गोंदिया - गोंदिया-कवलेवाडा मार्गावरील कोठारी गॅस गोदामाच्या परिसरात एका युवकाची अॅसिड टाकून हत्या करण्यात आली. ही घटना 12 जुलैला उघडकीस आली. असून कुलदिप हिरालाल बिसेन (21 वर्ष रा. बसबसपुरा-बटाणा) असे मृताचे नाव आहे. हा गोंदिया तरुण एका ड्रायव्हिंग स्कूलमध्ये नोकरी करत होता.
ड्रायव्हिंग स्कूलमधील एका गाडीला अपघात झाल्याने गाडीचे नुकसान झाले होते. मालकाने कुलदिप याला दीड लाख रूपये देण्याची मागणी केली. त्यातूनच त्या दोघांमध्ये वाद सुरू होता. त्यामुळे कुलदिप घरी परतला नाही. सोमवारी त्याचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत गोंदिया कवलेवाडा मार्गावरील कोठारी गॅस एजन्सी समोरील झुडपात आढळला. याची माहिती परिसरातील नागरिकांनी पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून मृताची ओळख पटवली. मृतदेहाच्या उत्तरीय तपासणीत अॅसिड टाकून त्याचा खून केल्याचे स्पष्ट झाले.
वादातून झाला मृत्यू
ड्रायव्हिंग स्कूलमधील गाडीला अपघात झाल्याने मालकाने कुलदिप याच्याकडे दीड लाख रूपये नुकसानभरपाई देण्याची मागणी केली होती. त्याच वादातून तो 7 जुलैपासून घरून बेपत्ता होता. त्याच्या कुटुंबियांनी 9 जुलैला गोंदिया ग्रामीण पोलिस स्टेशनात गायब झाल्याची नोंदही केली होती. डॉक्टरांच्या प्राथमिक अहवालानुसार मृतदेहावर मारहाणीचे कसलेही चिन्ह आढळले नाही. मृतदेहाला चार-पाच दिवस असल्याने कुजलेल्या स्थितीत होते. त्यामुळे हत्या कोणत्या कारणास्तव झाली. याचा उलगडा झालेला नाही. फिर्यादीच्या तक्रारीवरून गोंदिया ग्रामीण पोली स्टेशन येथे पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा - खळबळजनक विधान अंगाशी; नाना पटोले यांच्यावर घुमजावची ओढवली नामुष्की