गोंदिया :- जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील चिचगड अप्पर तहसील कार्यालय हद्दीतील घोनाडी गावानजीक गाढवी नदीत दोन महिला मजुरांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आदिवासी नक्षलग्रस्त व जंगलव्याप्त असलेल्या या परिसरात घोनाडी गावातील काही महिला व पुरूष मजुरी केल्यानंतर नावेत बसले असताना ही घटना घडली.
सोमवारी सायंकाळी ही घटना घडली असून, या होडीत 7 ते 8 लोक होते. होडीचे संतुलन बिघडल्याने होडी गाढवी नदीत बुडाली. घोनाडी येथिल रेखा विजय वाढई (३०) व मनिषा दिनु गुरनुले (३१) या महिलेंचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ज्यांना पोहता येत होते. ते वाचले. रेखा व मनिषा यांना पोहता येत नसल्याने स्वत:चा जीव गमवावा लागला. याची माहिती रात्री उशिरा चीचगड पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन महिलांना नदीबाहेर काढले. त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे.
हेही वाचा - तृतीयपंथीयांचा सरकारी नोकरीत समावेश करा; मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल