ETV Bharat / state

...अखेर 28 ते 30 तासानंतर सापडला बेपत्ता शंकरचा मृतदेह सापडला; बचाव पथकास यश

शंकर भोयर हा रविवारी पहाटे सहाच्या सुमारास आपल्या मित्रासमवेत टनका येथील पैनगंगा नदीच्या कट्ट्यावर पोहण्यासाठी येत असे. नेहमीप्रमाणे चार ते पाच मित्रांसोबत पोहण्यासाठी गेला होता. त्याने एक दोन वेळा उडी घेतली. तो बाहेर ही आला. मात्र, त्याने पुन्हा उडी घेतल्यानंतर तो बाहेर आलाच नाही. यानंतर त्याचा शोध घेतला. मात्र, तो मिळून आला नाही. त्याच्यासोबत आलेल्या सहकाऱ्यांनी ही माहिती ग्रामस्थांना कळविली. दिवसभर शोध घेतल्यावरही तो आला नव्हता.

author img

By

Published : Sep 9, 2019, 6:08 PM IST

याच ठिकाणी पोहताना शंकरचा मृत्यू झाला.

हिंगोली - जिल्ह्यातील टनका येथील पैनगंगा नदीवर पोहण्यासाठी गेलेला तरुण बुडाल्याची घडना घडली होता. या घटनेनंतर तब्बल 28 ते 30 तासानंतर संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध आणि बचाव पथकाने मृतदेह शोधून काढला. शंकर भोयर असे मृताचे नाव आहे. दरम्यान, घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली होती. यावेळी त्याच्या नातेवाईकांनीही आक्रोश केला. तर घटनास्थळी आमदार तान्हाजी मुटकुळे, ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोनि अगद सुडके यांच्यासह वाशिम ग्रामीण पोलीस दाखल होते.

...अखेर 28 ते 30 तासानंतर बेपत्ता झालेल्या शंकरचा मृतदेह सापडला

हेही वाचा - बीडमध्ये मातंग समाजाच्या स्वतंत्र आरक्षणासाठी एकाची जलसमाधी

देवठाण भोयर येथील शंकर भोयर हा रविवारी पहाटे सहाच्या सुमारास आपल्या मित्रासमवेत टनका येथील पैनगंगा नदीच्या कट्ट्यावर पोहण्यासाठी येत असे. नेहमीप्रमाणे चार ते पाच मित्रांसोबत पोहण्यासाठी गेला होता. त्याने एक दोन वेळा उडी घेतली. तो बाहेर ही आला. मात्र, त्याने पुन्हा उडी घेतल्यानंतर तो बाहेर आलाच नाही. यानंतर त्याचा शोध घेतला. मात्र, तो मिळून आला नाही. त्याच्यासोबत आलेल्या सहकाऱ्यांनी ही माहिती ग्रामस्थांना कळविली. दिवसभर शोध घेतल्यावरही तो आला नव्हता.

हेही वाचा - परळी पोलिसांनी पकडला ३५ लाखांचा गुटखा; खरे सूत्रधार मोकाटच

पिंजर येथील संत गाडगेबाबा बचाव व शोध पथकाने दुसऱ्या दिवशी पुन्हा शोध कार्य सुरू केले. यावेळी अखेर २८ ते ३० तासांनंतर नदीच्या कडेला शंकरचा मृतदेह आढळून आला. याचवेळी भावनेच्या भरात शंकरच्या चुलत भावाने नदीत उडी घेत मृतदेहाकडे धाव घेतली. यात तो बुडू लागल्याने ही बाब बचाव पथकातील कॅप्टनच्या लक्षात आली आणि त्याला देखील वाचविण्यात आले. शंकरचा मृतदेह बाहेर काढल्यानंतर त्याला अखेरच पाहण्यासाठी सर्वांनी एकच गर्दी केली होती. पैनगंगा नदी ही विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवर असल्याने दोन्ही भागातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. तर बचाव पथकाने केलेल्या कार्याचे आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी आभार मानत कौतुक केले.

हेही वाचा - नगर-पुणे महामार्गावर मिनी बसला अपघात; एकाच कुटुंबातील 2 ठार, १५ जखमी

शंकर हा उत्कृष्ट कुस्तीपटू होता. त्याला व्यायामाची प्रचंड आवड असल्याने तो नेहमीच पोहण्यासाठी जात असे. चार महिन्यांपूर्वीच त्याचा विवाह झाला होता. या घटनेची समस्त ग्रामस्थांना माहिती झाली होती. मात्र, शंकरच्या आई-वडील आणि पत्नीला या घटनेची कल्पना देण्यात आली नव्हती. शंकर हा गावातील कुणीतरी आजारी असल्याने तिकडे गेल्याचे घरी सांगण्यात आले होते.

