ETV Bharat / state

हिंगोलीच्या पालकमंत्रीपदी अतुल सावे; विकास कामाना गती येण्याची शक्यता - guardian minister

विधिमंडळाचे अधिवेशन संपताच राज्य शासनाने नव्या पालकमंत्र्याच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत .  त्यानंतर जवळपास 24 दिवसांपासून रिक्त असलेल्या हिंगोलीच्या पालकमंत्री पदावर सावे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

फोटो सौजन्य- अतुल सावे अधिकृत ट्विटर खाते
author img

By

Published : Jul 6, 2019, 9:11 AM IST

हिंगोली- दिलीप कांबळे यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळाल्यानंतर हिंगोली जिल्ह्यासाठी नवीन पालक मंत्री म्हणून कोणाची वर्णी लागणार, याकडे हिंगोलीकरांचे लक्ष लागले होते. शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अतुल सावे यांची नियुक्ती केल्याचे आदेश शासन निर्णयाद्वारे काढले आहेत. नव्याने नियुक्त झालेल्या पालकमंत्र्यांमुळे हिंगोली जिल्ह्यातील विकास कामांना गती येईल, अशी अपेक्षा हिंगोलीकरातून व्यक्त होत आहे.

तत्कालीन पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी जिल्ह्यात केवळ आश्वासने दिली. तसेच अधिकाऱ्यांनाही चांगलेच धारेवर धरले होते. तसेच ज्या गावात भेट देतील त्या गावातील ग्रामस्थांची स्तुति करून सोडत असत. त्यांच्याच या शैलीवर ग्रामस्थ देखील जाम खुश होत होते.

विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला 11 जून रोजी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला. यामध्ये भाजपच्या सहा मंत्र्यांना वगळत हिंगोलीचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांना देखीव डच्चू दिला. कांबळे यांच्याकडून राजीनामा घेतला. विधिमंडळाचे अधिवेशन संपताच राज्य शासनाने नव्या पालकमंत्र्याच्या नियुक्त्या जाहीर केल्या. त्यानंतर जवळपास 24 दिवसांपासून रिक्त असलेल्या पालकमंत्री पदावर सावे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

औरंगाबादचे आमदार आणि नवनियुक्त उद्योगमंत्री अतुल सावे हिंगोली जिल्ह्याचे, तर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे चंद्रपूर सोबत गडचिरोलीचे, रवींद्र चव्हाण हे भंडारा आणि गोंदिया या दोन जिल्ह्याचे, परिणय फुके आणि डॉ. अनिल बोडे अमरावतीचे, संजय कुटे बुलडाण्याचे तर उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

आता हिंगोली जिल्ह्याला नव्याने मिळालेल्या पालकमंत्र्याकडून मात्र विकासाची खुप अपेक्षा आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सप्टेंबर महिन्याच्या 15 तारखेनंतर कधीही लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे नव्या पालकमंत्र्यांना आता आपापल्या जिल्ह्यांमध्ये कामे करण्यासाठी अडीच महिन्याचा कालावधी मिळणार आहे. निदान या कालावधीमध्ये पालकमंत्र्यांना आपल्या जिल्ह्यातील अविकसित कामाची माहिती घेणे योग्य ठरणार आहे.

Intro:दिलीप कांबळे यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळाल्यानंतर हिंगोली जिल्ह्यासाठी नवीन पालक मंत्री म्हणून कोणाची वर्मी लागणार, याकडे हिंगोलीकरांचे लक्ष लागले होते. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या आदेशानुसार हिंगोली जिल्ह्यासाठी अतुल सावे यांची पालकमंत्री म्हणून नियुक्ती केल्याचे आदेश शासन निर्णयाद्वारे काढले आहेत. नव्याने नियुक्त झालेल्या पालक मंत्र्यांमुळे य हिंगोली जिल्ह्यातील विकास कामांना गती येईल अशी अपेक्षा हिंगोलीकरातून व्यक्त होत आहे.

Body:तत्कालीन पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी जिल्ह्यात केवळ आश्वासने देत दुसऱ्याच्याच फोन अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले होते. तर ज्या गावात भेट देतील त्या गावातील ग्रामस्थांची स्तुति करून सोडत असत. त्यांच्याच या शैलीवर ग्रामस्थ देखील जाम खुश होत होते. जवळपास 24 दिवसापासून रिक्त असलेले पालकमंत्री पद आज भरण्यात आले. विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला 11 जून रोजी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला. यामध्ये भाजपच्या सहा मंत्र्यांना वगळत हिंगोलीचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांना देखीव डीचू दिला. कांबळे यांच्याकडून राजीनामा घेतला. विधिमंडळाचे अधिवेशन संपताच राज्य शासनाने नव्या पालकमंत्र्याच्या नियुक्त्या जाहीर केल्या.

Conclusion:औरंगाबाद चे पूर्वी चे आमदार अन नवनियुक्त उधोग राज्यमंत्री अतुल सावे हिंगोली जिल्ह्याचे, तर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे चंद्रपूर सोबत गडचिरोलीचे पालकमंत्री तर रवींद्र चव्हाण हे भंडारा आणि गोंदिया या दोन जिल्ह्याचे तर परिणय फुके अन डॉ. अनिल बोडे अमरावती. संजय कुटे बुलढण्याचे तर उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री. आता हिंगोली जिल्ह्याला नव्याने मिळालेल्या पालकमंत्र्याकडून मात्र विकासाची खुप अपेक्षा आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सप्टेंबर महिन्याच्या 15 तारखेनंतर कधीही लागण्याची शक्यता असल्यामुळे नव्या पालकमंत्र्यांना आता आपापल्या जिल्ह्यांमध्ये कामे करण्यासाठी अडीच महिन्याचा कालावधी मिळणार आहे. निदान या कालावधीमध्ये पालकमंत्र्यांना आप आपल्या जिल्ह्यातील अविकसित कामाची माहिती घेणे योग्य ठरणार आहे.

अतुल सावे यांचा आपल्या फाइल मधील फोटो वापरणे
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.