्र देशमुख यांनी जात प्रमाणपत्र निवडणूक डोळ्यासमोर ठेवत कोणतेही ठोस पुरावे नसताना जोडल्याची तक्रार निवडणूक निर्णय अधिकारी व जात पडताळणी विभागाकडे दाखल केली होती.

माहिती अधिकार कार्यकर्ते नदाफ म. बशीर खान यांनी देखील जीप सदस्य राजेंद्र देशमुख यांची निवड रद्द करण्याची मागणी केली होती. त्याचा नदाफ यांनी सातत्याने पाठपुरावा देखील केला होता. त्यामुळे या प्रकरणात चार वेळेस जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडे सुनावणी झाली. मात्र, देशमुख हे वारंवार सुनावणीसाठी गैर हजर राहत अन मुदत वाढवून मागत असत. त्यानुसार हिंगोली येथील जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने 21 ऑगस्ट 2018 रोजी देशमुख यांचे जातीचे प्रमाणपत्र अवैध ठरवले अन सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश पारित केले होते.

यावर देशमुख यांनी 4 ऑक्टोबर 2018 रोजी उच्च न्यायालयात धाव घेत रीट याचिका दाखल केली होती. आजतागायत या प्रकरणी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या आदेशास स्थगिती दिली नव्हती. त्यामुळे अर्जदार बशीर खान यांचा अर्ज मान्य करत जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी आंबा गटातून निवडून आलेले राजेंद्र मोहनराव देशमुख यांचे महाराष्ट्र जिप, पस अधिनियम 1961 चे कलमानुसार 12 क नुसार सदस्यत्व रद्द केल्याचे आदेश पारित केले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.