ETV Bharat / state

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही दंडारी लालपरीच्या प्रतिक्षेतच! बससाठी 18 किमी करावा लागतो प्रवास - gondia news update

देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे, तरीदेखील प्रगत राज्य म्हणून ओळख असणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील मुरकुटडोह दंडारी ( Murkutdoh Dandari village gondia ) ह्या गावात दळणवळणाचे कोणतेही साधन शासनाकडून उपलब्ध नाही. रस्ता, बससेवा, संपर्क यंत्रणा यासारख्या पायाभूत सुविधांचा अभाव हेच मोठे दुर्दैव.

Murkutdoh Dandari village gondia
स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही दंडारी लालापरी प्रतिक्षेतच!
author img

By

Published : May 17, 2022, 5:13 PM IST

Updated : May 17, 2022, 6:13 PM IST

गोंदिया - देशात एकीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. मात्र, आजसुद्धा अनेक गावांत आजही वाहतुकीच्या सोईसुविधा न पोहचल्याने गावकऱ्यांना मोठा त्रास सहन करून प्रवास करावा लागतो. असंच एक गाव आहे महाराष्ट्र राज्याच्या सुरुवातीच्या टोक समजल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यातील मुरकुटडोह दंडारी हे गाव. आदिवासी बहुल नक्षल क्षेत्र, अशी या गावाची आजही ओळख आहे. मात्र, आजसुद्धा या गावात एसटी महामंडळाची बस तर सोडा, साधे काळे-पिवळे (वडाप) वाहनदेखील या गावात यायला तयार नाही. त्यामुळे या गावात राहणाऱ्या गावकऱ्यांना १८ किलोमीटरचा प्रवास पायी किंवा दुचाकी वाहनाने करावा लागतो.

हेही वाचा - Old man hit by bike : थरारक.. रस्ता ओलांडणाऱ्या वृद्धाला भरधाव मोटरसायकलने उडवले

मुरकुटडोह दंडारी गावची भौगोलिक माहिती - महाराष्ट्र राज्याच्या सुरुवातीच्या टोकावर वसलेल्या सालेकसा तालुक्याअंतर्गत येत असलेला. मुरकुटडोह दंडारी गाव, ह्या गावाची लोकसंख्या जवळपास ७०० च्या आत आहे. या गावाला लागून असलेले तीन राज्य सीमादेखील आहेत. त्यामध्ये या गावाला मध्य प्रदेश, छत्तीसगढ आणि महाराष्ट्र या तीन राज्यांची सीमा आहे. मात्र, हे गाव अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त गाव असल्याने नक्षलांच्या भीतीमुळे या गावात रस्तादेखील बनलेला नव्हता. मात्र, २०१९ मध्ये या गावाला जाण्याकरिता जवळपास १४ कोटी रुपये खर्च करून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्ता तयार करण्यात आला. मात्र, तरीदेखील या गावात बस येत नसल्याने गावकरी एसटी बस सुरू करण्यात यावी, अशी मागणी करीत आहेत.

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही दंडारी लालापरी प्रतिक्षेतच!

हेही वाचा - नौदलाला मिळाली मोठी ताकद; भारतीय बनावटीच्या INS सुरत व उदयगिरी युद्धनौकांचे जलावतरण, 'या' आहेत विशेषतः

मुरकुटडोह दंडारी गावात पायाभूत संपर्क यंत्रणांचा अभाव - तर या गावातून बाहेर जिल्ह्याच्या अथवा तालुक्याच्या ठिकाणी जायचे असल्यास १८ किलोमीटर अंतरावर असलेल्या धनेगाव येथून बस पकडावी लागते. दुसरीकडे आजही या गावात मूलभूत सोईसुविधा उपलब्ध नसल्याने गावचा विकास कसा होणार? असा प्रश्न आहे. त्याचप्रमाणे देश आज डिजिटल झालेला आहे. मात्र, या गावात मोबाईल टॉवर नसल्याने या गावात मोबाईलला रेंजसुद्धा नाही. त्यामुळे हे गाव आज डिजिटलपासून दूर राहत असल्याचे समजून येत आहे.

हेही वाचा - Gyanvapi Shringar Gauri Case : ज्ञानवापी मशिदीमध्ये सापडलेले शिवलिंग नसून फुटलेले कारंजे- वकिलाचा दावा

लोकप्रतिनिधींचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष - दुसरीकडे देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असल्याने कदाचित या गावातील गावकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी कोणत्याही लोकप्रतिनिधीकडे वेळ नसावा असेच उपरोधिकपणे म्हणावे लागेल. या गावकऱ्यांसाठी शासनाच्या योजना येत असल्या तरी त्याच्यापर्यंत पोहचतात की नाही हे सुद्धा कोणाला माहिती नाही. त्यामुळे गावकरी आपली नाराजी व्यक्त करीत आहेत.

हेही वाचा - Inflation hit a record high : धान्य, इंधनाच्या किमती वाढल्यामुळे महागाई 15.08% च्या विक्रमी उच्चांकावर

Last Updated : May 17, 2022, 6:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.