ETV Bharat / state

खुनातील आरोपीचा विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न; उपचार सुरू - विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न

रागाच्या भरात भावजईच्या डोक्यात कुऱ्हाड मारुन खून करणाऱ्या युवकाने विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना हिंगोली जिल्ह्यात घडली आहे. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Attempted suicide
विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न
author img

By

Published : Jul 23, 2020, 8:39 PM IST

हिंगोली- तालुक्यातील जोरताळा येथे वाहिनीचा रागाच्या भरात खून करुन पळून गेलेल्या दिराने विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णलायात उपचार सुरू आहेत. तर रुग्णालयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

रामेश्वर उर्फ माधव जाधव याने रागाच्या भरात शेतामध्ये जेवण्यासाठी बसलेल्या सविता संजय जाधव (30) या भावजईच्या डोक्यात कुऱ्हाड हाणून खून केला, अन तेथे असलेल्या इतर महिलांनाही हा धमकी देऊन पळून गेला होता. याप्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात आरोपी रामेश्वर उर्फ माधव जाधव याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. नंतर यांनी भीतीपोटी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र त्याला नातेवाईकांनी ताब्यात घेत जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या सदरील आरोपीवर सामान्य रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत. त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल असल्याने जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात पोलिसांचा चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

सदरील घटनेने जोडतळा या गावात चांगलेच भयभीत वातावरण निर्माण झालेले आहे. आरोपी दीर हा चांगलाच रागीट होता. घटनेच्या तीन दिवसापूर्वी आरोपी व मयत मुलांच्या खेळण्या वरून भांडणे झाले होते. हा राग आरोपीने डोक्यात धरला होता. त्याने शेवटी शेतात खुरपणी साठी गेलेल्या वहिनीचा डोक्यात कुऱ्हाड घालून काटा काढला. रागाच्या भरात मुले पोरकी झाल्यामुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.