ETV Bharat / state

औंढा नागनाथ मंदिर हे पहिले होत सरोवर; पांडवा जवळील कपिला गायीला होत ज्ञात - shravani somvaar

संपूर्ण भारतात आठवे ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध असलेल्या नागनाथ मंदिर परिसरात वनवासाला निघालेल्या पांडवांचा अधिवास होता, ते या ठिकाणी मुक्कामी होते. पूर्वी मंदिराच्या ठिकाणी सरोवर होते.

ओंढा नागनाथ मंदिर
ओंढा नागनाथ मंदिर
author img

By

Published : Aug 9, 2021, 11:44 AM IST

हिंगोली - संपूर्ण भारतात आठवे ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध असलेल्या औंढा नागनाथ मंदिरामध्ये दर श्रावणी सोमवारी भाविकांची मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी होतेय, या ठिकाणी जिल्ह्यातूनच नव्हे तर परराज्यातून भाविक दर्शनासाठी आवर्जून धाव घेतात. नेमकं काय आहे? 'ईटीव्ही' भारतचा स्पेशल रिपोर्ट.

ओंढा नागनाथ मंदिर

हा आहे औंढा नागनाथचा इतिहास

संपूर्ण भारतात आठवे ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध असलेल्या नागनाथ मंदिर परिसरात वनवासाला निघालेल्या पांडवांचा अधिवास होता, ते या ठिकाणी मुक्कामी होते. पूर्वी मंदिराच्या ठिकाणी सरोवर होते. पांडवाकडे असलेल्या कपिला गायीला या सरोवरात असलेले नागनाथाचे लिंग माहीत होते. गाय नियमित सरोवरात जाऊन, त्या नागनाथाच्या लिंगावर दूधाच्या धारा टाकत असे. जेव्हा गाय सरोवरातून बाहेत येत होती. तेव्हा मात्र तिचे दूध कमी होत असल्याचे भीमाच्या लक्षात येत होते, नेमका हा प्रकार आहे तरी काय ? याचा शोध घेण्याचा प्रयत्न पांडवा सोबत असलेल्या भीमाने घेतला. एकर दिवशी भीमाने त्या कपिला गायीच्या पाठीमागे जाण्याचा अतोनात प्रयत्न केला. मात्र, भीम त्या लिंगापर्यंत पोहोचू शकला नाही. त्यामुळे भीमाने हा सर्व प्रकार कृष्णाला सांगितला. तेव्हा कृष्णाने आत असलेल्या नागनाथाच्या लिंगासंदर्भात माहिती दिली.

कृष्णाने सांगितला मार्ग
कपिला गायीमुळे आश्चर्यचकित होऊन हा सर्व प्रकार कृष्णाजवळ सांगितला. त्यावर कृष्णाने आत असलेल्या ज्योतिर्लिंगाची माहिती दिली. त्यानुसार त्या ठिकाणी जायचं असल्यास तुझ्याकडे असलेल्या गद्याचे चार प्रहार या सरोवरवर करण्याच्या सूचना कृष्णाने भीमाला दिल्या. त्यानुसार कृष्णाच्या सूचनांचे पालन करीत भीमाने त्या सरोवरावर गद्याचे चार प्रहार केले. तर जोतिर्लिंग प्रकट झाले. लिंग प्रकट होताच संपूर्ण पृथ्वी ही तेजोमय झाली होती.

ज्योतिर्लिंग म्हणजे......?
ज्योतिर्लिंग म्हणजे देवाच साक्षात आत्मलिंग, अन ते आत्मलिंग जेव्हा याठिकाणी प्रगट झाले तेव्हा संपूर्ण पृथ्वी ही तेजोमय झाली होती, हे तेज कमी करण्यासाठी पांडवांनी प्रार्थना केली आणि देवाला प्रसन्न केलं व आकाशवाणी द्वारे धर्मराजाला आदेश दिला की तामिळनाडू मध्ये असलेले रामेश्वराचे स्थान तेथे असलेल्या समुद्र संघमतील गंडकी एकेविस मोड रेती आणून या लिंगावर ठेवायची, तेव्हा कुठे याचे तेज रेती मध्ये स्मिथ होऊन तेज कमी होईल अन या ठिकाणी दर्शनीय व पूजनीय लिंग प्रकट होईल असे देवाने सांगितल्याचे पुजारी कृष्णा ऋषी पुरोहित यांनी सांगितले.

पुजाऱ्यासोबत केली पूजा
पुजाऱ्यासोबत केली पूजा
.....तर सात जन्माची पापे या ठिकाणी प्रकट झालेल्या लिंगाला स्पर्श केल्यानंतर सात जन्माची पापे ही धुवून असल्याचे देवाने सांगितल्याने पुजारी कृष्णा ऋषी पुरोहित यांनी सांगितले. त्यामुळे नागनाथाच्या लिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविक राज्यातून मोठ्या संख्येने दाखल होतात. आणि विशेष म्हणजे श्रावण महिन्यामध्ये या ठिकाणी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून कोरोनामुळे येथील मंदिराचे दार हे बंद करण्यात आलेले आहे. त्यामुळे भाविकांचा प्रचंड हिरमोड होत आहे. यंदाही मंदिराचे दार कुलूप बंदचकोरोना महामारी मुळे संपूर्ण जगावर संकट आलेले आहे त्याच अनुषंगाने हिंगोली जिल्हा देखील याचा फटका सहन करावा लागतोय. श्रावण महिन्यात औंढा नागनाथ येथे भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी होते. मात्र, धोरणामुळे या मंदिराचे द्वार बंद ठेवण्यात आलेले आहे. त्यामुळे भाविकांना या ठिकाणी दर्शनासाठी बंदी घालण्यात आलेली आहे. याप्रमाणे सोमवारी पहाटे सहा वाजता नागनाथाची शासकीय पूजा तहसीलदार तथा संस्थान अध्यक्ष डॉ. कृष्णा कानगुले यांच्या हस्ते पार पडली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.