ETV Bharat / state

निवृत्त शिक्षकाने शेतीत आजमवला हात; प्रयोगशील शेतीतून कमावला लाखोंचा नफा

जाधव यांना पूर्वीपासूनच शेतीची आवड होती. त्यांच्याकडे वडिलोपार्जित शेती आहे. निवृत्त होताच त्यांनी रात्रंदिवस परिश्रम घेऊन शेती करण्यास सुरुवात केली. ते दरवर्षी शेतात वेगवेगळे प्रयोग करू पाहातात. यातून त्यांना चांगला नफा देखील होतो.

Agricultural Experiments kendra hingoli
निवृत्त शिक्षकाने शेतीत आजमवला हात
author img

By

Published : Nov 12, 2020, 4:05 AM IST

हिंगोली - संपूर्ण आयुष्य विध्यार्थी घडवण्यात घालवल्यानंतर एका निवृत्त शिक्षकाने कोणाचे ओझे न बनता, शेती करण्यास सुरुवात केली आहे. यात त्यांनी कोबी आणि झेंडूची लावगड करून, झेंडूच्या फुलांच्या विक्रीतून लाखो रुपयांचा नफा मिळवला आहे. शेतीच्या कामासाठी ते ट्रक्टरही चालवायला शिकले आहे. नाथराव जाधव (रा. केंद्रा खु) असे या शिक्षकाचे नाव आहे.

माहिती देताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी

जाधव यांना पूर्वीपासूनच शेतीची आवड होती. त्यांच्याकडे वडिलोपार्जित शेती आहे. शेतकरी कुटुंबाचा वारसा असल्याने इच्छा नसतानाही त्यांनी शिक्षकाची नोकरी पत्करली. घरी मोठ्या प्रमाणात असलेली शेती आणि शिक्षकाची नौकरी, हे समीकरण काही जुळत नव्हते. तरी देखील ते कसेबसे शेतीकडे लक्ष देत रहायचे. अशा परिस्थितीमध्ये ते दोन वर्षापूर्वी निवृत्त झाले आणि त्यांच्या मनासारखे सर्वकाही झाले.

निवृत्त होताच जाधव यांनी आपला मोर्चा थेट शेताकडे वळवला. त्यांनी रात्रंदिवस परिश्रम घेऊन शेती केली. ते दरवर्षी शेतात वेगवेगळे प्रयोग करू पाहातात. यातून त्यांना चांगला नफा देखील होतो. यावर्षी देखील त्यांनी भाजीपालावर्गीय शेती बोरबरच झेंडूची लागवड केली. यातून त्यांनी चांगला नफा कमवला आहे.

खडूचे हात झिजताहेत ट्रॅक्टर स्टेअरिंगसाठी

विद्यार्थी घडवण्यासाठी जाधव यांनी आपले उभे आयुष्य घातले. त्यांच्या हाताखाली शिकलेले अनेक विद्यार्थी आज मोठ-मोठ्या पदावर आहे. मात्र, खडू धरणारे हात आता ट्रॅक्टरची स्टेअरिंग धरत आहेत. शेती जास्त असल्याने, बैलावर शेती करणे अशक्य होते. त्यामुळे, जाधव यांनी ट्रॅक्टर घेतला आणि ट्रॅक्टर चालवायला शिकले. ते शेताचे काम करण्यासाठी अजिबात कोणावरही अवलंबून राहात नाही. तर, स्वतः सर्व शेतीची कामे करत असल्याने शेती देखील चांगल्या प्रकारे फुलली आहे.

झेंडूची आणि कोबीची लागवड केली

जाधव यांनी आपल्या शेतात कोबी आणि झेंडूच्या फुलांची लागवड केली आहे. योग्य खताची मात्रा आणि वेळेवर पाणी दिल्याने झेंडूची फुले चांगल्या प्रकारे लगडली आहे. यातून त्यांना लाखो रुपयांचे उत्पन्नही मिळाले आहे. तर, कोबी आता तोडणी योग्य आली असून यातून देखील आपल्याला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळणार असल्याचे जाधव यांनी सांगितले. दिवाळीला देखील झेंडूच्या फुलांची सर्वाधिक जास्त मागणी होणार असल्याचा अंदाजही जाधव यांनी व्यक्त केला.

जिद्द आणि कष्ट कराल तर यश हमखास मिळेल

शेती ही योग्य पद्धतीने केल्यास निश्चितच त्यातून सर्वाधिक जास्त फायदा होतो. विशेष म्हणजे, शेतीमध्ये आवश्यक असते ते जिद्द आणि कष्ट. हे दोन्ही जर तुम्ही सोबत केले, तर शेती ही कधीही धोका देत नाही. त्यामुळे, शेतकऱ्यांनी निसर्गासमोर खचून न जाता अशा वेगवेगळ्या पद्धतीने शेती करण्याकडे वळावे, असे आवाहन जाधव यांनी इतर शेतकऱ्यांना केले.

हेही वाचा- हिंगोलीत विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या; कौटुंबिक कलाहातून टोकाचे पाऊल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.