या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली तर गावावर शोककळा पसरली आहे. तर या दुर्घटनेवरून एक गोष्ट प्रकर्षाने समोर आलीय की, अशा घटनासाठी प्रशासनाकडे कोणतीही यंत्र सामग्राी किंवा कोणती टीम उपलब्ध नाही. त्यामुळेच बाहेरील एका सेवाभावी संस्थेचा आधार घ्यावा लागला.

Intro:हिंगोली जिल्ह्यातील देवठाण भोयर येथील शंकर भोयर यांचा 28 ते 30 तासानंतर मृतदेह शोधून काढला. संतगाडगेबाबा आपत्कालीन व शोध व बचाव पथकाने मृतदेह शोधून काढला. मृतदेह दिसल्याने सर्वांनीच सुटकेचा श्वास सोडला. तर शंकरला शेवटचं डोळे भरून पाहण्यासाठी सर्वांनी एकच गर्दी केली. नातेवाईक आक्रोश करीत होते. घटनास्थळी आ. तान्हाजी मुटकुळे, ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोनि अगद सुडके यांच्यासह वाशिम ग्रामीण पोलीस दाखल होते.

Body:शंकर भोयर हा रविवारी पहाटे सहा च्या सुमारास आपल्या मित्रासमवेत टनका येथील पैनगंगा नदिच्या कट्ट्यावर नेहमीच पोहोण्यासाठी येत असे. चार ते पाच मित्रा सोबत पोहोण्यासाठी गेला होता. त्याने एक दोन वेळा उडी घेतली. तो बाहेर ही आला अन नंतर त्याने कट्ट्यावरून उडी घेतली अन तो बाहेर आलाच नाही. त्याचा मित्रांनी खूप शोध घेतला मात्र तो मिळून आला नाही. त्याच्या सोबत आलेल्या सहकार्याने ही माहिती ग्रामस्थांना कळविली. घटनास्थळी एकच गर्दु झाली होती. दिवसभर शोध घेतला मात्र मिळून आला नव्हता. दुसऱ्या दिवशी पुन्हा शोधकार्य सुरू केले पिंजर येथील संत गाडगेबाबा बचाव व शोध पथक दुसऱ्या दिवशी दाखल झाले अन त्यानी शोध कार्य सुरू केले., तर नदीच्या कडेला शंकर चा मृतदेह आढळून आला. अशातच भावनेच्या भरात शंकर च्या चुलत भावाने नदीत उडी घेत शंकर कडे धाव घेतली होती मात्र मधातच त्याला अन तो बुडू लागला ही बाब बचाव पथकातील कॅप्टनच्या लक्षात आली अन त्याला देखील वाचविण्याचे काम या पथकाने केले. शंकर चा मृतदेह बाहेर काढल्यानंतर त्याला अखेरच बघण्यासाठी सर्वांनी एकच गर्दी केली होती. पैनगंगा नदी ही विदर्भ अन मराठवाड्याच्या सीमेवर असल्याने दोन्ही भागातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.

Conclusion:शंकर हा उत्कृष्ट कुस्ती पट्टू होता. त्यामुळे त्याला व्यायामाची प्रचंड आवड असल्याने, तो नेहनीच पोहोण्यासाठी जात असे. अन दुर्दैवी घटना घडली. शंकरच्या गावात ही घटना जरी माहीत असली तरी शंकर च्या आई वडील व चार महिन्यापूर्वी विवाह झालेल्या पत्नीला देखील कल्पना दिली नव्हती. शंकर हा गावातीलच कुणी तरी आजारी असल्याने तिकडे गेल्याचे घरी सांगितले होते.

मात्र बचाव पथकाने केलेल्या कार्याचे आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी आभार मानत कौतुकही केले.

बाईट- बचाव पथक दीपक सदाफळे

आ. तान्हाजी मुटकुळे

बघ्यांची गर्दी

बातमीत सर्व व्हिज्युअल वापरणे

चार महिन्यांपूर्वीच झाला होता विवाह
शंकर भोयर यांचा चार महिन्यापूर्वीच विवाह झाला होता. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली तर गावावर शोककळा पसरली आहे.
या दुर्घटनेवरून मात्र एक गोष्ट प्रकर्षाने समोर आलीय की, आशा घटनासाठी प्रशासनाकडे कोणतीही यंत्र समुर्गी किंवा कोणती टीम उपलब्ध नाही. त्यामुळेच बाहेरील एका सेवाभावी संस्थेचा आधार घ्यावा लागला.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.