गोंदिया - कोरोनाच्या संसर्गाच्या भीतीने संपूर्ण देश हादरला आहे. यातच आता गोंदियाकरांनी आपत्य जन्माला घालण्यास नकार दिल्याचे चित्र दिसत आहे. कोरोनाच्या धास्तीमुळे नागरिक हे पाऊल उचलत असावे, असे समजले आहे. कोरोनामुळे नवीन पाहुणा घरात येवू नये, त्याला कोरोना होऊ नये यासाठी नागरिक खूप काळजी घेत आहेत.
हेही वाचा - घराच्या दारातून पाऊस बघताना कोसळली वीज; पित्याचा मृत्यू, चिमुकली जखमी
...या कारणामुळे जन्मदर घटले
कोरोना काळात अचानक वाढलेली बाधितांची संख्या, कोरोनाने झालेले मृत्यू, कोरोनाच्या उपचारासाठी झालेली तरांबळ, याबाबी गोंदियातील नागरिकांनी जवळून बघितली आहे. कोरोनाचे दाहक वास्तव गोंदियाकरांनी अनुभवले आहे. अशात लग्नसमारंभ मोठा गाजावाजा करीत पार पडले, मात्र कोरोना काळात समस्या निर्माण होऊ नये म्हणून विवाहित जोडप्यांनी पाळणा लांबणीवर केला आहे. परिणामी गोंदिया जिल्ह्यात जन्मदर घटले आहे. जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त आकडेवारीनुसार हे स्पष्ठ झाले आहे.
...या वर्षी इतकी आपत्य जन्माची नोंद
गोंदिया जिल्ह्याचा विचार करता जिल्ह्यात 2019-2020 साली 17 हजार 305 आपत्य जन्माची, तर 2020-2021 साली 15 हजार 982 अपत्य जन्माची नोंद झाली असून मागच्या वर्षीच्या तुलनेत 1 हजार 323 बालके कमी जन्माला आली आहे. या उलट 2021- 2022 साली केवळ 1 हजार 185 बालकांच्या जन्माची नोंद झाली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. इतर वर्षांच्या तुलनेत मागील कोरोना काळातील दीड वर्षांत बालके कमी जन्माला आली आहे. यात प्रमुख कारण म्हणजे, कोरोनाची धास्ती अनेकांना चांगलीच बसली असून काहींनी लग्न पुढे ढकलले आहे. तर, लग्न केलेल्यांनी पाळणा लांबविला आहे. याला साथ इतर विवाहित जोडप्यानी सुद्धा दिली. अनेकांनी धास्ती घेत गर्भधारणा होणार नाही यासाठी उपाययोजना केल्या होत्या, त्यामुळे कोरोना काळात पाळणा लांबणीवर गेल्याचे अनेकांचे मत आहे.
गोंदिया जिल्ह्याच्या विचार करता जिल्ह्यात आता पर्यंत तब्बल 41 हजार 61 कोरोना रुग्ण आढळले असून, तब्बल 697 बाधितांचा कोरोनाने बळी घेतला आहे. कोरोनाच्या उपचारासाठी आलेला खर्च, बेड मिळविण्यासाठी झालेली तारांबळ, औषधांचा झालेला तुतवडा आदी आलेला कटू अनुभव बघता कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेने गोंदियाकऱ्यांना चांगलेच धास्तावून सोडले. त्यातूनच गोंदिया जिल्ह्यात जन्मदरात कमालीची घट पहायला मिळत आहे. त्यातच आता तर संभावित तिसरी लाट चक्क चिमुकल्यांना प्रभावित करणार असल्याचे बोलले जात आहे. गोंदियाकर परत पाळना लांबविन्याबाबत काय निर्णय घेतात, यावर प्रशासनाचे लक्ष लागले आहे.
वर्ष आणि जन्मदर
2018-19 - 17,332
2019-20 - 17,305
2020-21 - 15,982
2021-22 - 1185
हेही वाचा - अंधश्रध्देच्या आहारी गाव; पंचायती ने ठोठावला शेतकऱ्याला २१ हजार दंड