ETV Bharat / state

'नवसंजीवनी' योजनेलाही कीड; लाच घेताना कृषी सहायक रंगेहात 'चतुर्भूज'

author img

By

Published : May 31, 2019, 5:55 PM IST

हिंगोली जिल्ह्यातील नानासाहेब देशमुख यांच्या नावाने सरकारने शेतकऱ्यांना कर्जाच्या खाईतून मुक्त करण्यासाठी नवसंजीवनी योजना सुरू केली. मात्र याजनेत लाच घेण्याचा पहिलाच गुन्हा हिंगोलीतच दाखल करण्यात आला.

लाचलुचपत विभागाचे कार्यालय

हिंगोली - शेतकऱ्यांना कर्जाच्या खाईतून मुक्त करुन कृषी व्यवस्थेला नवसंजीवनी देण्यासाठी भारतरत्न नानाजी देशमुख कृषी नवसंजीवनी योजना सरकारने सुरू केली. मात्र या योजनेच्या लाभासाठी दीड हजार रुपयांची लाच घेताना कृषी सहायकाला लाचलुचपत विभागाच्या पथकाने औंढा येथे रंगेहात पकडले. पी. एस. राऊत असे लाच घेणाऱ्या कृषी सहायकाचे नाव आहे. या योजनेत लाच घेणारा हा पहिलाच कर्मचारी असल्याने एकच खळबळ उडाली आहे.

लाचलुचपत विभागाचे कार्यालय

कृषी व्यवस्थेला नवसंजीवनी देण्याच्या हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतरत्न नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना सुरू केली आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना कर्जाच्या खाईतून मुक्त करण्यासाठी आणि आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. या योजनेचा असा उदात्त हेतू असताना देखील या योजनेचा लाभ देण्यासाठी संबंधित तक्रारदाराकडे कृषी सहायक राऊतने २१०० रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती दीड हजार रुपये पहिल्या टप्प्यात देण्याचे ठरवले. मात्र, तक्रारदारांना लाच देण्याची इच्छा नव्हती. त्यामुळे त्यांनी लाचलुचपत विभागाकडे याची तक्रार केली.

लाचलुचपत विभागाने सापळा लावत आज राऊतला दीड हजार रुपये घेताना रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक संजय लाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधिक्षक रवींद्र थोरात, निरीक्षक नितीन देशमुख, कर्मचारी अभिमन्यू कांदे यांनी केली.

नानाजी देशमुख हे हिंगोली जिल्ह्यातील रहिवासी असल्याने त्यांच्याच जिल्ह्यात सर्वाधिक जास्त लक्ष देऊन ही योजना राबविण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. मात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी लाच मागणारा हा पहिलाच कर्मचारी अडकला आहे.

Intro:उदांत हेतूने शेतकऱ्यांना कर्जाच्या खाईतून मुक्त करण्यासाठी आणि कृषी व्यवस्थेला नवसंजीवनी देण्यासाठी, भारतरत्न नानाजी देशमुख कृषी नवसंजीवनी योजना राबवली जाते. मात्र या योजनेच्या लाभासाठी दीड हजार रुपयाची लाच घेताना कृषी सहाकाला औंढा येथे रंगेहात पकडले. ज्या हेतूने ही योजना सुरू केली, त्या योजनेवर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नियंत्रण आहे किंवा नाही ? असाच प्रश्न या केलेल्या कारवाईवरून उपस्थित होतोय. या योजनेत लाच मागणारा हा पहिलाच कर्मचारी असल्याने एकच खळबळ उडाली आहे. पी. एस. राऊत असे लाच स्वीकारणाऱ्या कृषी शहाय्यकाचे नाव आहे.

Body: कृषी सहाय्यक पी. एस. राऊत हे औंढा नागनाथ येथील कृषी कार्यालय गोळेगाव अंतर्गत कार्यरत होते.
राऊतवर केवळ दीड हजार रुपयाच्या लाचेची साठी कारवाई केली. मागास जिल्हे आणि जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येचे प्रमाण सर्वाधिक जास्त आहे, त्या जिल्ह्यांमध्ये कृषी व्यवस्थेला नवसंजीवनी देण्याच्या हेतूने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारतरत्न नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प सुरू केला आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना कर्जाच्या खाईतून मुक्त करण्यासाठी आणि आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. या योजनेचा असा सिद्धांत हेतू असताना देखील या योजनेचा लाभ देण्यासाठी संबंधित तक्रारदाराकडे कृषी सहाय्यक राऊतने २१०० रुपयांची लाच मागितली होती. त्यापैकी दीड हजार रुपये तक्रारदाराने पहिल्याच टप्प्यात देण्याचे ठरले. त्यानुसार आज ठरलेल्या ठिकाणी दीड हजार रुपये देताच पूर्वनियोजित नुसार राऊतला दीड हजार रुपये स्वीकारताना रंगेहात पकडले. ही कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक संजय लाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली येथील डीवायएसपी रवींद्र थोरात, पोनि नितीन देशमुख कर्मचारी अभिमन्यू कांदे यांनी केली.

Conclusion:नानाजी देशमुख हे हिंगोली जिल्ह्यातील रहिवासी असल्याने त्यांच्या च जिल्ह्यात सर्वाधिक जास्त लक्ष देऊन ही योजना राबविण्यासाठी अधिकऱ्याना सूचना दिल्या आहेत. मात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी लाच मागणारा हा पहिलाच कर्मचारी अडकलाय. अजूनही या मध्ये वरीष्टांनी लक्ष देण्याची गरज आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.