ETV Bharat / state

जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेची धाड; 15 जण ताब्यात

कळमनुरी तालुक्यातील पुर येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जुगार अड्ड्यावर धाड मारली. या धाडीत 15 आरोपींना ताब्यात घेतले आहे. तसेच च भागात सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीवर ही धाड मारून. या आरोपीकडील 7 हजार 200 रुपयांचा अवैध दारूसाठा पोलिसांनी जप्त केला.

पोलीस अधिक्षक कार्यालय, हिंगोली
author img

By

Published : Jul 31, 2019, 3:48 AM IST

हिंगोली - कळमनुरी तालुक्यातील पुर येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जुगार अड्ड्यावर धाड मारली. या धाडीत 15 आरोपींना ताब्यात घेतले आहे. तर आरोपी कडील 7 हजार 300 रोख रक्कम आणि 19 हजार रुपयांचे मोबाईल असा एकूण 26 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीमध्ये प्रतिष्ठित व्यक्तींचा समावेश असल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.

जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेची धाड; 15 जण ताब्यात

केशव वानखेडे, कमळाजी मार्कड, पुंडलिक वानखेडे, गणेश वानखेडे, जयकुमार वानखेडे, विकास वानखेडे, रावसाहेब वानखेडे, चंदू वानखेडे, पांडू वानखेडे, दत्ता घोंगडे, रवी इंगळे, सर्जेराव चीरमारे, चांदू मारोती वानखेडे, रघुनाथ बोचरे, रामराव किरवळे या सर्वांना ताब्यात घेतले आहे. तर गणपत वानखेडे हा पळून गेला.

कळमनुरी तालुक्यातील पूर परिसरात जुगाराचा खेळ सुरू असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यावरून पथकाने सापळा रचून धाड टाकण्यात आली. यावेळी 15 ते 16 जण जुगार खेळत असताना आढळून आले. यातील 15 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तर एक जण मात्र पळून गेला आहे. पोलिसांनी आरोपीकडून रोकड मोबाईल जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरात जुगाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. आरोपीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

अन् पथकाने दारूही पकडली

हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जुगार अड्ड्यावर धाड टाकल्यानंतर याच भागात सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीवर ही धाड मारली. या आरोपीकडील 7 हजार 200 रुपयांचा अवैध दारूसाठा पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी अजय भालेराव राहणार कळमनुरी याच्याविरुद्ध दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Intro:*
हिंगोली: कळमनुरी तालुक्यातील पुर येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानी जुगार अड्ड्यावर मारलेल्या धाडीत 15 आरोपींना ताब्यात घेतलेय. तर आरोपी कडील 7 हजार 300 नगद अन 19 हजार रुपयांचे मोबाईल असा एकूण 26 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. आरोपी मध्ये मात्र प्रतिष्ठित नागरिकांचा समसवेश असल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडालीय.

Body:केशव वानखेडे, कमळाजी मार्कड, पुंडलिक वानखेडे, गणेश वानखेडे, जयकुमार वानखेडे, विकास वानखेडे, रावसाहेब वानखेडे, चंदू वानखेडे, पांडू वानखेडे, दत्ता घोंगडे, रवी इंगळे, सर्जेराव चीरमारे, चांदू मारोती वानखेडे, रघुनाथ बोचरे, रामराव किरवळे या सर्वांना ताब्यात घेतले. तर गणपत वानखेडे हा फरार झाला आहे.
कळमनुरी तालुक्यातील पूर परिसरात जुगार खेळ सुरू असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यावरून पथकाने सापळा रचून धडक कारवाई केली. यावेळी 15 ते 16 जण पत्ते कुटत असताना आढळून आले. यातील पंधरा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तर एक जण मात्र फरार झालाय. पोलिसांनी आरोपीकडून रोकड मोबाईल जप्त केलाय. या कारवाईमुळे परिसरात पत्ते कुटनारांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. आरोपीविरुद्ध, गुन्हा दाखल केलायला आहे.
Conclusion: *अन पथकाने दारूही पकडली*
हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जुगार अड्ड्यावर रेड मारल्यानंतर याच भागात सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीवर ही धाड मारलीय. यआरोपी कडील सात हजार दोनशे रुपयाचा अवैध दारूसाठा पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी अजय भालेराव राहणार कळमनुरी याच्याविरुद्ध दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलाय.
स्थानिक गुन्हे शाखेने ''एक तिर मे दो वार'' केल्यामुळे जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडालीय.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.