ETV Bharat / state

Accident Gondia : लग्न जमवून जाताना झाला अपघात; तिघांचा मृत्यू तर एक गंभीर जखमी - तिरोडा साकोली रस्त्यावर भीषण अपघात

गोंदिया जिल्ह्यात तिरोडा -साकोली रोडवर दुचाकी आणि चारचाकीचा काल रविवार, (दि. 6 फेब्रुवारी)रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. ( accident on Tiroda Sakoli road In Gondiya district) त्यामध्ये तीघाजणांचा मृत्यू झाला. तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रहांगडाले यामध्ये गंभीर जखमी झाले आहेत.

लग्न जमवून जाताना झाला अपघात
लग्न जमवून जाताना झाला अपघात
author img

By

Published : Feb 7, 2022, 7:45 AM IST

Updated : Feb 7, 2022, 9:16 AM IST

गोंदिया - तिरोडा -साकोली रोडवर दुचाकी आणि चारचाकीचा काल रविवार, (दि. 6 फेब्रुवारी)रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. ( accident on Tiroda Sakoli road In Gondiya district) त्यामध्ये तीघाजणांचा मृत्यू झाला. तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रहांगडाले यामध्ये गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

व्हिडिओ

प्रकृतीही चिंताजनक

मृत्यू झालेल्यांमध्ये संपत हुर्री आहाके (वय 65) व हिरदेसिंग आसाराम टेकाम (वय 70) रा. मंगेझरी, प्रताप संपत आहाके (वय 36) रा. कोडेबर्रा यांचा समावेश आहे. तर, तिरोडाचे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती चिंतामन रहांगडाले हे यामध्ये गंभीर जखमी झाले आहेत. सभापती चिंतामण रहांगडाले हे आपल्या चारचाकी गाडीने सर्रा गावावरून तिरोडा येथे येत असताना भरभाव चारचाकी गाडीचे नियंत्रण सुटत रस्त्याने जात असलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी गंभीर होती की, दुचाकीवरील दोनजण जागीच ठार झाले आहेत. तर, एका दुचाकीस्वाराचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

तिरोडा -साकोली रोडवरील सर्रा गावाच्या परिसरामध्ये अपघात

या अपघातामध्ये मृत्यू झालेले तिघे लग्नाची तारीख ठरवून आपल्या गावी परतत होते. यामध्ये तिघेही एकाच दुचाकीवरून प्रवास करत होते. लग्न ठरवून परतत असताना तिरोडा -साकोली रोडवरील सर्रा गावाच्या परिसरामध्ये हा अपघात झाला. दुचाकी आणि चारचाकीची भिषण धडक झाली. या अपघातामध्ये दुचाकीवरील तिघांचा मृत्यू झाला तर चारचाकीमध्ये असलेले तिरोडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती चिंतामन रहांगडाले हे गंभीर जखमी झाले आहेत.

तिरोडा पोलीस ठाण्यात तक्रार

अपघाताबाबत मृतक संपत आहाके यांचा लहान मुलगा फिर्यादी जितेश आहाके (वय 34) यांनी तिरोडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्या तक्रारीनुसार वडील संपत आहाके, मोठा भाऊ प्रताप संपत आहाके व नातलग हिरदेसिंग आसाराम टेकाम हे तीघजण जितेशच्या लग्नाची तारीख ठरविण्यासाठी ग्राम कोडेलोहारा येथे ईश्वरदास भलावी यांच्या घरी गेले होते. ईश्वरदास भलावी यांच्या मुलीशी जितेशचे लग्न 8 मे 2022 रोजीचे ठरवून ते तिन्ही जण मोटारसायकलने (एमएच 35/एएल 4729) आपले स्वगाव कोडेबर्राकडे (मंगेझरी) परत येत होते त्या दरम्यान हा अपघात झाला.

हेही वाचा - लता मंगेशकर अनंतात विलीन.. ह्रदयनाथ मंगेशकरांनी दिला लता मंगेशकर यांच्या पार्थिवाला अग्नी

Last Updated : Feb 7, 2022, 9:16 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.