ETV Bharat / state

८५ वर्षांचे आजोबा पाणपोईच्या माध्यमातून भागवत आहेत प्रवाशांची तहान - hingoli

बसस्थानक परिसरात असलेल्या या पाणपोईवर प्रवाशांची सर्वाधिक गर्दी असते. या सर्व प्रवाशांना आजोबा स्वत: पाणी वाटप करतात. त्यांना मदत करणारेही अनेकजण आहेत. आजोबांचा पाणी वाटपाचा उत्साह बघून तरुणांनाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही.

विश्वनाथ मांदळे पाणी वाटप करताना
author img

By

Published : Mar 12, 2019, 4:35 PM IST

हिंगोली - दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत चालला आहे. त्यामुळे जीव तहानेने व्याकुळ होत आहे. हीच गरज लक्षात घेऊन अनेकांनी शहरात जागोजागी पाणपोई सुरू केली आहे. मात्र, हिंगोली येथील बसस्थानक परिसरातील पाणपोईवर गेल्या ५ वर्षांपासून पाणी वाटप करत एका ८५ वर्षांच्या आजोबांनी आदर्श निर्माण केला आहे. हे आजोबा पाणपोईच्या माध्यमातून प्रवाशांची तहान भागवतात.

विश्वनाथ मांदळे पाणी वाटप करताना

विश्वनाथ मांदळे असे या आजोबांचे नाव आहे. त्यांना सुरुवातीपासूनच समाजकार्याची आवड आहे. मात्र, घरची परिस्थिती बेताचीच असल्याने, त्यांना ते जमत नव्हते. अशाच परिस्थितीत ७ वर्षांपूर्वी रेल्वे स्थानक परिसरात पाणपोई उद्घाटन झाले. तेथूनच आजोबांनी पाणीवाटपाला सुरुवात केली. त्याठिकाणी त्यांनी तब्बल तीन-साडेतीन वर्षे प्रवाशांना पाणी दिले. आता ५ वर्षांपासून ते बसस्थानक परिसरात पाणपोईवर पाणी वाटप करतात. प्रवाशांना पाणी दिल्यानंतर समाधान लाभत असल्याचे आजोबांनी सांगितले.

आजही आजोबा न थकता दिवसभर पाणी देण्याचे काम करतात. पाणी सांडवणाऱ्यांवर आजोबा जाम भडकतात. ते दिवसभर पाणी वाटप करतात अन सायंकाळी घराचा रस्ता पकडतात. आजोबांचा हा रोजचा दिनक्रमच ठरला आहे. ते प्रवाशांना नेहमी त्यांची तहान पाहून पाणी देतात. ते पाणी देताना पहिला पेला भरून, दुसरा अर्धवट आणि आणखी पाणी मागितलेच तर तिसरा पेला अगदीच कमी भरून देतात. पाणी वाटप करणारे आजोबा बसस्थानक परिसरात सर्वांचेच परिचित झालेले आहेत.

बसस्थानक परिसरात असलेल्या पाणपोईवर प्रवाशांची सर्वाधिक गर्दी असते. या सर्व प्रवाशांना आजोबा स्वत: पाणी वाटप करतात. त्यांना मदत करणारेही अनेकजण आहेत. आजोबांचा पाणी वाटपाचा उत्साह बघून तरुणांनाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. तपोवन आश्रम नर्मदा तट गुरुपरिवाराच्यावतीने बस्थानक परिसरात ५ ते ६ वर्षांपासून पाणपोई चालवली जाते. आता या पाणपोई पाठोपाठ सफा बैतुला मालाच्यावतीनेही पाणपोई सुरू केली आहे. पाणपोईचा उपक्रम खरोखरच प्रवाशांसाठी संजीवनीच ठरत आहे.

Intro:माणसाच्या मनामध्ये कोणतेही कार्य मनापासून करण्याची जिद्द असेल तर त्याला वय लागत नाही याचे जितेजागते उदाहरण द्यायचे झाले तर हिंगोली येथील बसस्थानकात आलेल्या पाणपोईवर स्वयंसेवक म्हणून गेल्या पाच वर्षापासून पंचाऐंशी वर्षांचे आजोबा प्रवाशांची पाणपोईच्या माध्यमातून तहान भागवितात. प्रवाशांना पाणी देताना या आजोबांचे चळचळ हात कापतात, तरीही आजोबा म्हणतात की प्रवाशाने पाणी पिल्यानंतर मला समाधान लाभते. हे समाधान सांगताना आजोबाच्या चेहऱ्यावर चा आनंद खरच सर्व काही सांगून जातो.

