ETV Bharat / state

गोंदियात बिबट्याने केली हरणाची शिकार - गोंदिया बिबट्याने शिकार केली बातमी

गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील शेंडा वनपरिक्षेत्रात बिबट्याने एका हरणाची शिकार केली आहे. ही घटना बुधवारी (दि. 29 जुलै) घडली.

फोटो बदलावा (बिबट्या किंवा हरिणाचे संग्रहीत फोटो लावावे)

author img

By

Published : Jul 30, 2020, 3:40 PM IST

गोंदिया - जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील शेंडा वनपरिक्षेत्रांतर्गत शेंडा-सालईटोला मार्गावरील विद्युत उपकेंद्राजवळ बिबट्याने एका हरणाची शिकार केल्याची घटना 29 जुलैला उघडकीस आली.

गावातील काही तरुण नेहमीप्रमाणे सकाळी सालईटोला मार्गावर फिरायला गेले होते. त्यांनी ही घटना पाहिली, हरिण एकटाच चालला होता. झाडांमध्ये लपून बसलेल्या बिबट्याने अचानक झडप घालत हरणाला ठार केले. युवकांना आरओरडा करताच बिबट्या जंगलाच्या दिशेने पसार झाला.

गावाला लागूनच ही घटना घडल्याने याबाबत सडक अर्जुनी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना गावकऱ्यांनी माहिती दिली. त्यानंतर क्षेत्रसहाय्यक शैलेश परधी हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला व मृत हरणाचे पार्थिव ताब्यात घेतले. या परिसरातील गावांमध्ये जंगली प्राण्यांचा वावर सतत असतो. यामुळे गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.