हिंगोली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज दुसऱ्या पर्वातील सादर केलेले बजट हे सर्वसामान्य अन शेतकरी व व्यापाऱ्यांच्या दृष्टीने विचार करून बजट सादर केलेले आहे. याचा निश्चितच फायदा होणार असून, जीएसटीच्या व व्यापाऱ्यांच्या मध्यमातून आलेल्या त्रुटी दूर केली. कर लावण्यास व्यापाऱ्यांचा कुठला विरोध नाही परंतु कर लावण्याची पद्धती विषयी जे आंदोलन केलं होतं. त्याचा अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी विचार देखील केला आहे. तसेच केंद्र सरकारने दळणवळण आणि सर्वसामान्य लोकांना शुद्ध पाण्याची भरीव तरतूद केली असल्याचे माजी आमदार तथा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष गजानन घुगे यांनी सांगितले.
आरोग्य क्षेत्रासाठी तिप्पट तरतूद-
केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वातील आज पेपरलेस अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात सर्वसामान्य शेतकऱ्यांचा विचार केला असल्याचे माजी आमदार तथा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष यांनी सांगितले आहे. आरोग्य क्षेत्रासाठी तिप्पट तरतूद करण्यात आल्यामुळे निश्चितच याचा आरोग्याशी निगडित असलेल्या सर्वांनाच फायदा होणार आहे. तसेच मुख्य म्हणजे पेट्रोल आणि डिझेलवर लावण्यात आलेला कर हा कृषी साठी वापरण्यात येणार आहे. याचा देखील सर्वाधिक जास्त फायदा हा सर्वसामान्य व शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना होणार आहे.
जीएसटीच्या माध्यमातून सरकारला होणार उत्पन्न-
जीएसटीच्या माध्यमातून सरकारला सर्वात जास्त उत्पन्न मिळणार आहे. मात्र जीएसटी लावताना काहीतरी विचार व्हावा आणि तो विचार या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे याचा व्यापाऱ्याला व सरकारला देखील मोठ्या प्रमाणात फायदा होणार असल्याचे घुगे यांनी सांगितले.
हेही वाचा- अर्थसंकल्पातून महाराष्ट्राचा अपेक्षाभंग - अजित पवार