ETV Bharat / state

Bridge collapsed : चोंढी काठोडा गावा जवळील पुल कोसळला

वसमत तालुक्यातील चोंढी शहापूर ( Chondi Kathoda village ) जवळ असलेला पूल कोसळल्याची घटना ( bridge collapsed ) शुक्रवारी सकाळी 11 च्या सुमारास घडली. घटनेची माहिती नागरिकांना कळताच नागरिकांनी रस्त्यावर झडांच्या फांद्यां टाकून वाहतुक बंद केली.

A bridge collapsed near Chondi Kathoda village
चोंढी काठोडा गावा जवळील पुल कोसळला
author img

By

Published : Oct 21, 2022, 6:03 PM IST

हिंगोली - मागील तीन ते चार दिवसापासून जिल्ह्यामध्ये अधून-मधून पाऊस हजेरी लावत आहे. आज पहाटे दोन वाजेपासून ओंढा नागनाथ तालुक्यातील विविध भागात पावसाने हजेरी ( Rain lashed various parts of Aundha Nagnath taluka ) लावली. याच परिस्थितीमध्ये वसमत तालुक्यातील चोंढी शहापूर ( Chondi Kathoda village ) जवळ असलेला पूल कोसळल्याची घटना ( bridge collapsed ) शुक्रवारी सकाळी 11 च्या सुमारास घडली. घटनेची माहिती नागरिकांना कळताच नागरिकांनी रस्त्यावर झडांच्या फांद्यां टाकून वाहतुक बंद केली. त्यामुळे औरंगाबाद वरून जिंतूर ओंढा मार्गे नांदेड, आंध्र प्रदेशात जाणारी वाहतुक वळवण्यात अली आहे.

चोंढी काठोडा गावा जवळील पुल कोसळला

पुल गेला वाहून - चोंडढी शहापूर येथे मागील अनेक दिवसांपासून पूल मोडकळीस आला होता, शिवाय पुलाला अनेक ठिकाणी तडे देखील गेले होते, आज पहाटे झालेल्या पावसामुळे पालखालून वाहणाऱ्या ओढ्याला पूर आला अन पुलच पूर्णपणे वाहून गेला. हा विदारक प्रकार ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली या मार्गाने येणारी वाहतूक थांबवून घेतली.

रोज धावतात हजारो वाहने - राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या या पुलावरून औरंगाबाद, जिंतूर तसेच आंध्र प्रदेशात रोज हजारो वाहने धावतात, मात्र आज पूल पडल्याने लांब पल्ल्याच्या वाहनधारकांनी मार्ग बदलून कळमनुरी मार्गे निवडला आहे. सध्या झेंडूचे सिजन सुरू असून हैदराबाद येथे झेंडू घेऊन जाणाऱ्या वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे.

प्रशासनाला दिली माहिती - ओंढा नागनाथ तहसीलदार व हट्टा पोलीस ठाण्याला ग्रामस्थांनी माहिती दिली त्यानुसार घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन तहसीलदार कृष्णा कानगुले, नायब तहसीलदार सचिन जोशी, हट्टा पोलीस ठाण्याचे सपोनि गजानन बोराटे,उपनिरीक्षक सतीश तावडे यांनी पथकासह धाव घेतली. दुर्घटना टाळण्यासाठी या भागात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तर नांदेड वरून औरंगाबादकडे जाणारी वाहने वसमत झिरो फाटा मार्गे परभणीकडे वळवण्यात अली आहेत. तर ओंढा मार्गावरून नांदेडकडे जाणारी वाहने नागेश्वरवाडी मार्गे झिरो फाटा मार्गे वळवण्यात अली आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.