ETV Bharat / state

108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेचा कारभार 'रामभरोसे'; बहुतांश डॉक्टर नशेत, हिंगोलीतील प्रकार

उपचारासाठी महिलेला 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून नांदेडला हलवण्यात आले. मात्र, रुग्णवाहिकेतील डॉक्टर व रुग्णालयातील डॉक्टरांमध्ये जुंपल्याने आजारी महिला विवळत होती. शिवाय डॉक्टर दारु पिल्याचा संशय काहींनी व्यक्त केला.

संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Aug 29, 2019, 8:33 PM IST

हिंगोली - एरव्ही गंभीर रुग्ण म्हंटलं की धावून जाणारी 108 रुग्णवाहिकाच पहिल्यांदा लक्षात येते. मात्र, दिवसेंदिवस कारभार ढेपाळत चालला आहे. रुग्णवाहिकेवरील बहुतांश डॉक्टरही दारुच्या नशेत राहत असल्याची खळबळजनक बाब बुधवारी रात्रीच्या सुमारास उघड झाली. 108 रुग्णवाहिकेवरील डॉक्टर चक्क रुग्णाला हलविण्याचे सोडून रेफर केलेल्या डॉक्टरसोबतच वाद घालत असल्याचे भयंकर दृश्य दिसून आले.

रुग्णवाहिकेचा कारभार 'रामभरोसे

हिंगोली येथील जिल्हासामान्य रुग्णालयात मनिषा बालखंडे या युवतीला उपचारासाठी बुधवारी दुपारी 2.30 वाजता दाखल केले होते. उपचार करूनही तिचा काही केल्या रक्तस्राव थांबत नव्हता. त्यामुळे पुढील उपचारासाठी तिला नांदेड येथे रेफर करण्यात आले. युवतीच्या नातेवाईकांनी 108 या टोल फ्री क्रमांकावरून कॉल सेंटरला फोन केला. तीन तासानंतर आखाडा बाळापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका रात्रीच्या सुमारास दाखल झाली. रुग्णवाहिकेवरील डॉक्टर अपघात कक्षात पोहोचले. मात्र, तेथील डॉ. नितीन पुरोहित हे गंभीर रुग्णाकडे लक्ष न देता थेट वाद घालत होते. हा वाद एवढा खालच्या दर्जाचा होता, की रुग्णवाहिकेवरील डॉक्टर अरेरावीची भाषा वापरत होता. शिवाय आपल्या मोबाईलमध्ये व्हिडीओ रेकॉर्डिंग देखील करीत होते. जोराची आरडाओरड देखील करीत होते.

डॉक्टरांमधील हा वाद पाहण्यासाठी रुग्णालयात एकच गर्दी झाली होती. डॉ. सूरज देशमुख असे त्या रुग्णवाहिकेच्या डॉक्टरचे होते. तर दुसरीकडे मात्र ती युवती अतिरक्तस्राव होत असल्याने विवळत होती. डॉक्टर मात्र कुणाचेही काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते

रेफर लेटरचाही तुटवडा -

जिल्हा सामान्य रुग्णालयात सोईसुविधाच्या नावाने बोबाबोंब असल्याने रुग्ण रेफरवर रेफर केले जात आहेत. त्यामुळे रेफर पेपर देखील अपुरे पडत आहेत. सामान्य रुग्णालयात प्रत्येक बाबतीत अनागोंदी कारभारच पहावयास मिळत आहे.

अंधारात उभ्या होत्या दोन रुग्णवाहिका -

जिल्हा सामान्य रुग्णालयातील दर्शनीय भागात 108 क्रमांकाची रुग्णवाहिका उभ्या करण्याऐवजी त्या रुग्णालयाच्या पाठीमागील निवासस्थानाच्या आडोशाला दोन रुग्णवाहिका उभ्या आढळून आल्या. एकंदरीत या सर्व परिस्थितीवरून या रुग्णवाहिकेला घरघर लागलेली असल्याचे स्पष्ट झाले आहे. याच रुग्णवाहिकेवरील डॉक्टरही दारूच्या नशेत राहत असल्याने पुरता बोजवारा उडाला आहे. मग ही रुग्णवाहिका खरोखरच संजीवनी म्हणायची काय, असा सवाल आता सर्वसामान्यातून उमटत आहे.

वरिष्ठांकडे तक्रार करणार -

108 रुग्णवाहिकावरील देशमुख हे डॉ. पुरोहित यांच्यासोबत हुज्जत घालत असल्यामुळे त्यांची तक्रार वरिष्ठांकडे करणार असल्याचे पुरोहित यांनी सांगितले.

