ETV Bharat / state

नेत्यांच्या सत्कारासाठी कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; घाई केल्याने अर्धवट फटाके विझवण्याची आली वेळ - हिंगोली भाजप कार्यकर्ते बातमी

कार्यकर्त्यांच्यावतीने फडणवीस यांच्या हिंगोली शहरातील अकोला बायपास येथे सत्काराची जय्यत तयारी केली होती. वाहनांचा ताफा दिसताच कार्यकर्त्यांनी रस्त्याच्या कडेला ठेवलेली फटाक्यांची माळ पेटवूनही दिली. मात्र, फडणवीस यांची गाडी पोहोचलीच नसल्याचे लक्षात येताच पुन्हा पेटती माळ विझवण्यासाठी कार्यकर्त्यांची एकच धावपळ उडाली.

hingoli
घाई केल्याने अर्धवट फटाके विझवण्याची भाजप कार्यकर्त्यांवर वेळ
author img

By

Published : Dec 5, 2020, 7:03 PM IST

हिंगोली - एका विवाह सोहळ्यासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हिंगोलीत आले होते. कार्यकर्त्यांच्यावतीने हिंगोली शहरातील अकोला बायपास येथे सत्काराची जय्यत तयारी केली होती. वाहनांचा ताफा दिसताच कार्यकर्त्यांनी रस्त्याच्या कडेला ठेवलेली फटाक्यांची माळ पेटवूनही दिली. मात्र, फडणवीस यांची गाडी पोहोचलीच नसल्याचे लक्षात येताच पुन्हा पेटती माळ विझवण्यासाठी कार्यकर्त्यांची एकच धावपळ उडाली. तोपर्यंत ताफा पोहोचला अन् पुन्हा फटाक्यांचा आवाज कडकडला. मराठा शिवसैनिक सेनेच्यावतीने फडणवीस यांचा सत्कार केला.

घाई केल्याने अर्धवट फटाके विझवण्याची भाजप कार्यकर्त्यांवर वेळ

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे हिंगोली येथे एका विवाह समारंभासाठी दाखल झाले होते. अचानक हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आलेले फडवणीस यांच्या स्वागताची घाईघाईत तयारी करण्यात आली होती. वाशिम येथून फडणवीसांचा ताफा हिंगोलीकडे रवाना झाला तेव्हापासून, कार्यकर्ते लोकेशन घेत होते. शहराजवळ ताफा आल्याची माहिती मिळताच, हिंगोली शहरातील अकोला बायपास येथे सत्कारांचे आयोजन केले होते. तोच आमदार तान्हाजी मुटकुळे यांची देखील गाडी ताफ्यातच होती. मात्र, समोर गाडी आणत मुटकुळे यांनी कार्यकर्त्यांना फडणवीस यांचा ताफा आल्याची माहिती दिली. तोच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची माळ पेटवून दिली. मात्र, देवेंद्र फडणवीस अजून पोहचलेच नसल्याचे कार्यकर्त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर लगेच कार्यकर्त्यांनी फटाके विझवण्यासाठी एकच धाव घेतली.

पेटते फटाके विझवण्यासाठी घाई

नेत्यांसाठी काहीपण असाच काहीसा ठाम निर्णय घेत, कार्यकर्त्यांनी जीवाची जराही पर्वा न करता साहेब आले नसल्याचे समजताच पेटते फटाके विझवण्यासाठी धाव घेतली. पेटते फटाके असलेली माळ तोडण्याचा प्रयत्न केला जाऊ लागला. त्याला यशही आले. मात्र, तेवढ्यात गाड्यांचा ताफा पोहोचला अन् पुन्हा फटाक्यांचा आवाज दणाणला.

मराठा शिवसैनिक सेनेने केला सत्कार

मराठा शिवसैनिक सेनेच्यावतीने अकोला बायपास येथे सत्कार कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सर्व तयारी देखील केली होती. मंडप, खुर्च्या टाकल्या होत्या, मात्र, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रस्त्यावर गाडीतून उतरत सत्कार स्वीकारला आणि पुढे रवाना झाले. नंतर शहरात नव्यानेच उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक खासगी मेडिकलला भेट दिली. यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, माजी आमदार गजानन घुगे यांच्यासह कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

हेही वाचा - महापरिनिर्वाण दिन : चैत्यभूमीवर गर्दी करू नका, महापौरांचे आवाहन

हेही वाचा - BREAKING: भिवंडीत यंत्रमाग कारखान्याला भीषण आग ; अग्निशमन यंत्रणा घटनास्थळी दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.