ETV Bharat / state

...म्हणून जिल्हाधिकारी स्वतः उतरले रस्त्यावर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी सुरु आहे. तरीही काही लोक आपली वाहने घेऊन रस्त्यावर फिरत आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी स्वतः जिल्हाधिकारीच रस्त्यावर उतले. आज विविध 70 वाहने हिंगोलीमध्ये जप्त करण्यात आली आहेत.

कारवाई करताना जिल्हाधिकारी
कारवाई करताना जिल्हाधिकारी
author img

By

Published : Apr 6, 2020, 7:29 PM IST

हिंगोली - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अत्यावश्यक वाहने वगळता इतर सर्व वाहनांना रस्त्यावर बंदी करण्यात आली आहे. मात्र, पोलीस प्रशासनाच्या वतीने वाहनांना बंदी घातली जात असतानाही वाहनचालकांना अजिबात गांभीर्यच नाही. त्यामुळे स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनीच रस्त्यावर आपली गाडी आडवी लावून वाहन चालकांची चौकशी करून वाहने ताब्यात घेण्यास सुरुवात केली. वाहने सोडून वाहनचालकांना पायी जाण्याच्या सूचना दिल्या जात होत्या.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली प्रशासन गतीने कामाला लागले आहे. रस्त्यावर वाहन घेऊन मिरवणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने, संचारबंदी आहे की नाही? असा प्रश्न पडला होता. त्यामुळे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी स्वतः अत्यावश्यक वाहने वगळता विनाकारण फिरणाऱ्या वाहनांवर बंदी घालण्याचे आदेश काढले आहेत. त्यानुसार हिंगोली शहरात जगो जागी पोलीस प्रशासनाच्या वतीने वाहने ताब्यात घेतली जात होती.

माहिती देताना जिल्हाधिकारी

जिल्हाधिकाऱ्यांनी गाडी रस्त्यावर आडवी लावूत स्वतः वाहनांची तपासणी करत होते. त्यामुळे वाहन चालकांची चांगलीच भंबेरी उडाली होती. अनेक जण जिल्हाधिकाऱ्यांना दवाखान्याची कागदपत्रे दाखवत होते, तर काही जण ओळखपत्र ही दाखवत होते. मात्र, अजिबात कोणाचे ही काही ऐकून घेतले जात नव्हते. तुमच्या सेवेसाठी अत्यावश्यक नंबर उपलब्ध करून दिले आहेत त्यांचा उपयोग घ्यायला हवा एवढेच ते प्रत्येकाला सांगून वाहन ताब्यात घेण्याच्या सूचना पोलीस प्रशासनास देत होते. जिल्हाधिकारी वाहने तपासत असल्याचे पाहून सर्वच पोलीस अधिकारी व शासकीय अधिकारी वर्ग वाहनांची तपासणी करण्यासाठी धावून आला. रुग्णवाहिका व ट्रॅक्टर, अत्यावश्यक वाहने मात्र सोडून दिले जात होते.

जप्त केलेल्या वाहनांमध्ये चारचाकी, दुचाकी आणि तीनचाकी असे एकुण 70 च्यावर ताब्यात घेण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यासह उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वैजने, ए. जी. खान, मुख्याधिकारी रामदास पाटील यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

हेही वाचा - हिंगोली उजळली दिव्यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.