ETV Bharat / state

आठवे ज्योतिर्लिंग औढा नागनाथ मंदिर दर्शनासाठी खुले - औढा नागनाथ मंदिर दर्शनासाठी खुले

आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औढा नागनाथ मंदिराचे द्वार आज भाविकांसाठी खुले झाले आहे. मात्र, कोरोनाचा धोका अद्याप टळल्या नसल्याने राज्य शासनाकडून नियमावली जारी करत दर्शनासाठी मंदिरे खुली करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

आठवे ज्योतिर्लिंग औढा नागनाथ मंदिर दर्शनासाठी खुले

author img

By

Published : Nov 16, 2020, 7:59 PM IST

हिंगोली - राज्यातील मंदिर आणि धार्मिक प्रार्थनास्थळे आजपासून खुली झाली आहेत. त्याच प्रमाणे बारा ज्योतिर्लिंगा पैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औढा नागनाथ मंदिराचे द्वार आज भाविकांसाठी खुले झाले. दर्शनाला येणाऱ्या भाविकांना काही नियमांच्या चाकोरीत राहूनच दर्शन घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. दरम्यान आज मंदिर खुले होताच भाविकांनी मोठ्या उत्साहाने दर्शनासाठी नियमांच्या अधीन राहून उपस्थिती लावली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तब्बल आठ महिन्यानंतर दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर संपूर्ण राज्यातील मंदिराची दारे भाविकांना दर्शनासाठी उघडण्यात आली आहेत. भाविक देवाच्या दर्शनासाठी फार आतुर झालेले होते. मात्र कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य शासनाने मंदिराची दारे बंद ठेवली होती. यातून बऱ्या पैकी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी यश देखील आलेले आहे.

आठवे ज्योतिर्लिंग औढा नागनाथ मंदिर दर्शनासाठी खुले

इतिहास जाणून घेण्यासाठी येतात भाविक-

हिंगोली जिल्ह्यातील औढा नागनाथ येथे असलेल्या नागनाथाच्या दर्शनासाठी पर राज्यातून देखील भाविक आवर्जून हजेरी लावतात. या मंदिरावर करण्यात आलेले कोरीव काम भाविकांना भुरळ घालते. तसेच या कोरीव कामातून संपूर्ण इतिहास देखील सांगितला जात असल्याचेही येथील जुने लोक सांगतात. त्यामुळेच येथील इतिहास जाणून घेण्यासाठी भाविक आवर्जून हजेरी लावतात. मात्र, कोरोनाचा धोका अद्याप टळल्या नसल्याने राज्य शासनाकडून नियमावली जारी करत दर्शनासाठी मंदिरे खुली करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर औढा नागनाथ मंदिरासाठी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी नियमावलीचे पत्र जारी केले आहे.

भाविकांसाठी बंधनकारक नियम-

  • मंदिराच्या प्रवेशद्वारावरच हात सॅनिटायझर, थर्मल स्क्रिनिंग बंधनकारक
  • मंदिर परिसरात फक्त लक्षणे नसलेल्या व्यक्तींनाच प्रवेश देण्यात येईल.
  • 'नो मास्क नो इन्ट्री' - मंदिरात प्रवेश करणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर चेहरा पट्टी बंधनकारक
  • भाविकांनी त्यांची पादत्राणे वाहनातच किंवा मंदिर प्रशासनाच्या वतीने नेमुन दिलेल्या ठिकाणीच ठेवावीत
  • मंदिर परिसरात असलेल्या बाहेरील सर्व दुकानात सामाजिक अंतराचे पालन बंधनकारक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.