ETV Bharat / state

शेतकऱ्यांनो सावधान! सोयाबीन पिकावर चक्रीभुंगा येतोय; कृषी विभागाचे काळजी घेण्याचे आवाहन - agri dept appeal for pest control

सोयाबीन पिकावर चक्रीभुंगा किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची काळजी योग्य पध्दतीने घेत वेळीच यावर नियंत्रण मिळवून नुकसान टाळण्याचे आवाहन कृषी विभाच्या वतीने तालुका कृषी अधिकारी संतोष बेनटेवाड यांनी केले आहे.

gridle beetle
सोयबीन वर चक्रीभुंगा किडीचे संकट
author img

By

Published : Jul 26, 2020, 9:50 AM IST

हिंगोली- वेगवेगळी संकटे यावर्षी शेतकर्‍यांचा काही केल्या पिच्छा सोडत नाहीयेत. अगोदरच कोरोनामुळे हवालदिल झालेला शेतकरी पर्जन्यमानाने हादरून गेला आहे. खरिपाची पिके अति पावसातून वाचलीत. मात्र, आता त्यावर किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. मुख्य म्हणजे सोयाबीन पिकावर चक्रीभुंगा किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची काळजी योग्य पध्दतीने घेत वेळीच यावर नियंत्रण मिळवून नुकसान टाळण्याचे आवाहन कृषी विभाच्या वतीने तालुका कृषी अधिकारी संतोष बेनटेवाड यांनी केले आहे.

शेतकऱ्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. सतत पाऊस सुरू असल्यामुळे शेती पिकांचे तर अतोनात नुकसान होतच आहे. शिवाय नदीनाले ओढ्यालगत असलेल्या शेतजमिनीतील खरीपाची पिके ही खरडून जात असल्याचेही चित्र जिल्ह्यात पाहायला मिळाले आहे. या संकटातून वाचलेल्या खरिपाच्या पिकांवर किडीचा प्रार्दुभाव वाढला आहे. शेतकऱ्यावंर आलेले हे मोठे संकट आहे. या संकटामुळे सोयाबीनचे प्रचंड नुकसान होण्याची शक्यता असल्याने, कृषी विभाग शेतकऱ्यांना जागृत करण्याचा प्रयत्न करत आहे.

चक्रीभुंगा असा करतोय सोयाबीनच्या देठाचे नुकसान

चक्रीभुंगाची मादी ही सोयाबीनच्या काडीमध्ये तीन छिद्र करते, मादी भुंगा हा पानाच्या देठावर, फांदीवर किंवा खोडावर दोन चक्राकार भाग तयार करते. तर थोड्या दिवसानंतर अळी ही अंड्यातून बाहेर निघून पानाच्या देठात शिरते, आतील भाग खाऊन झाड पोकळ बनवते. अळी 19- 22 मिमी लांब गुळगुळीत पिवळसर रंगाची असते.

चक्रीभुंगा किडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ही कीटकनाशके वापरण्याचे आवाहन

ट्रायझोफास 40 ईसी 12 मि. ली, किंवा इथिऑन 50 ईसी 30 मि. ली, किंवा थावाक्लोप्रिड 21.7 cs 6 मी. ली किंवा प्रोफेनोफॉस 20 मि ली, किंवा संयुक्त कीटकनाशक थायोमियाक्झाम 12. 60 टक्के अधिक लॅंम्बडा साहेलोथ्रीन 9. 50 टक्के zc 2. 5 मि ली या पैकी कोणतेही कीटकनाशके 10 लिटर पाण्यामध्ये वापरून सोयाबीन वर फवारणी केली तर सोयाबीनवर कोणत्याही किडीचा प्रादुर्भाव होणार नाही. विशेष करून, चक्रीभुंगा तर सोयाबीन कडे वळून देखील पाहणार नाही. अन सोयाबीन च्या उताऱ्यात मोठ्या प्रमाणांत वाढ होण्यास मदत होईल, असे कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.