ETV Bharat / state

योजनांच्या नावाखाली काँग्रेसने केवळ स्वतःचेच पोट भरले - योगी आदित्यनाथ

या मोदी-देवेंद्र फडवणीस सरकारच्या नेतृत्वात सर्व सुरक्षित आहेत. नाहीतर, दहशतवाद व नक्षली हल्ले वाढले असते. विकास करण्यासाठी अन दहशतवाद, भ्रष्टाचार रोखण्यासह राष्ट्रवाद जपण्यासाठी भाजप सरकार पुन्हा एकदा सत्तेत आणणे गरजेचे असल्याचे योगी आदित्यनाथ म्हणाले.

योगी आदित्यनाथ
author img

By

Published : Oct 14, 2019, 1:12 PM IST

हिंगोली - 'काँग्रेस सरकार पंधरा वर्षे सत्तेत राहिली असली तरीही त्यांनी जनतेची तर कामे केलीच नाहीत शिवाय विकासाच्या नावाने ही बोंबाबोंब. उलट योजनांच्या नावाखाली स्वतःचीच पोटे भरली,' अशी टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली. ते महायुतीचे उमेदवार तानाजी मुटकुळे यांच्या प्रचारासाठी हिंगोलीत आले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 370 कलम हटवून एक संघ राष्ट्र निर्माण केले आहे वास्तविक पाहता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा देखील या 370कलम ला विरोध होता मात्र काँग्रेसच्या काळात ते कलम रद्द होऊ शकलं नाही. परंतु या महायुतीच्या सरकारच्या काळामध्ये ते 370 कलम गृहमंत्र्यांनी रद्द केले.

या मोदी-देवेंद्र फडवणीस सरकारच्या नेतृत्वात सर्व सुरक्षित आहेत. नाहीतर, दहशतवाद व नक्षली हल्ले वाढले असते. विकास करण्यासाठी अन दहशतवाद, भ्रष्टाचार रोखण्यासह राष्ट्रवाद जपण्यासाठी भाजप सरकार पुन्हा एकदा सत्तेत आणणे गरजेचे असल्याचे योगी आदित्यनाथ म्हणाले.

हेही वाचा - मोदींनी ५ वर्षांत जे देशाचे नुकसान केले, ते काँग्रेसने कधीच केले नाही - राहुल गांधी

महाराष्ट्रात काँग्रेसचे सरकार होते. मात्र या सरकारच्या काळात सर्वसामान्यापर्यंत योजना तर पोहोचल्याच नाहीत अनेक कुटुंबे योजनांपासून वंचितच आहेत. मात्र, या महायुतीच्या सरकारच्या काळामध्ये योजना ह्या प्रत्येकापर्यंत कशा पोहोचतील याचाच वारंवार प्रयत्न केला जात आहे. काँग्रेसने केवळ योजनांच्या नावाने स्वतःचीच पोटे भरून सर्वसामान्यांना वाऱ्यावर सोडले. मात्र आमच्या सरकारच्या काळात आयुष्यमान भारत स्टार्ट अप इंडिया, उज्वल योजना सौभाग्य योजना, प्रधानमंत्री आवास योजना यांच्या माध्यमातून योजना सर्वसामान्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. तसेच वर्षानुवर्ष असलेले मराठा आरक्षण मिळवून देण्यासाठीही प्रयत्न केले आहेत. एवढी विकासात्मक कामे भाजप करीत असेल तर मतदान मागण्याचा अधिकार आम्हाला नक्कीच आहे,' अशी साद घालत या विधानसभा निवडणुकीत महायुतीला सहकार्य करण्याचे आवाहन केले.

दरम्यान, राष्ट्रवादीचे रामराम वडकूते हे 15 ऑक्टोबरला प्रवेश करणार असल्याची चर्चा पुन्हा जोरदार रंगत आहे. विद्यमान आमदार तान्हाजी मुटकुळे, बाबाराव बांगर, दिवाकर माने उपस्थित होते.

हेही वाचा - चंद्रकांत पाटलांच्यात दम होता, तर 'तेथे' का हिसका दाखवला नाही - अण्णासाहेब डांगे

Intro:काँग्रेस सरकार पंधरा वर्षे सत्तेत राहिली असली तरीही त्यांनी जनतेची तर कामे केलीच नाहीत शिवाय विकासाच्या नावाने ही बोंबाबोंब मात्र योजनांच्या नावाखाली स्वतःचीच पोटे भरली असल्याची घणाघाती टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ह महायुतीचे उमेदवार तान्हाजी मुटकुळे यांच्या प्रचारार्थ हिंगोली येथे झालेल्या जाहीर सभेत केली. एवढेच नव्हे तर महायुतीच हे सरकार सर्वांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे योजनेच्या माध्यमातून हे सरकार प्रत्येकापर्यंत जर पोहोचत असेल तर मग आम्हाला मतदान मागण्याचा अधिकार का नाही अशी साद घालत महायुतीला मतदान करण्याचे आव्हाहन केले.

