गोंदिया - जीवनात अशक्य असे काहीच नसते फक्त तुमच्या प्रयत्नांना मेहनतीची जोड हवी. सध्याच्या स्पर्धेच्या युगात अपेक्षित यश मिळाले नाही की तरुणाई निराश होते आणि टोकाचे पाऊल उचलते. मात्र, प्रयत्न करत रहा, निराश होऊ नका, यश तुमचेच आहे असा संदेश गोंदियातील जयकृष्ण दखने याने तरुणांना दिला आहे.
नुकतीच त्याची अंतरिक्ष अनुसंधान संगठन म्हणजे हैदराबादमधील इस्रोमध्ये टेक्निशीयन म्हणून निवड झाली आहे. जयकृष्णने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत यशाला गवसणी घातली आहे.
गोंदियातील सामाजिक भवानामध्ये नुकतेच स्पर्धा परिक्षांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जयकृष्णने मनोगत व्यक्त करत तरुणाईला यशाचा मूलमंत्र दिला.