ETV Bharat / state

अन्नपूर्णाबाईचे पक्क्या घराचे स्वप्न होणार पूर्ण

अन्नपूर्णा धुळे ह्या ओंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी येथील रहिवासी आहेत. त्यांना दोन मतिमंद मुले असून, या मुलामुळे अन्नपूर्णाबाईला पतीने सोडून दिलेय. तरी देखील अन्नपूर्णा अजिबात खचून गेल्या नाहीत, काबाड कष्ट करून दोन्ही ही मतिमंद मुले लहानाची मोठी केली.

Annapurna's dream of permanent home will complete true
अन्नपूर्णाबाईचे पक्क्या घराचे स्वप्न होणार पूर्ण
author img

By

Published : Jun 18, 2021, 11:54 AM IST

हिंगोली - पतीने सोडून दिलेल्या अन्नपूर्णाबाई धुळे या त्यांच्या दोन मतिमंद मुलासोबत राहातात. मतीमंद मुलांसोबत एकाकी राहणाऱ्या अन्नपूर्णाबाई धुळे या धाडसी महिलेची विविध प्रसार माध्यम व सोशल मीडियावरून मांडलेल्या कैफियतिची दखल घेऊन तीन ही मायलेकरांचे निराधार योजनेचे प्रस्ताव मंजूर केले असून, मुख्य म्हणजे रमाई घरकुल योजनेतुन निवड करण्यात आलीय. त्यामुळे अन्नपूर्णाबाईचे पक्क्या घराचे ही स्वप्न पूर्ण होणार आहे.

तीनही जणांचे निराधार योजनेतून प्रस्ताव मंजूर -

अन्नपूर्णा धुळे ह्या ओंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी येथील रहिवासी आहेत. त्यांना दोन मतिमंद मुले असून, या मुलामुळे अन्नपूर्णाबाईला पतीने सोडून दिलेय. तरी देखील अन्नपूर्णा अजिबात खचून गेल्या नाहीत, काबाड कष्ट करून दोन्ही ही मतिमंद मुले लहानाची मोठी केली. गावातील बऱ्याच जणांनी जमेल तेवढी मदत करण्याचा प्रयत्न केला. तिची धडपड ही वाखण्याजोगी आहे. दोन मुले मतिमंद अन् घर पडके ही दयनीय अवस्था विविध प्रसार माध्यमांनी दाखविली. तोच बऱ्याच जणांनी या कुटुंबाला मदत केली. प्रशासनाला देखील पाझर फुटला अन् तहसीलदार कृष्णा कानगुले यांनी तीनही जणांचे निराधार योजनेतून प्रस्ताव मंजूर केले आहेत. राहिलेला पक्क्या घराचा प्रश्न तो देखील आता रमाई घरकुल योजनेत निवड झाल्यामुळे सुटला आहे.

गटविकास अधिकाऱ्यांनी केला प्रस्ताव मंजूर -

अन्नपूर्णाबाई यांची ही कैफियत मन हेलावून टाकणारी असून, तिच्या या धाडसाचे कौतुक देखील केले जात आहे. या कुटुंबाला आधार देण्यासाठी गावातील प्रत्येक जण तर धावून येतच आहे. सोबतच इतर ही जिल्ह्यातील अनेकांनी मदत केलीय. तर गुरूवारी ओंढा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जगदीश साहू यांनी महिलेच्या घरी इतर कर्मचाऱ्यांसोबत धाव घेऊन रमाई घरकुल योजनेत प्रस्ताव मंजूर केलेल्या आदेशाची एक प्रत अन्नपूर्णाबाई यांना देण्यात आलीय. यावेळी विस्तार अधिकारी प्रदीप बोंढारे तसेच सामाजिक कार्यकर्ते बापूराव घोंगडे, सचिन रीठे, अभियंता कोकडवार, चंद्रशेखर उजेड मुख्याध्यापक अवसरमले, शेख बाबुभाई, बेबीताई खिलारे आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

हेही वाचा - हिंगोली लोकसभा मतदारसंघातील दहा हजार घरकुलांसाठी 50 कोटीचा निधी मंजूर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.