गोंदिया - बल्लारशा रेल्वेमार्गावरील नागझिरा व्याघ्र प्रकल्पातून जात असलेल्या रेल्वेमार्गावर 8 मार्चला सकाळी 8 वाजेच्या सुमारास मालवाहू रेल्वेच्या धडकेत एक वर्षाच्या वाघाचा मृत्यू झाला होता. या अपघातात त्या वाघाचा एक पाय तुटून तो पाय गहाळ असल्याचे समोर आले. वन विभागाने गहाळ असलेला पाय शोधला असून दोन रेल्वे कर्मचाऱ्यांना अटक केली. दोन्ही रेल्वे कर्मचाऱ्यांना 12 मार्चपर्यंत वन कोठडी सुनावण्यात आली आहे.
गोरेगाव वनपरीक्षेत्रांतर्गत येणाऱ्या पिंडकेपार गोंगले रेल्वे मार्गावरील मालवाहू रेल्वेच्या धडकेत एका वाघाचे मृत्यू झाल्याची माहिती रेल्वे प्रसाशनाला कळातच रेल्वे प्रशासनाने आपल्या गँगमॅन व चावीदार दोन कर्मचाऱ्यांना घटनास्थळी शाहनिशा करण्यासाठी पाठविले. मात्र, आपले कर्तव्य न बजावत तसेच आपल्या कर्तव्याचा पालन न करता रेल्वेच्या धडकेत मृत वाघाचे तुकडे झाले नाही म्हणत मृत्यू वाघाचे पाय त्यांच्याजवळ असलेल्या कुऱ्हाडीने कापत जवळच्याच पुलाखाली लपवून ठेवले होते. वनविभागाने ते शोधून काढत या प्रकरणी रेल्वे कर्मचारी पुरुषोत्तम तुकाराम कळसर्पे व हरिप्रसाद मीना (दोघे रा. गोगल) या दोघांना अटक केली. त्यांना आज (दि. 10 मार्च) गोंदिया येथील न्यायालयात हजर करण्यात आले असून त्यात दोन्ही आरोपींना न्यायालयाने 12 मार्चपर्यंत वन कोठडी देण्यात आली आहे.
फोटोमुळे घटना आली समोर
सोशल मीडियावर मृत वाघाचे दोन फोटो व्हायरल झाले. एका फोटामध्ये वाघ रेल्वे रूळाच्या मधात आहे आणि त्याचे चारही पाय सुरळीत दिसत आहे. तसेच दुसऱ्या फोटोमध्ये वाघाचा एक पाय कापलेला दिसत आहे. फोटोला पाहून वनविभागाने श्वानाच्या मदतीने वाघाच्या पायाचा शोध घेतला.
चौकशीवेळी उपस्थित होते आरोपी
दरम्यान, शोध मोहिमेत आरोपींचाही समावेश होता, अशी माहिती वनअधिकाऱ्यांनी दिली.
हेही वाचा - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरात जंतुनाशक फवारणी
हेही वाचा - रेल्वेच्या धडकेत एक वर्षीय वाघाचा मृत्यू; गोंदियातील घटना