ETV Bharat / state

Robbery in Vasmat bank : दरोडा पडल्यानंतर बँक अधिकाऱ्यांकडून प्रसंगावधान; पळून जाताना दरोडेखोरांनी केला गोळीबार

दरोडेखोरांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या मॅनेजरकडे धाव घेऊन बंदुकीतून दोन गोळ्या ( Robbery in Vasmat bank ) झाडल्या. त्यांच्याकडे पैशाची मागणी ( Robbery in Vasmat bank ) केली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. तरी बँकेतील काचा फुटल्या आहेत. बँकेतील कर्मचारी जखमी झाला आहे. दरोडेखोर सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. एका दरोडेखोराचा चेहरा सीसीटीव्हीत स्पष्ट दिसत आहे.

वसमत बँकेत दरोडा
वसमत बँकेत दरोडा
author img

By

Published : Jan 14, 2022, 7:47 PM IST

हिंगोली- जिल्ह्यात लूटमारी दरोड्याच्या घटनेत प्रचंड वाढ झाली आहे. वसमत तालुक्यातील आंबा चोंढी येथे असलेल्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेत दोन दरोडेखोरांनी ( Wasmat Maharashtra Gramin bank robbery ) दोन गोळ्या झाडल्या आहेत. यावेळी एक कर्मचारी जखमी झाला आहे. ही घटना शुक्रवारी ( 14 जानेवारी 2022 ) सायंकाळी ४.४५ वाजता घडली आहे.

दरोडेखोरांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या मॅनेजरकडे धाव घेऊन बंदुकीतून दोन गोळ्या ( Robbery in Vasmat bank ) झाडल्या. त्यांच्याकडे पैशाची मागणी केली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. तरी बँकेतील काचा फुटल्या आहेत. बँकेतील कर्मचारी जखमी झाला आहे. दरोडेखोर सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. एका दरोडेखोराचा चेहरा सीसीटीव्हीत स्पष्ट दिसत आहे.

वसमत तालुक्यातील आंबा चोढी येथील टी पॉईंटवर महाराष्ट्र ग्रामीण बँक आहे. त्या बँकेमध्ये नेहमीप्रमाणे बँकेचा व्यवहार आटोपून बँक अधिकारी इशान खिस्ते ( Bank officer Ishan Khiste ) , रोखपाल नितीन ननवरे, सेवक भद्रदीप सरोदे यांनी संपूर्ण कॅश लॉकरमध्ये ठेवली. ते जाण्याची तयारी करीत असताना दुचाकीवरून आलेल्या तीनपैकी दोघांनी बँकेत प्रवेश केला, त्यांनी थेट व्यवस्थापक खिस्ते यांच्याजवळ धाव घेतली. बंदुकीचा धाक दाखवून पैसे देण्यासाठी ( robbery in Maharashtra gramin bank ) धमकाविले. मात्र, अधिकाऱ्यांनी दरोडेखोरांच्या धमकीला दाद दिली नाही. दरोडेखोरांनी अधिकाऱ्यांना समोर असलेले लॉकर उघडण्यास सांगितले. त्यांनी विविध खातेदारांच्या फायली असलेला लॉकर उघडून दाखविला. बँकेतून कसलीही दाद न मिळाल्याने, दरोडेखोरानी बँकेतून काढता पाय घेतला.
हेही वाचा-Shivsena Mla Dilip Lande : शिवसेना आमदार दिलीप लांडे यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा

जाता -जाता केले बंदुकीतून दोन फायर
दरोडेखोर बँक अधिकाऱ्याकडे पैशाची मागणी करत होते. मात्र, काही पैसे नसल्याचे सांगत दरोडेखोरांनी बँकेतून काढता पाय घेतला. त्यांनी झाडलेल्या दोन गोळ्यांमुळे बँकेचे काच फुटले आहेत. कर्मचारी ननवरे जखमी झाले आहेत. दरोडेखोरांनी दुचाकीवरून पलायन केले. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

हेही वाचा-SSB Jawan Died Bihar : बिहारमध्ये विजेचा शॉक लागून तीन जवानांचा मृत्यू; महाराष्ट्रातील एकाचा समावेश

घटनास्थळी कुरुंदा पोलीस दाखल
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर ( SP M Kalesh Kalasagar ) , अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे ( SP Yashwant Kale ) , सहाय्यक पोलीस अधीक्षक देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. घटनास्थळी कुरुंदा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुनील गोपींनवार व जमादार गजानन भोपे आदींनी धाव घेतली. सीसीटीव्ही ताब्यात घेत दरोडेखोरांचा शोध सुरू केला आहे.

