ETV Bharat / state

ढगाळ वातावरण राजकीय पुढाऱ्यांसाठी पोषक; 'गाठीभेटीं'चा वाढला जोर - राजकीय

शेवटच्या दिवशी ढगाळ वातावरण असल्यामुळे प्रचाराला चांगलीच गती आली आहे. वातावरणात गारवा असल्याने राजकीय पुढाऱ्यांच्या मतदारासोबत गाठीभेटी वाढल्या आहेत.

ढगाळ वातावरण
author img

By

Published : Apr 16, 2019, 4:40 PM IST

हिंगोली - लोकसभा मतदारसंघात आज निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. शेवटच्या दिवशी ढगाळ वातावरण असल्यामुळे प्रचाराला चांगलीच गती आली आहे. वातावरणात गारवा असल्याने राजकीय पुढाऱ्यांच्या मतदारासोबत गाठीभेटी वाढल्या आहेत. गेल्या काही दिवसापासून उष्ण वातावरणात होणारा प्रचार आज शेवटच्या दिवशी गारव्यात सुरू झाल्याने उमेदवारांमध्ये उत्साह संचारला आहे.

ढगाळ वातावरण

हिंगोली लोकसभा मतदारसंघात एकूण 28 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. निवडणूक प्रचाराला चांगलीच रंगत आलेली आहे. विशेष म्हणजे आज प्रचाराचा शेवटचा दिवस असताना वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. आज प्रचाराच्या तोफा थंडावणार असल्याने विविध पक्षाच्या उमेदवारांनी तसेच कार्यकर्त्यांनी आज पहाटेपासूनच मतदारांच्या भेटीगाठी घेण्यावर सर्वाधिक जास्त भर दिला आहे. विशेष म्हणजे विविध भागात प्रचाराचे रथ फिरत असल्याचे दिसून येत आहेत. ढगाळ वातावरण अन् मेघ गर्जना सुरू असल्याने, शक्यतोवर मतदारही बाहेर जाण्याचे टाळत आहेत. त्यामुळे कधी नव्हे, ते मतदार उमेदवारांना घरीच भेटत आहेत. हळद उत्पादक शेतकरी मात्र हळद झाकून ठेवण्यासाठी शेतात धाव घेत आहेत. सध्या हळदीचा सिजन जोरात सुरू आहे. त्यामुळे हळद उत्पादक शेतकरी मात्र घरी सापडणे शक्य नाही. त्यामुळे काही उमेदवारांचे कार्यकर्ते शेतात शेतकऱ्यांचा शोध घेत आहेत. रात्रीपासूनच वातावरणात अचानक बदल झालेला आहे.

हिंगोली लोकसभा निवडणुकीचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. प्रचारासाठी आज शेवटचा दिवस असल्यामुळे जेवढ्या मतदारापर्यंत पोहोचता येईल, तेव्हढा उमेदवाराकडून प्रयत्न केला जात आहे. एव्हढेच नव्हे, तर ज्या भागांमध्ये कधी वळूनही पाहिले नाही, त्या भागात वाहने नेण्यासाठी कार्यकर्त्यांची चांगलीच धडपड दिसून येत आहे. विविध पक्षाचे उमेदवार आज शक्तिप्रदर्शन दाखविण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशाही परिस्थितीमध्ये उमेदवारावर निवडणूक विभागाचे बारकाईने लक्ष आहे.

Intro:हिंगोली लोकसभा मतदारसंघात आज निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस आणि त्यात ढगाळ वातावरण त्यामुळे शेवटच्या दिवशी प्रचाराला चांगलीच गती आली आहे वातावरणात गारवा असल्याने राजकीय पुढाऱ्यांच्या मतदारा सोबत गाठीभेटी वाढल्यात. गेल्या काही दिवसापासून उष्ण वातावरणात होणारा प्रचार आज शेवटच्या दिवशी गारव्यात सुरू झाल्याचे चित्र आहे. सकाळीच हलक्‍या पावसाच्या सरी कोसळल्या त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय.

Body:हिंगोली लोकसभा मतदारसंघात एकूण 28 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत निवडणूक प्रचाराला चांगलीच रंगत आलेली आहे. विशेष म्हणजे आज प्रचाराचा शेवटचा दिवस असताना वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. आज प्रचाराच्या तोफा आज थंडावणार असल्याने विविध पक्षाच्या उमेदवारांनी तसेच कार्यकर्त्यांनी आज पहाटे पासूनच मतदारांच्या भेटीगाठी घेण्यावर सर्वाधिक जास्त भर दिला आहे. विशेष म्हणजे विविध भागात प्रचाराचे रथ फिरत असल्याचे दिसून येत आहेत. तर ढगाळ वातावर अन मेघ गर्जना सुरू असल्याने, शक्यतोवर मतदार ही बाहेर जाण्याचे टाळत आहेत. त्यामुळे कधी नव्हे ते मतदार उमेदवाराना घरीच भेटत आहेत. तर हळद उत्पादक शेतकरी मात्र हळद झाकुन ठेवण्यासाठी शेतात धाव घेत आहेत. सध्या हळदीचा सिजन जोरात सुरू आहे. त्यामुळे हळद उत्पादक शेतकरी मात्र घरी सापडणे शक्य नाही त्यामुळे काही उमेदवारांचे कार्यकर्ते शेतात शेतकऱ्यांचा शोध घेत आहेत. रात्रीपासूनच वातावरणात अचानक बदल झालेला आहे.

Conclusion:हिंगोली लोकसभा निवडणुकीचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. प्रचारासाठी आज शेवटचा दिवस असल्यामुळे जेवढ्या मतदारापर्यंत पोहोचता येईल तेवढा उमेदवाराकडून प्रयत्न केला जात आहे. एवढेच नव्हे तर ज्या भागांमध्ये कधी वळुन ही पाहिले नाही, त्या भागात वाहने येण्यासाठी कार्यकर्त्यांची चांगलीच धडपड दिसून येत आहे. विविध पक्षाचे उमेदवार आज शक्तिप्रदर्शन दाखविण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशाही परिस्थितीमध्ये उमेदवारावर निवडणूक विभागाचे अति बारकाईने लक्ष आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.