हिंगोली - ज्याची भीती होती तेच आता हिंगोली जिल्ह्याच्या नशिबी येऊन ठेपले आहे. चक्क आज करण्यात आलेल्या आर टी पीसीआर तपासणीत 27 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आहेत. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यात परत कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत चालली आहे. आता 93 रुग्णावर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक राजेश सूर्यवंशी यांनी दिली आहे.
हिंगोली जिल्ह्यात कोरोना रुग्णाच्या बाबतीत अगदी शून्यावर येऊन ठेपला होता. मात्र, दोन दिवसांपासून अचानक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढण्यास सुरुवात झाल्याने, आता पर्यंत 3 हजार 891 वर आकडा पोहोचला आहे. यातील 3 हजार 740 रुग्ण हे बरे झाले आहेत. आज घडीला 93 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर विविध कोरोना केअर सेंटर व कोरोना वार्ड मध्ये उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 58 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आता शासनाच्या निर्णयाकडे लागले सर्वांचे लक्ष -
कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या वाढत असल्याने, आता परत लॉकडाऊन लागते की काय? याची प्रत्येकाच्या मनात भीती निर्माण झाली आहे. कसे बसे सर्वसामान्य कुटुंब व मंजूराच्या हाताना काम मिळाले होते. मात्र, आता वाढीव रुग्णामुळे सर्वांच्या मनामध्ये धडकी निर्माण झाली आहे.