हेही वाचा-No Confidence Motion: मुंबई पालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षांच्या विरोधात भाजपचा अविश्वास ठराव

चोरट्यांचे पोलिसांना आव्हान
हिंगोली जिल्ह्यांमध्ये मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. एवढेच नव्हे तर दिवसाढवळ्या दरोडे पडत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. मात्र, नेहमीच सुरू असलेल्या चोरीच्या घटनांमुळे चोरटे व दरोडेखोर पोलिसांना जणू आव्हानच देत आहेत.

हिंगोली- जिल्ह्यात लूटमारी दरोड्याच्या घटनेत प्रचंड वाढ झाली आहे. वसमत तालुक्यातील आंबा चोंढी येथे असलेल्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेत दोन दरोडेखोरांनी ( Wasmat Maharashtra Gramin bank robbery ) दोन गोळ्या झाडल्या आहेत. यावेळी एक कर्मचारी जखमी झाला आहे. ही घटना शुक्रवारी ( 14 जानेवारी 2022 ) सायंकाळी ४.४५ वाजता घडली आहे.

दरोडेखोरांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या मॅनेजरकडे धाव घेऊन बंदुकीतून दोन गोळ्या ( Robbery in Vasmat bank ) झाडल्या. त्यांच्याकडे पैशाची मागणी केली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. तरी बँकेतील काचा फुटल्या आहेत. बँकेतील कर्मचारी जखमी झाला आहे. दरोडेखोर सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. एका दरोडेखोराचा चेहरा सीसीटीव्हीत स्पष्ट दिसत आहे.

वसमत तालुक्यातील आंबा चोढी येथील टी पॉईंटवर महाराष्ट्र ग्रामीण बँक आहे. त्या बँकेमध्ये नेहमीप्रमाणे बँकेचा व्यवहार आटोपून बँक अधिकारी इशान खिस्ते ( Bank officer Ishan Khiste ) , रोखपाल नितीन ननवरे, सेवक भद्रदीप सरोदे यांनी संपूर्ण कॅश लॉकरमध्ये ठेवली. ते जाण्याची तयारी करीत असताना दुचाकीवरून आलेल्या तीनपैकी दोघांनी बँकेत प्रवेश केला, त्यांनी थेट व्यवस्थापक खिस्ते यांच्याजवळ धाव घेतली. बंदुकीचा धाक दाखवून पैसे देण्यासाठी ( robbery in Maharashtra gramin bank ) धमकाविले. मात्र, अधिकाऱ्यांनी दरोडेखोरांच्या धमकीला दाद दिली नाही. दरोडेखोरांनी अधिकाऱ्यांना समोर असलेले लॉकर उघडण्यास सांगितले. त्यांनी विविध खातेदारांच्या फायली असलेला लॉकर उघडून दाखविला. बँकेतून कसलीही दाद न मिळाल्याने, दरोडेखोरानी बँकेतून काढता पाय घेतला. हेही वाचा-Shivsena Mla Dilip Lande : शिवसेना आमदार दिलीप लांडे यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा

जाता -जाता केले बंदुकीतून दोन फायर
दरोडेखोर बँक अधिकाऱ्याकडे पैशाची मागणी करत होते. मात्र, काही पैसे नसल्याचे सांगत दरोडेखोरांनी बँकेतून काढता पाय घेतला. त्यांनी झाडलेल्या दोन गोळ्यांमुळे बँकेचे काच फुटले आहेत. कर्मचारी ननवरे जखमी झाले आहेत. दरोडेखोरांनी दुचाकीवरून पलायन केले. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

हेही वाचा-SSB Jawan Died Bihar : बिहारमध्ये विजेचा शॉक लागून तीन जवानांचा मृत्यू; महाराष्ट्रातील एकाचा समावेश

घटनास्थळी कुरुंदा पोलीस दाखल
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर ( SP M Kalesh Kalasagar ) , अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे ( SP Yashwant Kale ) , सहाय्यक पोलीस अधीक्षक देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. घटनास्थळी कुरुंदा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुनील गोपींनवार व जमादार गजानन भोपे आदींनी धाव घेतली. सीसीटीव्ही ताब्यात घेत दरोडेखोरांचा शोध सुरू केला आहे.

हेही वाचा-No Confidence Motion: मुंबई पालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षांच्या विरोधात भाजपचा अविश्वास ठराव

चोरट्यांचे पोलिसांना आव्हान
हिंगोली जिल्ह्यांमध्ये मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. एवढेच नव्हे तर दिवसाढवळ्या दरोडे पडत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. मात्र, नेहमीच सुरू असलेल्या चोरीच्या घटनांमुळे चोरटे व दरोडेखोर पोलिसांना जणू आव्हानच देत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.