ETV Bharat / state

सुखद..! हिंगोलीत 18 जवानांचा कोरोनावर विजय; टाळ्यांच्या गजरात दिला डिस्चार्ज - corona update in hingoli

मुंबई व मालेगावहुन बंदोबस्तावरून परत आलेल्या सीआरपीएफच्या १८ जवानांचा अहवाल मगळवारी निगेटिव्ह आल्याने या जवानांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, सध्यस्थितीत कोरोना वार्डमध्ये 53 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू असून यामध्ये 51 जवानांचा समावेश आहे. यातील 9 जवान हे औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर, उर्वरित दोघांमध्ये सेनगाव येथील 1 अन् जिल्हा सामान्य रुग्णालयातील एका परिचारिकेचा समावेश आहे.

हिंगोलीच्या पुन्हा 18 जवानांचा कोरोनावर विजय

author img

By

Published : May 13, 2020, 12:23 PM IST

हिंगोली - मालेगाव आणि मुंबई येथून बंदोबस्त आटोपून आलेल्या राज्य राखीव दलाच्या 18 जवानांचे अहवाल हे पुन्हा निगेटिव्ह आले आहेत. त्यांना मंगळवारी टाळ्यांच्या गजरात जिल्हा सामान्य रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आता कोरोना वार्डमध्ये केवळ 53 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिवसेंदिवस कोरोनाची रुग्णसंख्या कमी कमी होत चालल्याने हिंगोलीकरांकडून समाधान व्यक्त होत आहे.

हिंगोलीत 18 जवानांचा कोरोनावर विजय

हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात एकूण 91 कोरोनाबाधित रुग्ण दाखल झाले होते. आरोग्य विभागाच्या वतीने दिवस-रात्र एक करत कोरोनाबाधितांवर उपचार सुरू होते. यापूर्वी 15 जवान अन् इतर 5 कोरोनाचे रुग्ण बरे झाले, तर, मंगळवारी पुन्हा 18 जण कोरोनातून मुक्त झाले आहेत. एकंदरीतच आत्तापर्यंत जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेल्यांपैकी 38 रुग्ण हे बरे झालेले आहेत. सध्याच्या स्थितीमध्ये कोरोना वार्डमध्ये 53 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू असून यामध्ये 51 जवानांचा समावेश आहे. यातील 9 जवान हे औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर, उर्वरित दोघांमध्ये सेनगाव येथील 1 अन् जिल्हा सामान्य रुग्णालयातील एका परिचारिकेचा समावेश आहे.

हिंगोली शहरातील साई रिसॉर्ट लॉजमध्ये विलगीकरण केलेल्या 78 जणांनादेखील मंगळवारी सुट्टी देण्यात आली. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गोपाल कदम यांनी सांगितले. कोरोनाबाधित रुग्ण बरे होत असल्याने हिंगोलीकरांसह प्रशासनानेही सुटकेचा श्वास सोडला आहे. शिवाय प्रशासनाच्यावतीने टप्प्याटप्प्याने जिल्ह्यातील आस्थापने सुरू करण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. तर, जवानांवर उपचार करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टर तसेच परिचारिकांचे ही राज्य राखीव दलाच्या वतीने समादेशक मंचक ईप्पर यांनी आभार मानले. यावेळी टाळ्यांच्या गजरामध्ये बरे झालेल्या जवानांना डिस्चार्ज देण्यात आला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.