ETV Bharat / state

गोदिंयात वाहतूक सिग्नल १ वर्षापासून बंद; सातत्याने होतेय वाहतुकीची कोंडी - सिग्नल बंद

गोदिंयात वाहतूक सिग्नल १ वर्षापासून बंद असल्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.

बंद पडलेले वाहतूक सिग्नल
author img

By

Published : May 21, 2019, 1:50 PM IST

गोंदिया - शहरातील सगळे वाहतूक सिग्नल गेल्या एक वर्षापासून बंद पडलेले आहेत. यामुळे मुख्य मार्गावरील वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहे.

पोलीस अधिकारी

शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याकरिता शहराच्या मुख्य मार्गांवर वाहतूक सिग्नल लावण्यात आले आहे. त्याच्या दुरूस्तीचे काम नगरपरिषदेने करणे गरजेचे आहे. मात्र, गेल्या एक वर्षापासून जयस्तंभ चौक, नेहरू चौक, शक्ती चौक या मुख्य मार्गावरील वाहतूक सिग्नल बंद पडले आहेत. तसेच जयस्तंभ चौकातील एका सिग्नलला अज्ञात ट्रकने धडक दिल्यामुळे तो सिग्नलही बंद पडला आहे. त्याचीही अद्यापपर्यंत दुरुस्ती करण्यात आलेली नाही. यामुळे शहरात ट्रॉफिक जाम आणि अपघात या सारख्या समस्या निर्माण होत आहे.

प्रशासनाने बालाघाट टी-पाईंट, कुडवा नाका, फुलचुर नाका, कलेक्टर चौक तसेच मरारटोली बसस्टॉप जवळ ५ नवीन सिग्नल लावले आहेत. मात्र, ते सिग्नलही बंद पडलेले आहेत. वाहतूक विभागाकडून सिग्नल लावले जातात पण त्याची दुरुस्ती न झाल्यामुळे ते काही दिवसातच बंद पडतात. ही परिस्थिती शहरात पाहायला मिळत आहे. सिग्नलला सुरळीत करण्यासाठी वाहतूक विभागाने अनेकदा नगरपरिषदला पत्र व्यवहार केला. मात्र, नगरपरिषदेने आचार संहिता असल्याचे कारण देत याकडे दुर्लक्ष केले. या सर्व प्रकारामुळे लोकांना होणाऱ्या त्रासाला कोण जबाबदार? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE
Mobil No. :- 9823953395
Date :- 21-05-2019
Feed By :- Reporter App
District :- GONDIA
FILE NAME :- MH_GON_21.MAY.19_TRAFFIC SHIGLAN OFF
शहरातील वाहतुक सिग्नल १ वर्षापासुन बंद
वाहतुक व्यवस्थेचे वाजले तिनतेरा
Anchor :- गोंदिया शहरातील सगळे वाहतुक सिग्नल गेल्या एक वर्षापासुन बंद पडुन आहेत. यामुळे मुख्य मार्गावरील वाहतुक व्यवस्थेचे तिनतेरा वाजले आहे. गोंदिया शहरातील वाहतुक व्यवस्था सुरळीत करण्याकरीता शहराच्या मुख्य मार्गांवर वाहतुक सिग्नल लावण्यात आले आहे. त्याचे दुरूस्ती चे काम नगर परिषदेला करायला पाहिजे होते. परंतु, गेल्या एक वर्षापासुन जयस्तंभ चौक, नेहरू चौक, शक्ती चौक या मुख्य मार्गावरील वाहतुक सिग्नल बंद पडलेले आहेत. तसेच जयस्तंभ चौकातील एका सिग्नल ला अज्ञात ट्रकने धडक देउन ते सिग्नल पाडले. त्या सिग्नल ची आतापर्यंत दुरूस्ती करण्यात आलेली नाही. यामुळे शहरातील वाहतुक व्यवस्थेचे तिनतेरा वाजले आहे. यामुळेच प्रत्येक दिवशी ट्रॉफिक जाम व अपघाता होण्याची शक्यता असते. तसेच शहरातील तीन्ही चौकांतील वाहतुक सिग्नल व्यवस्थेला सुरळीत करण्यास प्रशासन सक्षम नसुन पाच नवीन सिग्नल लावण्यात आले जे बालाघाट टी-पाईंट, कुडवा नाका, फुलचुर नाका, कलेक्टर चौक तसेच मरारटोली बसस्टॉप जवळ लावण्यात आले आहे. मात्र तेही सिगंल बंद अवस्तेत पडलेले आहे. वाहतूक विभागाकडे सिग्नल तर लावले जातात पण त्याचे मॅटेनंस न झाल्यामुळे ते काही दिवसांतच बंद पडतात. मात्र या या सिग्नल ला सुरडीत करण्यासाठी वाहतूक विभागाने अनेकदा नगर परिषद ला पत्र व्यवहार केले मात्र नगर परिषदेने आचार साहित्य असल्याचे कारण समोर देऊन आपली बाजु मांडली असुन स्वतःला या सिग्नल च्या फांगळीतून दूर झाले मात्र लोकांना होणाऱ्या त्रासाला कोण जवाबदार यांचे उत्तर अद्याप हि मिळे ना
BYTE :- संजय सिंग (सायक निरीक्षक, वाहतुक पोलीस) Body:VO:- Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.