गोंदिया - सर्पदंशाने मायलेकीचा मृत्यू झाल्याने अख्खे कुटूंब उद्धवस्त झाले. शिक्षण घेणाऱ्या दोन मुली आणि बाप दिव्यांग अशा परिस्थितीत त्यांचे पालनपोषण व शिक्षणाची जबाबदारी घेणार कोण? असा प्रश्न निर्माण झाला होता. यावेळी अनाथाचा नाथ बनून गोंदियाचे जिल्हाधिकारी राजेश खवले धावून आले. अन् व्हॉट्पसअॅप ग्रुपच्या माध्यमातून चक्क 20 प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मदतीचा हात देत दरमहा 10 हजार रुपयाची मदत आता त्या अनाथांना मिळणार आहे. कसे शक्य केलंय गोंदियाचे जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी पाहुया या खास रिपोर्टमधून..
गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या मुंडीपार गावातील दिलीप मोहारे यांना दोन मुली आणि एक मुलगा असून त्यांना शासनाकडून घरकुल मंजूर झाले. असता घरकुलाचे बांधकाम सुरु असल्याने मोहारे कुटूंबीय जुन्या घरातील एका खोलीत जमिनीवर झोपले होते. दिलीप यांचा ११ वर्षीय मुलगा दीपक मोहारे आणि ३३ वर्षीय पत्नी सतवन मोहारे यांना सर्पदंश झाला. दिपकचा उपचारासाठी नेत असताना वाटेतच मृत्यू झाला, तर सतवन यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
दीपक मोहारे हे दिव्यांग असल्याने त्यांची पत्नी सतवन ही शेतीत मजुरी करून आपल्या कुटूंबियांचा गाडा चालवायची मात्र आता पत्नीचा आणि मुलाचा मृत्यू झाल्याने जगावे कसा असा, प्रश्न मोहरे कुटूंबियांसमोर असल्याने गोंदिया जिल्ह्यातील २० वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एकत्र येत महिन्याकाठी १० हजार रुपये देण्याचे ठरविले. हे अधिकारी बदलून गेल्यावर देखील त्याच्या जागेवर नव्याने येणारे अधिकारी देखील ही मदत पुढे सुरु ठेवणार आहे. जोपर्यंत मोहारे कुटुंबीय आत्मनिर्भर होत नाहीत, तो पर्यंत ही मदत सुरू असणार आहे.