Body:विश्वनाथ मांदळे असे या ८५ वर्षाच्या आजोबांचे नाव आहे. आजोबांना अगदी सुरुवातीपासूनच समाजकार्याची आवड आहे. मात्र घरची परिस्थिती बेताचीच असल्याने, त्यांना काय ते जमतच नव्हते, सुरुवातीला मिळेल ते काम करून संसार हकत होते. मात्र मुलगा झाल्यानंतर हळूहळू परिस्थिती बदल झाला. तो मोठा झाल्यानंतर तो केश कर्तनायाचे काम करू लागला. त्यामुळे आजोबांना ढील मिळत गेली, वय वाढलेले असतानाही मात्र त्याना मन स्वस्थ बसु देत नव्हते. अशाच परिस्थितीत सात वर्षांपूर्वी रेल्वे स्थानक परिसरात पाणपोई उद्घाटन झाले होते. तेथूनच आजोबांनी पाणीवाटपाचा सुरुवात केली. जवळपास त्याठिकाणी तब्बल तीन साडेतीन वर्षे प्रवाशांना पाणी दिले. तर आता पाच वर्षांपासून बसस्थानक परिसरात पाणपोईवर पाणी वाटप करतात. आजही आजोबा तरुणाला लाजवतील असे पाणी वाटप करतात. न थकता दिवसभर पाणी देण्याचे काम करतात. जसे आजोबा स्वभावाने शांत आहेत तेवढेच रागीट ही आहेत, पाणी सांडविणाऱ्यावर आजोबा जाम भडकतातही, मात्र आजोबा प्रवाशी चुकुनही राग मानत नाहीत. प्रवाशाना आपल्या चुकीची जाणीव होते, अन गुमान प्रवासी पाणी पितात व निघून जातात. आजोबा दिवसभर पाणी वाटप करतात अन सायंकाळी सुर्यमावळ्ण्याच्या अगोदर घराचा रस्ता पकडतात. आजोबांचा हा रोजचा दिनक्रमच ठरलेला. मात्र या आजोबाच्या दिवसभर पाणी वाटपातून प्रवाशी पाण्याचे काय महत्व असते, ही बाब शिकूनच जातात. आजोबा प्रवाशांना नेहमी तहान पाहून पाणी देतात. पहिला पेला भरून तर दुसरा अर्धवट, प्रवाशांनी तिसरा पेला मगितलाच तर तो अगदीच कमी. आजोबा म्हणतात की, पेला भरून पाणी दिल्यानंतर प्रवासी अर्धवट पाणी पितो अन अर्धा ग्लास पाणी फेकून देतो. दिवसभर असेच सुरू राहिले तर दुसऱ्या प्रवाशांना पाणी मिळणार का? असा सवाल ही पाणी सांडवणाऱ्याला करतात. त्यामुळे प्रवासी देखील जेव्हढे पाणी लागेल तेव्हढेच पाणी घेतात. आजोबाच्या रागावण्यातून पाण्याची ही तेवढीच बचत होते. पाणी वाटप करणारे आजोबा बसस्थानक परिसरात सर्वांचेच परिचित झालेले आहेत.

Conclusion:दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत चालला आहे. त्यामुळे जीव तहानेने व्याकुळ होत आहे. हीच गरज लक्षात अनेकांनी शहरात जागोजागी पाणपोई सुरू केली आहे. तर काही फळ विक्रेत्यांनी देखील वर्दळीच्या ठिकाणी पाण्याचे दोन जार भरून ठेवलेले आहेत. जो तो आप आपल्या परीने तहानलेल्याची तहान भागविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मात्र बस्थांनक परिसरात असलेल्या पाणपोईवर प्रवाशांची सर्वाधिक जास्त गर्दी असते. मात्र या सर्व प्रवाशांना आजोबांचं पाणी वाटप करतात. त्याना पाणपोईत मदत करणारे ही बरेच आहेत. मात्र आजोबाचा पाणी वाटपाची हिम्मत बघून तरुणालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. तपोवन आश्रम नर्मदा तट गुरुपरिवराच्या वतीने बस्थानक परिसरात पाच ते सहा वर्षांपासून पाणपोई चालविली जाते. आता या पाणपोई पाठोपाठ सफा बैतुला माला च्या वतीनेही पाणपोई सुरू केली आहे. त्यामुळे बस्थानक परिसरात पाणी विकत घेऊन तहान भागविण्याची तूर्तास वेळ टळण्यास मदत होत आहे. पाणपोईचा उपक्रम खरोखरच प्रवाशासाठी संजीवनीच ठरत आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.