ETV Bharat / state

प्रवासी ऑटोच्या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू - रस्त्यावरील खड्डे

सेनगाव तालुक्यातील हत्ता येथे प्रवासी ऑटो उलटली. यात चालकाच्या डोक्याला गंभीर मार लागून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

प्रवासी ऑटो
author img

By

Published : Nov 22, 2019, 3:01 PM IST

हिंगोली - जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील हत्ता येथे प्रवासी ऑटोचा अपघात होऊन चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. एकनाथ मुंडे (वय ५०) असे मृत चालकाचे नाव आहे.

मुंडे हे येलदरी येथून प्रवाशी सोडून गावाकडे परतत होते. दरम्यान, सेनगाव ते हत्ता रोडवर ऑटो उलटली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर, ऑटोचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ऑटो जोरात जमिनीवर कोसळल्यामुळे मुंडे यांना त्यावेळी काहीच करता आले नाही.

हेही वाचा - चोरट्यांनी चौथ्यांदा फोडली एकाच मंदिरातली दानपेटी

हिंगोली जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणात रस्त्याचे काम सुरू आहे. जिल्ह्याच्या चारही बाजूने रात्री बेरात्री सुरू असलेल्या या कामांमुळे अपघाताच्या घटना रोजच घडत आहेत. विशेष म्हणजे, या कामामुळे धुळीचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात वाढले असल्यामुळे वाहन चालकांना समोरील वाहन दिसेनासे होते. तर रस्त्यावर जागोजागी खोदलेल्या खड्ड्यांमुळेही वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात होत आहेत. याप्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा नोंदवण्यात आला नसल्याची माहिती आहे.

हेही वाचा - कर्जबाजारीपणाला कंटाळून हिंगोलीत शेतकऱ्याची आत्महत्या, महिन्यातील पाचवी घटना

Intro:

हिंगोली- सेनगाव तालुक्यातील हत्ता येथे उलटलेल्या प्रवासी ऑटोचा अपघात होऊन,चालकाचा जागीच मृत्यू झालाय. ही घटना आज पहाटेच्या सुमारास उघडकीस आलीय.

Body:एकनाथ मुंडे (५०) अस मयताच नाव आहे.मुंडे हे येलदरी येथून प्रवास सोडून गावाकडे परतत होते दरम्यान, सेनगाव ते हत्ता रोडवर ऑटो उलटला. अन जोरात जमिनीवर आदळले. या मध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर ऑटोची ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ऑटो हा जोरात जमिनीवर कोसळल्यामुळे मुंडे यांना काहीच करता आले नाही. हिंगोली जिल्ह्यात रस्त्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे जिल्ह्याच्या चारही बाजूने रात्र बेरात्री सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे अपघाताच्या घटना रोजच घडत आहेत विशेष म्हणजे सुरु असलेल्या रस्त्याच्या कामामुळे धुळीचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात वाढलेय. Conclusion:त्यामुळे चालकांना समोरील वाहन दिसेनासे होत आहे. तर रस्त्यावर जागोजागी खोदलेल्या खड्ड्यांमुळे ही वाहनावरील नियंत्रण सुटत आहेत. त्यामुळे अपघाताच्या घटनेत वाढ होत चालली आहे. या प्रकरणी अजून तरी कोणताही गुन्हा नोंद झालेला नाही.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.