ETV Bharat / state

दिलासादायक: गोंदियात आणखी २५ जण कोरोनामुक्त; ३४ अ‌ॅक्टिव्ह कोरोनाबाधितांवर उपचार सुरू - गोंदिया कोरोना केसेस

सुरुवातीचे काही दिवस कोरोनामुक्त असलेल्या गोंदिया जिल्ह्यात 19 मे पासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत होती. सध्या जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची 62 वर पोहोचली आहे. तर जिल्ह्यात एकूण 28 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

25 patient cured from corona
गोंदियात 25 जण कोरोनामुक्त
author img

By

Published : May 30, 2020, 3:15 PM IST

गोंदिया- ३९ दिवस ग्रीन झोनमध्ये असणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात १९ मे पासून कोरोना संसर्गाचा शिरकाव सुरू झाला. सतत वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे जिल्हा यंत्रणेसमोर आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, आज २५ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतल्याने जिल्ह्यातील यंत्रणेला दिलासा मिळाला आहे. ३ नवीन कोरोनाबाधित रुग्ण वाढल्याने एकूण संख्या ६२ वर पोहोचलीय. जिल्ह्यात सध्या ३४ अ‌ॅक्टिव्ह कोरोनाबाधित रुग्ण आहेत. यापूर्वी 3 जण कोरोनामुक्त झालेत.

आतापर्यंत जिल्ह्यातील ९५० व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी ६२ नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह तर ८३१ नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. ५४ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. जिल्ह्यात एकूण १९ क्रियाशील कंटेनमेंट झोन आहेत. जिल्ह्यातील ग्रामस्तरावर असलेल्या विविध शाळा व इतर संस्थांमध्ये ३९६४ आणि ८८४५ व्यक्ती गृह विलगीकरणात आहेत.

वाढत्या कोरोना रुग्णांमुळे जिल्ह्यतील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. रुग्णसंख्या वाढत असल्याने कंटेंनमेंट झोन आणि बफर झोन वाढविण्यात आले होते. परिणामी संचारबंदीमध्ये सवलत मिळाली असली तरी जिल्ह्यातील जवळपास ५० हुन अधिक गावे व ४ नागरी क्षेत्र बफरझोन मध्ये समाविष्ट झाले. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी नागरिक स्वयंस्फूर्तपणे लॉकडाऊन झाल्याचे पाहावयास मिळाले.

गोंदियातील कंटेनेंट झोन

  1. गोंदिया तालुका- नवरगाव/कला, कटंगी, परसवाडा
  2. सालेकसा तालूका- धनसुवा, सडक
  3. अर्जुनी तालुका- तिडका, सालईटोला, रेंगेपार, वडेगाव, पांढरवाणी, गोपालटोली
  4. गोरेगाव तालुका- गणखैरा, गोरेगाव येथील गंगाराम चौक,आंबेतलाव
  5. तिरोडा तालुका- तिरोडा
  6. अर्जुनी मोरगाव तालुका- करांडली, अरुणनगर, सिलेझरी, बरडटोली व अरडतोंडीचा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.