ETV Bharat / state

पोलीस अधीक्षकांच्या परीक्षेत चेक पोस्टवरील पोलीस कर्मचारी पास - hingoli sp visit

पोलीस कर्मचाऱ्यांवर पैसे घेऊन परजिल्ह्यातील वाहने सोडविण्याचा आरोप होत असल्याची बाब पोलीस अधीक्षक यांच्या लक्षात येताच त्यांनी चेक पोस्टवर कर्तव्य बजावणाऱ्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांची डमी वाहने पाठवून परीक्षा घेतली. यामध्ये सर्वच पोलीस कर्मचारी हे पास झाले

yogesh kumar
पोलीस अधीक्षक योगेश कुमार
author img

By

Published : May 21, 2020, 8:51 PM IST

हिंगोली - खाकीतली दर्दी कित्येक वेळा दाखवलेली असली तरीही 'खाकी'वर अनेकांचा विश्वासच नाही. रात्री-अपरात्री जीवाची पर्वा न करणार्‍या पोलीस कर्मचाऱ्यांवर पैसे घेऊन परजिल्ह्यातील वाहने सोडविण्याचा आरोप होत असल्याची बाब पोलीस अधीक्षक यांच्या कानी येताच, त्यांनी चेक पोस्टवर कर्तव्य बजावणाऱ्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांची डमी वाहने पाठवून परीक्षा घेतली. यामध्ये सर्वच पोलीस कर्मचारी हे पास झाले असून, त्यांना एक हजार रुपये प्रमाणे बक्षीस देखील जाहीर केले.

पोलीस चोखपणे कर्तव्य बजावत असल्याचे परीक्षेतून निष्पन्न झाले आहे. सध्या कोरोना च्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन आपल्या जीवाची जराही पर्वा न करता रात्री-अपरात्री कर्तव्य बजावत आहे तसेच जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी संपूर्ण जिल्ह्यातील सीमा बंद केल्या असून, या सीमेवर तैनात करण्यात आलेले पोलीस कर्मचारी हे पॅसेंजर मालवाहू इतर वाहनाच्या चालकाकडून पैसे घेऊन, परजिल्ह्यातील वाहने जिल्ह्याच्या सीमेत सोडत असल्याची खळबळजनक बाब पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्या कानी पडली. त्यामुळे रात्रंदिवस कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर करण्यात आलेले आरोप हे कितपत सत्य आहे हे पडताळून पाहण्यासाठी पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी ठरवले.

18 ते 19 मे या कालावधीत जिल्ह्यातील चेक पोस्टवर दोन डमी पॅसेंजर तसेच एका खाजगी वाहन पाठवून चेक पोस्टवर तैनात असलेल्या पोलीस कर्मचारी तसेच अधिकाऱ्याची एक प्रकारे सत्वपरीक्षा घेतली. मात्र, जिल्ह्यातील सातही चेकपोस्टवर कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यांनी किंवा कर्मचाऱ्यांनी पैसे मागितले नसल्याचे या पडताळणीत सत्य ठरले. त्यामुळे आजही खाकी ही रोखठोक कर्तव्य बजावत असल्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी घेतलेल्या सत्व परीक्षेमध्ये स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कर्तव्य बजावत असलेल्या कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्यातर्फे दोन हजार रुपये बक्षीस जाहीर करण्यात आले. कोरोना सारख्या महामार्गाच्या महाभयंकर आजारातदेखील पोलीस प्रशासनाचे कर्मचारी हे कसे रोखठोक कर्तव्य बजावत आहेत याचीच ही पोचपावती असल्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी सांगितले.

गोरेगाव पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या कनेरगाव येथील चौथी तसेच सेनगाव पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या वाढवणा येथील चेकपोस्टवर तर औंढा नागनाथ हद्दीतील रामेश्वर, हटटा पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या हट्टा टी पॉईंट तसेच चिखली, तर वसमत ग्रामीण हद्दीतील जिंतूर फाटा, बाळापुर पोलीस ठाणे हद्दीतील हिवरा फाटा येथील चेक पोस्ट वर तैनात असलेल्या, अधिकारी कर्मचारी यांची पडताळणी केली. या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कोणत्याही विनापरवाना वाहनाला जिल्ह्यांच्या हद्दीत परवानगी दिली नाही.

या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी अतिशय प्रामाणिकपणे त्यांचे कर्तव्य बजावल्यामुळे अधीक्षक योगेश कुमार यांनी शिपाई खांडेकर, पोना ठेंगल, अतुल बोरकर यांना प्रत्येकी एक हजार तर पोकॉ थांगलवाड यांना 2 हजार रुपये बक्षीस जाहीर केले आहे. तर ज्या ज्या चेक पोस्टवर तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांने ये जा करणाऱ्या वाहनांची तपासणी केली नाही. त्या प्रभारी अधिकारी गोरेगाव, वसमत ग्रामीण, बाळापूर यांच्या मार्फतीने योग्य ती कठोर कारवाई करण्याच्या आदेश दिले आहेत. तर जिल्ह्यात असलेल्या चेक पोस्टवर यापुढेही पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांनी आपले कर्तव्य ईमानदारीने पार पाडण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी दिल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.