ETV Bharat / state

तुटलेल्या विजेच्या तारेने घेतला बैलाचा बळी, 2 दिवसातील दुसरी घटना - बैल

विजेच्या तारेचा स्पर्श झाल्याने एका बैलाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, शनिवारीच एका बैलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे.

तुटलेल्या विजेच्या तारेने घेतला बैलाचा बळी
author img

By

Published : Jun 23, 2019, 5:55 PM IST

हिंगोली - जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाने लावलेल्या हजेरीमुळे वसमत तालुक्यातील बऱ्याच गावांमध्ये विजेचे पोल वाकले आहेत. तर काही ठिकाणी विजेच्या तारा तुटून शेतामध्ये पडल्या आहेत. त्यामुळे विजेच्या तारेचा स्पर्श झाल्याने एका बैलाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, शनिवारीच एका बैलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. त्यामुळे सलग दोन दिवसांत दोन बैलांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून, विद्युत वितरण कंपनीचा भोंगळ कारभार यामुळे पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

तुटलेल्या विजेच्या तारेने घेतला बैलाचा बळी

जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्यामुळे विजेच्या तारा तुटून पडण्याचे प्रमाण वाढले आहे. तर विद्युत वितरण कंपनीकडून तुटलेल्या तारा न जोडता त्यामधील विद्युत प्रवाह सुरूच ठेवला जात आहे. त्यामुळे वसमत तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी जमिनीवर पडलेल्या विद्युत तारेला स्पर्श झाल्याने बैलाचा मृत्यू झाला आहे. शनिवारी इंजनगाव येथील शेतकरी फकीर मंईग यांच्या बैलाचा जमिनीवर तुटून पडलेल्या विद्युत तारेला स्पर्श झाल्याने बैलाचा मृत्यू झाला होता.

Intro:हिंगोली जिल्ह्यात दोन दिवस अधून मधून वादळी वाऱ्यासह हजेरी लावलेल्या पावसामुळे वसमत तालुक्यातील बऱ्याच गावांमध्ये विजेचे पोल वाकले आहेत. तर काही ठिकाणी विजेच्या तारा शेतामध्ये तुटून पडलेल्या अवस्थेत आहेत याच ताराने सलक दोन दिवस बैलांचा बळी घेतलाय. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून, विद्युत वितरण कंपनीचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय.

Body:प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर हिंगोली जिल्ह्यात पाऊस अधून मधून हजेरी लावत आहे सोसाट्याच्या वाऱ्यासह हजेरी लावत असलेल्या पावसाने विजेची तार तुटून पडण्याचे प्रमाण वाढले आहे त्याची विद्युत वितरण कंपनीकडून दुरुस्तीच न करता त्यातून सर्रासपणे विद्युत प्रवाह सुरूच ठेवला जात आहे त्यामुळेच जिल्ह्यातील वसमत तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशीही ही जमिनीवर पडलेल्या तारांना स्पर्श झाल्याने बैल ठार झालाय. तर आदल्या दिवशी इंजनगाव येथील शेतकरी फकीर मंईग यांच्याही बैलाचा जमिनीवर तुटून पडलेल्या ताराने बळी घेतलाय. खरिपाची पेरणी तोंडावर आलेली असताना बैल ठार झाल्यामुळे या दोन्ही शेतकर्‍यांसमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे.

Conclusion:जिल्ह्यात सलग तीन वर्षांपासून अत्यल्प पर्जन्यमान असल्याने यंदाही तीच परिस्थिती निर्माण झालेली आहे थोडाबहुत झालेल्या प्रजेने मानाने शेतकरी सुखावला असून तो शेतीच्या कामाकडे वळला आहे. अशाच परिस्थितीत इंजनगाव येथील कुटूंब मोठ्या आनंदात शेतात कामासाठी बैल गाडीने जात होते. मात्र गावापासून काही अंतरावर जतात तोच जमिनीवर तुटून पडलेल्या विधुत ताराला बौलाच स्पर्श झाला. या शेतकरी व कुटुंब सुदैवाने बचावले. तर दुसऱ्या दिवशी ही विजेचा शॉक लागून बैल दगावला. अजूनही बऱ्याच शेतामध्ये पोल तुटलेल्या अवस्थेत असून विद्युत तारा पसरलेल्या आहेत. खरीप हंगामासाठी शेतकरी रान नीटनेटके करण्यासाठी धडपडत आहेत मात्र शेतामध्ये तुटून पडलेल्या विद्युत तारा मुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.