Intro:

हिंगोली- एरवी गंभीर रुग्ण म्हंटल की धावून जाणारी 108 रुग्णवाहिका रुग्णाचा खरोखरच श्वासच बनली होती. रुग्णांसाठी संजीवनीच म्हटले ही जायचे मात्र दिवसेंदिवस एवढा कारभार ढेपळलाय की रुग्णालयाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात रुग्णवाहिका लपून ठेवायच्या अन वरून य रुग्णवाहिकेवरील बहुतांश डॉक्टर ही दारूच्या नशेत तर राहत असल्याची खळबळजनक बाब रात्रीच्या सुमारास उघड झाली. 108 रुग्णव्हाहिकेवरील डॉक्टर चक्क रुग्णाला हलविण्याचे सोडून रेफर केलेल्या डॉक्टर सोबतच वाद घालत असल्याचे भयंकर दृश्य दिसून आले.

Body:हिंगोली येथील जिल्हासामान्य रुग्णालयात मनीषा बालखंडे या युवतीला उपचारासाठी बुधवारी दुपारी 2. 30 वाजता दाखल केले होते. उपचार करूनही तिचा काही केल्या रक्तस्राव थांबत नव्हता. त्यामुळे पुढील उपचारासाठी तिला नांदेड येथे रेफर केले होते. सदरील युवतीच्या नातेवकांनी 108 या टोल फ्री क्रमांकावरून कॉल सेंटर ला फोन केला तर तीन तासानंतर आखाडा बाळापूर येथील प्राथमिक आरोग्यकेंद्राची रुग्णवाहिका रात्रीच्या सुमारास दाखल झाली. रुग्णवाहिकेवरील डॉक्टर अपघात कक्षात पोहोचतो न पोहोचतो तोच गंभीर रुग्णाकडे लक्ष न देता थेट डी. एमओ म्हणून कर्तव्य बजावत असलेले डॉ.नितीन पुरोहित यांचा सोबत वाद घालत होते. हा वाद एवढा खालच्या दर्जाचा होता, की रुग्णवाहिकेवरील डॉक्टर आरेरावीची भाषा वापरत आपल्या मोबाईल मध्ये व्हिडीओ रेकॉर्डिंग देखील करीत होते. अन जोर जोरदार आरडा ओरड देखील करीत होते. त्यामुळे हा वाद पाहण्यासाठी रुग्णालयात एकच गर्दी झाली होती. डॉ. सूरज देशमुख असे ते डॉक्टर नाव सांगत होते. ते ही स्टाईल मध्येच. वरून कुणाला ही सांगा असे म्हणत होते. तर दुसरीकडे मात्र ती युवती अतिरक्तस्राव होत असल्याने विवळत होती. 108 वरील डॉक्टर मात्र कुणाचे ही काहिही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. उपस्थिती नागरिकांनी कशी बशी समजूत काढली अन तो रुग्ण त्या रुग्णवाहिकेने नांदेड ला रेफर केला.

*रेफर लेटही संपले होते*

जिल्हासामान्य रुग्णालयात सोईसुविधाच्या नावाने बोबाबोंब असल्याने रुग्ण रेफरवर रेफर केले जात आहेत. त्यामुळे रेफर पेपर देखील अपुरे पडत आहेत. सामान्य रुग्णालयात प्रत्येक बाबतीत बोबच आहे.
Conclusion:
*अंधारात उभ्या केल्या होत्या दोन रुग्णवाहिका*
जिल्हासामान्य रुग्णालयात दर्शनीय भागात 108 रुग्णवाहिका उभ्या करण्याऐवजी त्या रुग्णालयाच्या पाठीमागे असलेल्या निवासस्थानाच्या आडोशाला दोन रुग्णवाहिका उभ्या असलेल्या अवस्थेत आढळून आल्या. एकंदरीत या सर्व परिस्थिती वरून 108 रुग्णवाहिकेला घरघर लागलेली असल्याचे स्पष्ट झाले आहे. वरून याच रुग्णवाहिकेवरील डॉक्टर ही दारूच्या नशेत तर राहत असल्याने, पुरता बोजवारा उडाला आहे. मग ही रुग्णवाहिका खरोखरच संजीवनी म्हणायची का असा सवाल आता सर्वसंन्यातून उमटत आहे.

वरिष्ठांकडे तक्रार करणार

108 रुग्णवाहिका वरील देशमुख हे डॉक्तर डॉ. पुरोहित यांच्यासोबत हुज्जत घालत असल्यामुळे त्यांची तक्रार वरिष्ठांकडे करणार असल्याचे पुरोहित यांनी सांगितले.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.