Body:सातशे वर्षांपूर्वी शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली त्याच शिवाजी महाराजांच्या संकल्पनेची परंपरा पुढे नेण्याचं काम भाजप सरकार करत आहे. एवढेच नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 370 कलम हटवून एक संघ राष्ट्र निर्माण केले आहे वास्तविक पाहता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा देखील या 370कलम ला विरोध होता मात्र काँग्रेसच्या काळात ते कलम रद्द होऊ शकलं नाही. परंतु या महायुतीच्या सरकारच्या काळामध्ये ते 370 कलम गृहमंत्र्यांनी रद्द करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न पूर्ण केले आहे. तसेच हे सरकार केवळ 370 कलम रद्द करण्यापुरतेच नव्हे तर काश्मीर येथे विकासाची कामे देखील मोदी सरकारने केली आहेत. या संताच्या भूमीतील संत नामदेव आणि भागवत धर्माचा देशभर प्रसार केला आजही नामदेवाचा संदेश हा मोलाचा आहे या भूमीचे भाग्य आहे कारण की या भूमीमध्ये राष्ट्रसंत नानाजी देशमुख यांचे जन्मस्थान आहे. अन त्या नानाजी देशमुख यांनी त्यांच्या कार्याची सुरुवातही माझ्या मतदार संघातील म्हणजेच गोरखपुर येथून केली आहे. महाराष्ट्र मध्ये काँग्रेसचे सरकार होते मात्र या सरकारच्या काळात सर्वसामान्यापर्यंत योजना तर पोहोचल्याच नाहीत अनेक कुटुंब योजनांपासून वंचितच आहेत मात्र या महायुतीच्या सरकारच्या काळामध्ये योजना ह्या प्रत्येकापर्यंत कशा पोहोचतील याचाच वारंवार प्रयत्न केला जातोय, काँग्रेसने केवळ योजनांच्या नावाने स्वतःचीच पोटे भरून सर्वसामान्यांना वाऱ्यावर सोडले आहे. मात्र आमच्या सरकारच्या काळात आयुष्यमान भारत स्टार्ट अप इंडिया उज्वल योजना सौभाग्य योजना प्रधानमंत्री आवास योजना च्या माध्यमातून योजना सर्वसामान्या पर्यन्त पोहोचविण्याचा प्रयत्न केला. तसेच वर्षानुवर्ष असलेले मराठा आरक्षण मिळवुन देण्यासाठी देखील प्रयत्न केले आहेत. एवढे विकासात्मक कामे जर भाजप करीत असेल तर मतदान मागण्याचा अधिकार ही भाजपलाच काही नाही. अशी साद घालत या विधानसभा निवडणुकीत महायुतीला सहकार्य करण्याचे आव्हाहन केले.

Conclusion:या मोदी देवेंद्र फडवणीस सरकारच्या नेतृत्वात सर्व सुरक्षित आहेत. नसता खुप आतंकवाद व नक्षली हल्ले वाढले असते. भाजप सरकारने लक्ष लिहले रोखण्यास यासंदर्भात मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले आहेत. अजून विकास करण्यासाठी अन आतंकवाद, भ्रष्टाचार रोखण्यासह राष्ट्रवाद जपण्यासाठी भाजप सरकार पुन्हा एकदा सत्येत आणणे गरजेचे असल्यासचे योगी आदित्यनाथ यांनी जाहीर सभेत सांगितले. भाजपात प्रवेश करणाऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते, मात्र कोणी ही प्रवेश केला नाही. राष्ट्रवादीचे रामराम वडकूते हे 15 ऑक्टोबर रोजी प्रवेश करणार असल्याची चर्चा पुन्हा जोरदार रंगत आहे. व्यासपीठावर विद्यमान आमदार तान्हाजी मुटकुळे, नप अध्यक्ष बाबाराव बांगर, दिवाकर माने आदींची उपस्थिती होती. यावेळी व्यासपीठावरील नेत्यावर जनता बारकाईने लक्ष ठेऊन होती.

या बातमीचे व्हिज्युअल वेब मोजो ने अपलोड करतोय

प्लिज बातमीत ad करावे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.