गोंदिया - अर्जुनी-मोरगाव पोलीस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या बोरी या गावात एका १६ वर्षीय अल्पवयीन युवतीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना १३ जुलै रोजी घडली. यातील आरोपी प्रतीक उर्फ कालिदास मुरलीधर रामटेके (वय-२६) याला अटक करण्यात आले असून त्याला न्यायालयाने १५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पीडित अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून स्थानिक अर्जुनी-मोरगाव पोलीस थांब्यात आरोपी विरुद्ध भादवी कलम ३७६ (२) (ज) सहकलम बाललैंगिक अपराध संरक्षण कायदा २०१२ चे कलम ४,६,१२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याच बोरी गावात १३ जुलै रोजी १२ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणी अक्षय उर्फ चिंट्या अरुण रामटेके (वय- २२) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याविरोधात भादवी कलम ३५४ (अ) द ८९ सहकलम बाललैंगिक अपराध संरक्षण कायदा २०१२ चे कलम ८,१२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला न्यायालयाने १४ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
आज १५ जुलैला आरोपीला पुन्हा न्यालयात हजर करण्यात आले आहे. या दोन्ही गुन्ह्यांचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भुते व पोलीस उपनिरीक्षक देविदास शेवाळे करत आहेत.